Posts

अनुदिनी २७ - 'बळवंतराव आणि परीराणी'

Image
आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे! भावगीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत भावसरगम. "कोमेजून निजलेली एक परीराणी उतरलेले तोंड डोळा सुकलले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही" श्रोतेहो, आत्ताच आपण संदीप खरे व सलील कुलकर्णींनी ह्यांनी गायलेली 'दमलेल्या बाबाची कहाणी' हे..... , निवेदकाचे पुढचे बोलणे वातावरणात विरत होते. केतकीच्या कानात फक्त 'दमलेल्या बाबा ची कहाणीचे' सूर घुमत होते. डोळ्यातील टपोऱ्या थेंबातून आठवणींची गंगा वाहत होती. अश्रूंच्या त्या चवीत ती बाबासोबतच्या आठवणींची गोडी चाखत होती. बळवंतरावांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यांचा घरात पाय ठरत नसे.आपल्या अश्या ह्या नोकरीमुळे आपल्या एकुलत्या एका लेकीचे व पत्नीचे हाल होऊ नयेत म्हणून ते एकटेच फिरतीवर असत. पण ज्या वेळी ते घरी असत तेव्हा ते जास्तीत जास्त वेळ केतकी सोबत घालवत. त्या धुसर दृष्यातही केतकीला पाठंगुळीवर घेऊन पळणारा, तिच्या आजारपणात जागणारा, तिला आईस्क्रीम खाऊ घ...

Blog 27 - 'Balwantrao & PariRani'

Image
This is the Mumbai station of “Akashwani” We now present the “Bhav-Sargam” programme on emotional songs. “One fairy fell asleep fully withered Disparity on face and tears in eyes dried This is the routine; nothing new today I can’t stand with a sorry face every day…………” Audience, You all just heard the song “The tale of a tired father” sung by Sandeep Khare and Salil Kulkarni. The words of the anchor were fading in the atmosphere. The lyrics of “The tale of the tired father” were echoing in the ears of Ketki. All the memories were flooding out in the form of tears in her eyes. She was reliving and tasting those sweet moments with her father in each drop of the tears. Balwantrao's job called for frequent relocation, due to which he was not able to spend time at home. Because of this nature of his job, he had opted to relocate alone and stationed his wife and only daughter ...

अनुदिनी २6 -‘अजित' / Blog 26 - 'Ajit'

Image
अजित मंद निळा प्रकाश ड्रॉइंग रुम मध्ये पसरला होता. समोरच्या खिडकीला लागूनच मोठा फिशटॅन्क ठेवला होता. खिडकीला लावलेले पडदे वाऱ्याच्या मंद झुळकीवर हलकेच झुलत होते. झुंबराचा किण-किणाट रात्रीच्या शांत वातावरणात एक लय धरत होता. त्या लयीत निरनिराळे रंगीत मासे जणू काही तालधरुन गिरक्या घेत लक्ष वेधून घेत होते. बेडरूममधून त्यांच्या या हालचाली, पळापळ बघण्यात वेळ कसा जायचा हे कळायचेच नाही. गेल्या महिन्यापासून अजितचं हे रूटीन झाले होते. अजितची ब्रेन ट्युमरची ट्रीटमेंट चालू होती. महत्वाचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. आता त्याला recovery, ला वेळ द्यायचा होता. आराम आणि वेळचे-वेळी औषधं याने तो महिन्याभरात ऑफिसला रूजू होणार होता. गेल्या काही महिन्यांपासून पगार बंद पण खर्च बेबंद होत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव नव्हता. त्याने समोर आलेली परिस्थिती स्वीकारली होती; आनंदाने नाही, तर समंजसपणे. आजारपण वा दुखणे, येणे न-येणे त्याच्या हाती नव्हते, पण त्याच्याकरिता समाधानाची बाब ही होती की अश्या...

अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५ ‘ / Blog 25 - '5, 10 or 15'

Image
'अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५' अरे वा वा!! अलभ्यलाभ! सुमित च्या आई ने पूजा व तिच्या यजमानांचे स्वागत केले. पूजा सुमितच्या आईची म्हणजे अश्विनीची बालपणीची मैत्रीण. दोघीही अगदी बालवाडी पासूनच्या मैत्रिणी; मधल्या काळात काही वर्षांकरिता पूजाच्या यजमानांची दुबईला बदली झाल्याने २/३ वर्षे काही भेट नव्हती आणि आज अचानक कही न कळवता पूजा दरात उभी! “ अगं काय गं सुमितचं लग्न ठरवलंस आणि काही कळवलंच नाहीस! लटक्या रागात पूजाने विचारले. तेवढ्यात सुमित आला, हॅलो मावशी केव्हा अलीस? अरे ही बघ आत्ताच आले! आणि हे काय! लग्नाची तयारी एकदम जोरदार चाललेली दिसते!! अग हो मावशी मला आवडलेला ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’ बुक केलाय ते ही तीन दिवसांसाठी. संगीत, हळद, पण एकदम दणक्यात करणार. मेन्यू म्हणशील तर एकदम different, संगीत ला ‘चाट काउंटर’ सोबत ‘इटालियन काउंटर’ पण ठेवलंय. हळदीला मस्त हुरडा, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, चवीला झणझणीत मिरचीचा ठेचा आणि इंडो वेस्टर्न फ्युजनही आहे. ...

अनुदिनी २४, 'अप्पासाहेबांचा प्लॅन' / Blog-24, 'Appa Saheb's Plan'

Image
'अप्पासाहेबांचा प्लॅन' "भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती……." अप्पासाहेब स्तोत्र म्हणत आंघोळीहून आले. पुजेला बसण्यासाठी देवघराकडे वळताना त्यांनी सहजच हॅालमधे नजर फिरवली. मंदार कोणासोबत तरी बोलत होता. आपले जानवे टॅावेलनेपुसत ते पुजेची तयारी करू लागले. पूजा चालू असतांना त्यांच्या कानावर दोघांचे संभाषण येत होते. अप्पासाहेबांची साग्रसंगीत पूजा आटोपली आणि ते पेपर वाचत बाल्कनीत बसले. "Dad इकडे या ना!" मंदारने हाक मारली. "हं, बोल” इती अप्पासाहेब. "तुम्ही असे काही केले आहे का?" मंदारने लॅपटॉपच्या screen कडे बोट दाखवत विचारले. मंदारच्या लॅपटॅापवर हे दिसत होते. Investment : ₹ 25 Lacs Withdrawal per month : ₹ 21,000 Expected Growth rate : 7% pa Time period : 16 Years "दिसतंय का?" मंदारने त्याची खुर्ची थोडी बाजूला सरकवत विचारले. अप्पासाहेबांनी खुर्ची जवळ घेतली. हे बघा, तुम्हाला दरमहा २१,००० या...

अनुदिनी २३ - ‘चाय पे चर्चा -२’ 'Blog 23 - Chai pe Charcha - 2'

Image
'चाय पे चर्चा -२' ठाणं, ठाणं, ठाणं!!!! संदिपच्या फ़ॅब्रिकेशनच्या वर्कशॅाप मध्ये पोहोचलो. संदिपने नुकतेच हे वर्कशॅाप सुरू केले होते. आजूबाजूला ३-४ कामगार कामात व्यग्र होते. वेगवेगळे आवाज आणि फ़ॅब्रिकेशनचा गंध वातावरणात भरलेला होता. मी बाहेर संदिपच्या बोलाविण्याची वाट बघत होतो. तो फोनवर तावातावाने बोलत असल्याचे दिसत होते. माझ्याशी नजर मिळताच त्याने मला आत बोलावले. “हे बॅंकवाले काही ऐकायलाच मागत नाहीत. CC ची लिमीट वाढवून द्यायला काय नाटकं करतात ना! काय तर म्हणे तुमची बॅलन्सशीट बरोबर नाही,"  फोन ठेवत संदिप पुटपुटला. “बरं ते जाऊ दे! तू कसा आहेस” संदिपने एकदम ट्रॅक चेंज केला. “एकदम झक्कास मजेत! बरेच दिवस भेट नाही!” “हा! बरं झालं तू आलास ते, मला ह्या कामातून वेळच मिळत नाही. आत्ता ऐकलंस ना,  ह्या CC च्या लिमिट करीता मागे लागू की उद्योगधंदा बघू?” “चहा घेशील ना!” “हो”! मी उत्तरलो. “थोडक्यात काय तर सध्या तुझी आर्थिक चणचण चालू आहे”. ...

अनुदिनी -२२ 'तुळशी विवाह - विवाह' / Blog-22 'Tulsi Vivah - Vivah'

Image
'तुळशी विवाह - विवाह' नमस्कार मंडळी! कसे आहात ? कशी काय गेली दिवाळी ? खरं तर अजून दिवाळी संपलीच कुठे? अहो, अजून तुळशीचं लग्न कुठे लागलंय! काय, बरोबर ना ? आणि मंडळी तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतरच तर आपल्या जोडीदाराच्या गाठीचे, म्हणजेच लग्नाचे मुहूर्त बघायला सुरवात होते. त्यामुळे इकडे ही  दिवाळी सरत आली की दुसरीकडे नात्यातील 'सस्नेह-दिवाळीची' मुहूर्तमेढ पक्की केली जाते आणि हीच तर आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. तर, असो! मंडळी, बघता बघता 'अनुदिनी' सुरु करून एक वर्ष होत आलं की! आपल्याला हा 'संडे-ब्लॉग' आवडतो, हे कळवले व सांगितले त्या बद्दल धन्यवाद! पण, मंडळी 'आवड' ही व्यक्तीसापेक्ष बाब असते, अगदी गुंतवणूकीच्या बाबतीतही ती व्यक्ती नुसार बदलते. पण, जरी गुंतवणूकीचे ठोकताळे वेगवेगळे असले तरी, बरीचशी आर्थिक उद्दिष्टे ही सामायिक म्हणजे एकसारखी असतात, जसे की...

अनुदिनी - २१ 'सुनील-तात्यासाहेब -पाटील' Blog-21 'Sunil - Tatyasaheb -Patil'

Image
'सुनील-तात्यासाहेब -पाटील' 'हॅलो, सुनील!' "कसा आहेस!" "बरेच दिवसात फोन नाही!" "बरं, तू भारतात केव्हा येणार आहेस?" "अरे, अजून काही नक्की नाही. पण,मला नाही वाटत की मी एवढ्या लवकर येईन. दोन-तीन वर्ष तरी नाहीच." इति सुनील. मंडळी, सुनील अमेरिकेत आहे आणि त्याची विमापॉलीसी परिपक्व (matured) झाली, पण त्याचे इथे येणे काही वर्ष तरी नक्की नसल्याने तो आल्याशिवाय विम्याचे मूळ दस्ताऐवज (Original policy document) मिळणे अशक्य. त्यामुळे विम्याचा दावा हा नाहक प्रलंबित होत होता. घटना क्र.२ "अहो! परवा आईंचा फोन होता, तुम्ही कोल्हापूरला असताना काढलेल्या विमापॉलीसिचे पैसे मिळणार आहेत तर त्याचे पेपर्स वेळेत पाठवून द्या," त्या सांगत होत्या. "अरे, हा बरी आठवण केलीस. मागे आपण नाशिकला असताना  तुझी पॉलिसी काढली होती ती पण शोधून ठेव." तात्यासाहेबांनी बायकोला सांगितले. मंडळी, काय झालं! तात्यासाहेबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे वेग...

अनुदिनी - २० 'ओपन टायटल' / Blog -20 'Open Title'

Image
ओपन टायटल दारावरची बेल वाजली, अप्पासाहेबांनी कुरियर घेतलं आणि टीपॉयवर ठेवलं. स्वारी परत पेपर वाचनात गुंग झाली. हे आमचे अप्पासाहेब, नुकतेच रिटायर्ड झाले होते. दोन्ही मुलांची नुकतीच लग्न झाली होती. आता साहेब संसाराच्या जबाबदारीतून अगदी मुक्त झाले होते. ह्या नवीन वळणावर त्यांची गाडी अजून रुळलेली नव्हती. ते थोडे जास्तच निवांत झाले होते. झोपण्या-उठण्याच्या ,खाण्या-पिण्याच्या वेळेचं गणित बसवण्याच्या भानगडीत न पडता त्यांचा आपला मनमौजी दिनक्रम चालू होता. दारावरची बेल वाजली, तुषारने, अप्पासाहेबांच्या मुलाने दार उघडले. हा,या! तुषारने आलेल्या व्यक्तीला बसवलं. "हा फॉर्मचा सेट आहे" ती व्यक्ती उद्गारली. “ह्या सूचना पत्रावर (intimation letter) सही करा आणि सोबत मृत्यूदाखल्याची प्रत जोडा.” त्या व्यक्तीने पुस्ती जोडली. मंडळी, अप्पासाहेब अचानक निवर्तले. हो! हा, सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. कुटुं...

अनुदिनी - १९ 'असा मी असा मी' / Blog -19 'Asa mi Asa mi'

Image
असा मी...असा मी! एकदा मी असाच हिच्याबरोबर कापडखरेदीला गेलो होतो. हिचं नेहमीप्रमाणं ते हे काढा हो,ते ते काढा हो, चाललं होतं. मी थोडासा इतर गिऱ्हाहीकांकडे (customers) पाहण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात ही म्हणाली, "कसं आहे हो अंग?" (fairness) मी म्हटलं, "खूपच गोरं आहे नाही?" “गोरं?” असं म्हणून ही एवढ्यांदा ओरडली की मी ज्या गोऱ्या अंगाकडे पाहत होतो तेदेखील दचकलं. लुगडं (saree) हे अंग झाकण्यासाठी असतं अशी माझी समजूत. आता लुगड्यालाही अंग असतं हे मला काय ठाऊक ! नागपूर, महेश्वर, इरकल, इचलकरंजी, कांजीवरम, बनारस, वगैरे गावं पुरुषांचा सूड घेण्यासाठी स्थापन झाली आहेत. एकदा मला ही अशीच म्हणाली होती, "हा पडवळी रास्ता बरा आहे का बैंगणीच घेऊ?" मला आधी हा रास्ता कोण ते ठाऊक नव्हतं. पण पडवळ (snake gourd) ही गोष्ट नावडती असल्यामुळं “हा बैंगणीच बरा दिसतोय,” म्हणून मी एका लुगड्यावर (saree) हात ठेवला. 'इश्शं! अहो, हाच तर पडवळी आहे !" लगेच मी चलाखी करून म्हटलं, ...

अनुदिनी १८ - “आनंद” / Blog 18 - "Anand"

Image
आनंद मागच्या आठवड्यात मस्त लॉन्ग वीकएंड मिळाला. पावसाची रिपरिप चालू होती आणि मस्त दुपारची झोप होऊन हातात चहाचा कप होता. समोरच शेल्फवर  "आनंद" पिच्चरची सीडी दिसली. जे आज ५० - ६० वयाच्या पुढे आहेत, त्यांनी "आनंद" नक्कीच बघितला असणार! अमिताभच्या करियरची सुरवात खऱ्या अर्थाने ह्या पिच्चरने झाली, असं म्हणतात. सोबत होता "काका" म्हणजे "राजेश खन्ना".  मला वाटतं  "अभिताभ व राजेश खन्नाचा" हा  एकमेव सिनेमा असावा. पिक्चरचे स्क्रिप्ट उत्तम होतच पण गाणीसुद्धा भावस्पर्शी होती. "ज़िन्दगी कैसी है पहेली  हाय, कभी तो हँसाए, कभी ये रुलाये" मंडळी! ह्यातील शेवटचा सिन एकदम अंगांवर काटे आणणारा! राजेश खन्ना मरणाशी झुंजत असतो त्याला प्रचंड श्वास लागलेला असतो. त्याचे हे हाल इतरांना बघवत नसतात पण ते हताश असतात. काकाला  नाटकांची आवड असते त्याच्या एका आवडत्या नाटकातील टेप तो लावायला सांगतो. "मौत तू एक कविता है ..... " . इकडे काका...