अनुदिनी ५६ – श्रीमंती / Blog 56 – Magnanimity

नमस्कार मंडळी!

काय,एकदम 'बिझी बी?'

हा, आता इयरएन्ड म्हटल्यावर जरा जास्तच बिझी असणार!

चालायचंच, त्यातही एक मजा असते की हो राव!

हा, म्हणजे कामा सोबत इयरएन्ड नंतर फिरायला जायचेही बेत ठरत असतात,ठरतात, आणि मग त्या उत्साहात ३१ मार्च केव्हा संपला ते कळतच नाही.

तर,असो!

मंडळी, आज थोडं काही वेगळं मनामध्ये आहे.

वेगळं म्हणजे कोणत्या आर्थिक गुंतवणुकीविषयी नसून एक वेगळ्याच ‘गुंतवणुकीविषयी' आहे.

ही ‘गुंतवणूक’ तुम्हाला-आम्हाला कोणताच परतावा देत नाही पण मनाची श्रीमंती मात्र जरूर वाढवते.

सांगतो, सांगतो!

झालं असं!

परवा एका कॉलला गेलो होतो. स्टेशन बाहेर आलो, रिक्षात बसलो, थोड्या अंतरानंतर सिग्नलला रिक्षा थांबली.

मंडळी! ट्रॅफिक सिग्नल हे ठिकाण काही सेकंदात-मिनिटांत, मनोव्यापाराचे दर्शन घडवणारी उत्तम जागा!

समोरच काही मुलं चाफ्याच्या फुलांची माळ घेऊन गाडीच्या खिडकीजवळ नाचवत हिंडत होती, तर काही मुलं हातातील फडक्याने गाडीच्या काचा पुसत ड्रायव्हरच्या सीटपाशी येऊन काचा बडवीत होती,पैसे मागत होती.

काही गाड्यांपाशी कडेवर लहान मुले घेऊन भिकेची झोळी पसरणाऱ्या मुली व स्त्रियाही फिरत होत्या.

चौकातल्या उजव्या सिग्नलपाशी एक किन्नर छानपैकी नटून त्यांच्या विशिष्ठ पद्धतीने पैसे मागत होता.

तो किन्नरही भीकच मागत होता, पण तो किन्नर आणि कडेवर मूल घेऊन भीक मागणारी स्त्री या दोघांमध्ये प्रचंड फरक होता. ती स्त्री अंगावरील फाटक्या कपड्यानिशी चेहेऱ्यावर आर्जव, दीनपणा आणून लोकांपुढे हात पसरत होती तर तो किन्नर प्रचंड आत्मविश्वासाने, केसांत फूल माळून, साजेसा मेकअप करून आपल्या रंगरूपाला शोभेल अशी ‘व्यवस्थित’ साडी नेसून,

"ए, दे रे अण्णा, दस रुपया दिया तो तेरा क्या ......” अशा खणखणीत आवाजात, सडेतोड भाषेत, एकदम स्टाईलमध्ये तेच काम करत होता. "ए, हे घे!" माझ्या सोबत रिक्षात बसलेल्या गृहस्थाने २० रुपयाची नोट त्याच्या पुढे केली. किन्नराने, गृहस्थाच्या डोक्यावर हात ठेवून नोट आपल्या दोन बोटांच्या मध्ये ठेवली आणि पुढे गेला.

मागच्या सिग्नलवर भिकाऱ्यांना दाद न देणारा हा गृहस्थ इथे मात्र चटकन २० रुपये पुढे करतो, माझ्या मनातील विचारांची ही खळबळ त्याने ओळखली असावी.

"अहो या वर्गाला आपण नाहकच उपेक्षीत ठेवले. हा किन्नर जर एवढ्या आत्मविश्वासाने, निर्धाराने, उत्साहाने भीक मागतो, तर ह्यांना आपल्या समाजात, अर्थव्यस्थेत सहभागी करून घेतले, एखादे काम दिले तर ते तितक्याच तन्मयतेने करतील, उलट काकणभर जास्तीच चांगले करतील. कारण त्यांना कल्पना आहे की ह्या कामामुळे आपल्याला समाजात एक वेगळी ओळख मिळणार आहे, इज्जत मिळणार आहे.”

मंडळी, आपणही अनुभवलेली एखादी श्रीमंत मनाची गोष्ट असेल तर जरूर कळवा.

आपल्या प्रतिक्रिया ह्या ब्लॉग पोस्टच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये जरूर मांडा.

--------------------------------------------------------------------------

Hello Friends!

Hi, Busy like a bee?

Yes, as it is yearend now, obviously, the workload has increased.

True, But that, too, is a thrilling experience!

Because, along with the workload, the planning for touring after the yearend also is being done simultaneously. And one does not realize when 31st March has passed.

Let it be.

Friends, today, I have something different in my mind to share.

It is different because it is not about any particular financial investment but a totally different investment.

This investment does not give you any returns in particular but makes you more magnanimous.

Let me tell you!

It happened so! A couple of days ago, I was on a call. Came out of the station and boarded the Share Rikshaw. The Rikshaw stopped at the signal after some distance.

Friends! A traffic signal is a place where you can see the psychological business tactics!

A few children were selling the garlands of magnolia flowers, while some other children were wiping the windscreen of the cars and asking for money by tapping on the driver’s window.

Around some cars, women with small kids were asking for alms.

At the right signal of the crossroads, an eunuch, donning nice makeup and clothes, was asking for money in his typical way.

That eunuch, too, was begging, but there was a stark difference between the eunuch and the lady with the child in her arms. That lady with rags wrapped around her body was pleading for the alms. Whereas the eunuch, with decent makeup and a decent saree, was exuding confidence.

"ए, दे रे अण्णा, दस रुपया दिया तो तेरा क्या ......” He was saying it very confidently and loud.

The other gentleman, sharing the Rikshaw with me, offered him a ₹. 20 note. The eunuch grabbed it, pinching between his two fingers, and blessed him on his head.

My co-passenger must have understood my curiosity regarding his behavior of ignoring the beggars but encouragingly giving ₹. 20 to the Eunuch!

“You know, the people from this community are oppressed. This Eunuch begs with such confidence and energy, and if this trait of theirs is used by the society in the mainstream of our economy by including them and giving them some opportunity to work, then they shall do it with equal dedication, rather a bit better. Because they know that they will get a different identity and respect if they too can contribute to the society's economy.”

Friends, if you have experienced such magnanimity, please share it with me.

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'