अनुदिनी ६९ - म्युचलफंड पोर्टफोलिओ / Blog 69 – Mutual Fund Portfolio




नमस्कार, मंडळी!


काय म्हणतोय पावसाळा!


यंदा त्याने लवकरच हजेरी लावली.त्यामुळे पाण्याची चिंता नाही. पावसाच्या ह्या कामगिरीने बळीराजा (Farmer) आणि अर्थव्यवस्थाही सुखावलेली आहे.


तर, आता आपल्या वैयक्तिक आर्थिक गोळा बेरजेचे गणित मांडायलाही हा काळ योग्य


तर, आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलीमध्ये काही बदल किंवा नव्याने सुरूवात करायची असल्यास जरूर बघून घ्या


मंडळी, आता पोर्टफोलीयोचा विषय निघालाच आहे तर आपण एका मुद्द्यावर माझ्याशी सहमत असाल, की आज तुम्ही-आम्ही बऱ्यापैकी गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात (asset class)  पैसे अडकवत असतो. म्हणजे, PPF, म्युचलफंड, NPS (National Pension Scheme)  आणि एवढेच नाही तर डीमॅटच्या स्वरूपात शेअर्स सोबत सोनंही घेऊन ठेवलं जातं.       


 ह्या सगळ्याबरोबरचं बहुतेक जणांचा टर्म प्लॅन हा असतोच

आणि हो, सेकंड होम! ते ही असतं किंवा असावं अशी इच्छा मनी असतेच.


आता एवढं सगळं असलं की आपली गुंतवणूक परिपूर्ण झाली किंवा आहे अशी सर्वसाधारण धारणा असते


तर मग ह्या लेखाचे प्रयोजन ते काय?


हा, एकदम बरोबर प्रश्न केलात राव!


त्याचं असं आहे म्युच्युअल फंडात, समभागातील (Equity) SIP व्यतिरिक्त आपण गरजेप्रमाणे कमी कालावधी  (Short  Duration ),  अल्पकाळाकरिता (Ultra Short Duration) असणाऱ्या कर्जरोख्यांनाही (Debt Fund) आपल्या पोर्टफोलिओत स्थान द्यावयास हवे.


माझ्या पाहण्यात बरेच जण बेधडक म्हणा किंवा डोळे झाकून सरळ बँकांच्या मुदतठेव योजना (Fixed Deposits)  करणे पसंत करतात


तर, आता आपण जे कर्जरोख्यांचे प्रकार (Debt Fund) वाचलेत त्याचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे पाहू.



मंडळी, जर आपल्याला येत्या दोन ते तीन वर्षात एक मस्त SUV कार घ्यायची आहे.किंवा राव ! दोन ते तीन वर्षात तुमच्या नवीन घराचा ताबा मिळणार आहे आणि नंतर तुम्हाला  घरातल्या सजावटीवर मस्त खर्च करायचा आहे. तर अशा वेळेस मंडळी, कमी कालावधीचे कर्जरोखे (Short Duration Debt Fund) योग्य. ह्यात आपण ‘SIP’  देखील करू शकता. थोडक्यात बँकेतल्या आवर्ती योजनेपेक्षा (Recurring Deposit)  हा पर्याय उत्तम


आता, अल्प काळासाठी असणाऱ्या (Ultra Short Term) कर्जरोख्यांकडे वळू


समजा घराचं पझेशन दिवाळीच्या ऐवजी डिसेंबर मध्ये मिळतंय तर, फायनल पेमेंट नुसतेच बँकेत ठेवण्यापेक्षा  हा (Ultra Short Term)  फंड योग्य किंवा समजा, येत्या ऑगस्टमध्ये MS च्या ऍडमिशनसाठी आपल्या अपत्याला निघायचंय तर तुम्ही साधारण वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने इक्विटी मधून युनिट्स विकून आलेला पैसा हा अल्प काळासाठी असणाऱ्या (Ultra Short Term) फंडात ठेवावा


मंडळी, तात्पर्य काय, तर ह्या स्वरूपातील कर्जरोख्यांमध्ये जोखीम ही, 'ना के बराबर!'


तर ज्या वेळेस आपलं आर्थिक उद्दिष्ट हे दोन ते तीन वर्षासाठी असतं त्यावेळेस बँकेच्या परताव्यापेक्षा अधिक परतावा ह्या स्वरूपातील कर्जरोख्यातून आपल्याला मिळू शकतो.  


इथे जोखीम ही अत्यल्प आणि तरलता (Liquidity) उजवी असतेम्हणजे जर तुम्ही  दुपारी च्या आधी विमोचनाचा अर्ज (Redemption Request) केलात तर दुसऱ्या दिवशी, कामाच्या दिवशी (working day) आपल्या खात्यात पैसे जमा होतील.   


आता कंपन्यांच्या मुदतठेव योजना (Corporate Fixed Deposits)!


 मंडळी!


बँकेतील मुदतठेव योजनांच्या (Fixed Deposits) ऐवजी कंपन्यांच्या मुदतठेव योजना उत्तम


राव, जोखमीचा मुद्दा म्हणाल तर सध्या तो दोन्हीकडे सारखाच आहे


असो, पण काही रक्कम कंपन्यांच्या मुदतठेव योजनांमध्ये गुंतवणे हे बदलत्या अर्थ गणितात स्तुत्य. असं बघा, बँकेतील मुदतठेव योजनेवरील व्याजावर कर हा भरायचाच आहे (सध्या बँकेतील दहा हजारापर्यंतचे व्याज हे करमुक्त आहे) तर कंपन्यांच्या दोन अंकी परताव्यावर (Interest) कर भरणे जास्त संयुक्तिक ठरेल


काय बरोबर ना?


तर  थोडक्यात मंडळी कर्जरोखे (Debt Fund) ह्या प्रकारच्या मालमत्ता प्रकारात (Asset Class) ही आपण अधिक सजगपणे गरजेनुरूप गुंतवणूक करणे आवश्यक


काय पटतंय का?


_____________________________________________________




Hello, Friends!
 

How’s the monsoon?

 

This year, the monsoon onset was early. So, no need to worry about water. 


Due to the early onset of the monsoon, both the farmers and the economy are pleased.

 

Therefore, this is the right time to do the calculations of personal finance, too.

 

So, do think about any changes or new beginnings in your investment portfolio.

 

Friends, since the topic of portfolios has come up, I'm sure you'll agree that we are all investing our funds in a variety of asset classes. That is, PPF, Mutual fund, NPS, and along with this, a few life insurance policies and even shares in the form of Demat and gold. 

 

Then what is the provision for this blog?

 

Exactly!

 

It is so that, besides SIP in Equity, we should also have short-duration or ultra-short-duration debt funds in our portfolio.

 

I have noticed that many people tend to invest blindly in fixed deposits in a bank.

 

So, let us see how we can utilize the debt funds we've just read about.




Friends, let’s assume you plan to buy a new SUV in the next couple of years or are getting a new house, and you want to spend some money on interior decoration. In such situations, short-duration debt funds come in handy. You can invest via ‘SIP' in such funds too. 


In short, this is the best alternative to the recurring deposit scheme of the banks.

 

Now, let’s look at the Ultra Short duration funds. If you need to defer the payment of your house due to a postponed possession by a couple of months, then, rather than parking this money in the bank, Ultra short duration funds are a better option. Or if you want to have funds at your disposal after a year to get the admission for MS, then you can invest the money that you have received by selling the equity units over the year in ultra-short funds.

 

Friends, so the moral is, the risk in investing in such kinds of funds is essentially zero.

 

When your investment horizon is two to three years, investing in such funds can yield higher returns than banks. The risk is minimal, and liquidity is also easy. That is, if you raise a redemption request before 3 pm, then your bank account will be credited the next working day.

 

Now let’s discuss Corporate Fixed Deposits!

 

Friends!


Corporate Fixed deposits are better than the Bank’s Fixed Deposits.

 

If you are thinking about the risks, then it is the same in both bank deposits and corporate deposits.

 

However, investing some of the money in the corporate fixed deposits is a good option in this changing arithmetic of investments. Income Tax has to be paid on the interest earned through the term deposits in the banks. (Presently interest up to ₹. 10,000/- is tax-free), Yet it is beneficial to pay tax on returns from corporate deposits.

 

Right?

 

In short, friends, it is necessary to invest in debt funds of such asset classes consciously.

 

Do you agree?







Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

फुलपुडी - PhulPudi

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'