अनुदिनी ७१ -सिप, टर्म इन्शुरन्स आणि युलिप / Blog 71 – SIP, Term Insurance, and ULIP

मधल्या काळात एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाक्षिकातील लेख वाचनात आला. त्याने युलीप योजना कशा अयोग्य आहेत त्याविषयी बरीच मुक्ताफळे उधळली होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार गुंतवणुकीसाठी फक्त बाजारच योग्य आहे.

मंडळी, गुंतवणुकीचे त्या त्या काळातील उपलब्ध असलेले मान्य पर्याय हे गुंतवणूकदारांची भलामण करण्यासाठी नसून प्रत्येकाच्या मानसिकतेतील जोखीम घेण्याच्या कमी-अधिक वृत्तीला पूरक असतात. 

उदाहरणच द्यायचं झालं तर बँकेतील मुदत ठेव योजना (Fixed Deposits), यावरील परतावा हा अत्यंत जुजबी स्वरूपातील असूनही त्यात गुंतवणूक ही होतच असते. ह्यात गुंतवणूकदार आपली सोय, मुद्दलाची सुरक्षितता बघत असतो. 

तर, भविष्य निर्वाह निधीतली (PPF) गुंतवणूक ही जरी १५ वर्षांसाठी असली तरी त्यावरील मिळणारा करमुक्त परतावा व सुरक्षितता, ह्या बाबी गुंतवणूकदाराला आकर्षित करतात. 

असो, तर मंडळी आजच्या अनुदिनीचं प्रयोजन हे आपल्याला एखादं गुंतवणुकीचं माध्यम अथवा योजना ही दुसऱ्या गुंतवणुकीसमोर कशी अयोग्य आहे हे दाखवायचं नसून उपलब्ध पर्यायातील कोणता पर्याय तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो हे समजावून सांगणं आहे. 

ह्या पार्श्वभूमीवर जर आपण 'युलीप’ हा गुंतवणुकीचा पर्याय विचारात घ्याल तर त्याच्यासमोर म्युच्युअल फंड योजना तुलनेसाठी विचारात न घेता अलीकडील पूर्णपणे सरकारी रोख्यात गुंतवणूक असणारे भविष्य निर्वाह निधीचा’ (PPF) विचार करावा. ह्याला 'अलीकडील’ गुंतवणूक म्हणण्याचे कारण असे की चढत्या श्रेणीनुसार बँकेच्या योजनांमधील गुंतवणूक ही प्राथमिक स्वरूपातील मानली जाते. त्यानंतर पोस्टातील योजना. ह्या योजनेतील भविष्य निर्वाह निधी(PPF) हा सुरक्षित गुंतवणुकीतील अखेरचा टप्पा. याच्यापुढे असणारे पर्याय हे  बाजाराशी संलग्न असतात. जसे, नॅशनल पेन्शन स्कीम (NPS), म्युच्युअल फंड, युलीप योजना, कंपन्यांचे समभाग, अलीकडेच आलेले स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, स्थावर व जंगम मालमत्तेमधील गुंतवणूक वगैरे.

तर मंडळी आता आपल्याला मूळ मुद्द्याशी येऊ आणि तो मुद्दा म्हणजे तुलना.


तर सुरक्षित गुंतवणुकीत अडकलेल्या गुंतवणुकदारास दोन अंकी परतावा खुणावत असेल आणि तोही करमुक्त असेल, तर बाजारातील गुंतवणुकीची पहिली पायरी म्हणून त्याने ‘युलीप’ योजनांचा विचार करण्यास हरकत नसावी. या योजनेत विमा संरक्षणासोबत गुंतवणुकीतील जोखीम कमी जास्त करण्यासाठी ‘जोखीमयुक्त’, ‘मध्यम जोखीम’, ‘सुरक्षित जोखीम’ असे पर्याय उपलब्ध असतात. या योजनेतील अजून एक वेगळेपण म्हणजे युलीप योजनांमध्ये काही शुल्क आकारले जाते आणि ते आपल्या विमा हप्त्यातून वळते केले जाते. 

मंडळी, असं जरी असलं, तरी योजनेचा सरासरी कालावधी जर पंधरावर्षाचा विचारात घेतला तर ह्या आकारलेल्या शुल्काची टक्केवारी फक्त पाच ते सहा टक्क्यांपर्यंत जाते. या योजनांमध्ये काही अपवाद वगळता पाच वर्षांनी रक्कम अंशतः काढण्याची मुभा असते. 

तसेच मंडळी, ह्यात मुदतीनंतर मिळणारी रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असते, जर वार्षिक हप्ता रु २.५० लाखा पर्यंत  असेल तर!

अगदीच अलीकडलं उदाहरण घ्याल तर एलआयसीच्या ‘पेन्शन प्लस’ योजनेमधील लाखभर रुपयाच्या वार्षिक गुंतवणुकीचे आजचे मूल्यांकन रुपये ३१.२० लाखाहून अधिक आहे. या योजनेत संबंधित पॉलिसीधारकाने पंधरा वर्षे प्रीमियम भरला. 

आता आपण जर गणित मांडाल तर आपल्याला उमगेल की त्यावरील परताव्याचा दर हा ८.७१% आहे जो पूर्णपणे करमुक्त आहे. 

तर मंडळी, आता आपल्याला गुंतवणुकीत, युलीप योजनांना पीपीएफ च्या पुढली पायरी म्हणण्याचं कारण उमगलं ना?  

तर सांगायचं तात्पर्य काय तर अशा एकेक करून पुढच्या विटा रचत गेल्याने आपली गुंतवणूकरूपी तटबंदी मजबूत होते. आपली  जोखीम घ्यायची (Risk appetite) क्षमता वाढते. 

शंभरातले पन्नास टक्के जर जोखीमविरहित व मध्यम जोखमीच्या गुंतवणुकीतून उभे राहणार असतील तर उरलेल्या रकमेसाठी अधिक जोखीम घेणे स्तुत्य ठरेल. 

थोडक्यात मंडळी, गुंतवणुकीचे पर्याय हे व्यक्ती सापेक्ष असतात. आणि उपलब्ध गुंतवणुकीचे पर्याय हे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नसून गुंतवणूक अधिक सक्षम करण्यासाठी असतात.

तुम्हाला काय वाटतं?

_______________________________________________________

I recently read an article in an English newspaper’s periodical. The newspaper had blatantly condemned ULIP schemes and insisted that only the share market is ideal for investment.

 

Friends, the available and accepted investment options at the time are not meant to lure investors, but rather to cater to investors’ risk-taking capacity. 


For example, despite meagre returns on fixed deposits, investors still invest in them. 


Another example is of Public Provident Fund (PPF), although the investment in PPF is for 15 years, its main attractions are tax-free guaranteed returns and security.


The investor sees his/her convenience, security, and liquidity in such investments. 

 

Well, Friends, today’s blog is not meant to demean any mode of investment, but to explain which available option is best suited to fulfill your needs.

 

​On this basis, if you are contemplating ULIP as an investment option, then instead of comparing it with Mutual Fund schemes, you should compare it with the primary option of investing in purely government bonds. To call this an primary option is because, in ascending order, the investment in bank schemes is considered the primary option, then postal schemes, and finally, PPF is considered a safe & secure option.


The options after these are linked to markets such as NPS, Mutual Funds, ULIP schemes, company shares, recently introduced specialized investment funds, and investment in immovable properties, etc.

 

So, friends, let us now come to the main topic. 


And that is the comparison. 



If the security-oriented investor is lured by 2-figure returns, and those returns are tax-free, then the investor may consider ULIP, the first step in market investment.

 

In this scheme, three options —high risk, medium risk, and no risk —are available based on the investor's requirements. Another unique feature of this scheme is that the fees for ULIP schemes are deducted from the insurance premium.


Friends, even if it is so, considering the scheme's 15-year tenure, the fee percentage is only about 5 to 6%. 

Barring a few exceptions, there is a possibility of withdrawing a partial amount after five years in this type of scheme. Plus, the maturity is fully tax-exempt​ up to the annual premium of Rs. 2.50 lacs.

 

If you consider the recent example of LIC’s ​- 'Pension ​Plus' scheme, then the valuation of this scheme is more than Rs.31.2​0 lakhs as of today with an investment of Rs. One Lakh per annum, when the investor pays the premium for 15 years.


Now, you will realize that the rate of return on the investment is 8.71% and ​it is 100% tax-free.

 

So, friends, do you now understand why ULIP is known as the next step in investment after PPF?

 

Please feel free to comment.

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

फुलपुडी - PhulPudi

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

घर..घर ! Ghar..Ghar !