अनुदिनी - २० 'ओपन टायटल' / Blog -20 'Open Title'

ओपन टायटल

दारावरची बेल वाजली, अप्पासाहेबांनी कुरियर घेतलं आणि टीपॉयवर ठेवलं. स्वारी परत पेपर वाचनात गुंग झाली.

हे आमचे अप्पासाहेब, नुकतेच रिटायर्ड झाले होते. दोन्ही मुलांची नुकतीच लग्न झाली होती. आता साहेब संसाराच्या जबाबदारीतून अगदी मुक्त झाले होते. ह्या नवीन वळणावर त्यांची गाडी अजून रुळलेली नव्हती. ते थोडे जास्तच निवांत झाले होते. झोपण्या-उठण्याच्या ,खाण्या-पिण्याच्या वेळेचं गणित बसवण्याच्या भानगडीत न पडता त्यांचा आपला मनमौजी दिनक्रम चालू होता.

दारावरची बेल वाजली, तुषारने, अप्पासाहेबांच्या मुलाने दार उघडले.

हा,या! तुषारने आलेल्या व्यक्तीला बसवलं.

"हा फॉर्मचा सेट आहे" ती व्यक्ती उद्गारली.

“ह्या सूचना पत्रावर (intimation letter) सही करा आणि सोबत मृत्यूदाखल्याची प्रत जोडा.” त्या व्यक्तीने पुस्ती जोडली.

मंडळी, अप्पासाहेब अचानक निवर्तले.

हो! हा, सगळ्यांसाठी मोठा धक्का होता.

कुटुंबासाठी त्यांचे जाणे हे चटका लावणारे तर होतेच पण क्लेशकारक बाब अशी की, त्यांच्या निष्काळजीपणामुळे विम्याचा दावा मिळवताना सौ पाटील यांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

कारण,

अप्पासाहेबांनी जे कुरियर काही दिवसापूर्वी घेतलं होत ते विम्याच्या परिपक्व्तेच्या दाव्याचं होते (Discharge Form). जे सही करून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून परत पाठवायचं होतं. पण, त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ते राहून गेलं.

मंडळी, अजून एक राहून गेलेली बाब अशी की, सदर विमा पॉलिसीवर नामांकन (Nomination) नव्हते.

मग आता?

वारसदार नसल्याने ही विमापॉलिसी "Open title" झाली. आता, अप्पासाहेबांच्या पत्नीला ह्या विमापॉलिसीचे आपणच एकमेव दावेदार आहोत हे विमाकंपनीला दाखवून द्यावे लागेल आणि जर कदाचित दुसऱ्या व्यक्तीने सदर दाव्यावर हक्क दाखवला तर, मंडळी, हरी, हरी! हा मामला कोर्टात जाईल.

जो क्लेम दाव्याच्या दिवशीच (maturity date) मिळणार होता त्याला आता अनिश्चिततेचे ग्रहण लागेल.

तर, मंडळी ह्यातून काय अर्थबोध घ्यायचा?

विमापॉलिसी हा नुसता एक छापील पेपर नसून तो एक कायदेशीर दस्तऐवज आहे.

विम्याच्या संदर्भातील पत्रव्यव्हाराला गांभीर्याने घ्या. आलेली कागदपत्रे लगोलग तपासा.

न कळलेल्या बाबी आपल्या विमाप्रतिनिधीला (insurance agent) आवर्जून विचारा.

मंडळी, काय आहे! विमा हा आपल्याला व कुटुंबाला बांधून ठेवणारा एक अदृश्य असा स्निग्ध धागा आहे. जो आपल्या पश्चातही कुटुंबाप्रतीच्या आपल्या प्रेमाची स्निग्धता कायम ठेवतो.

तर, त्याला जपा.

Open Title

The doorbell rang. Appasaheb took the courier, kept it on the teapoy and got engrossed again in reading the newspaper.

He is our Appasaheb. Retired recently. Both his children were married, and now he is free from all his responsibilities. He was yet to set his new retired life schedule. He opted to be a bit relaxed and was leading life on his own terms for the time being.

The doorbell rang. Tushar, Appasaheb’s son, opened the door.

Tushar escorted the person to the door and requested him to come in and sit.

“This is the set of forms,” the newly arrived person said.

“Please sign the intimation letter and attach the death certificate”, advised the person.

Friends, Appasaheb passed away abruptly. Yes, it was a big shock to all.

The death of Appasaheb certainly brought immense grief to the family, but due to the carelessness of Appasaheb, Mrs Patil was going through frustration and turmoil while claiming the policy amount.

Because the courier that Appasaheb received the other day was of the discharge form of his matured policy. Which was to be sent back duly signed and with other necessary documents attached. It was not done by him out of his negligence. Another most important thing which was not done was a nomination to the policy.

What now?

As there was no heir, the policy became “open title”. Now the wife of Appasaheb will have to prove that she is the sole claimant of the policy. And if anybody else puts a claim on it, then this will become all the more difficult, and the matter shall go to the court.

So, friends, what’s the learning from this?

 An insurance policy is not merely a printed paper but a legal document. Please take all the correspondence regarding the insurance policy seriously. Please read all the documents that you receive from the policy company carefully. Get the unknown / un-understood topics clarified from your policy agent. 

You know, the policy is the invisible bond that keeps the family together even after your death. So please do take care of such things regarding the insurance policy.

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'