अनुदिनी - २१ 'सुनील-तात्यासाहेब -पाटील' Blog-21 'Sunil - Tatyasaheb -Patil'

'सुनील-तात्यासाहेब -पाटील'

'हॅलो, सुनील!'

"कसा आहेस!"

"बरेच दिवसात फोन नाही!"

"बरं, तू भारतात केव्हा येणार आहेस?"

"अरे, अजून काही नक्की नाही. पण,मला नाही वाटत की मी एवढ्या लवकर येईन. दोन-तीन वर्ष तरी नाहीच." इति सुनील.

मंडळी, सुनील अमेरिकेत आहे आणि त्याची विमापॉलीसी परिपक्व (matured) झाली, पण त्याचे इथे येणे काही वर्ष तरी नक्की नसल्याने तो आल्याशिवाय विम्याचे मूळ दस्ताऐवज (Original policy document) मिळणे अशक्य. त्यामुळे विम्याचा दावा हा नाहक प्रलंबित होत होता.

घटना क्र.२

"अहो! परवा आईंचा फोन होता, तुम्ही कोल्हापूरला असताना काढलेल्या विमापॉलीसिचे पैसे मिळणार आहेत तर त्याचे पेपर्स वेळेत पाठवून द्या," त्या सांगत होत्या.

"अरे, हा बरी आठवण केलीस. मागे आपण नाशिकला असताना  तुझी पॉलिसी काढली होती ती पण शोधून ठेव." तात्यासाहेबांनी बायकोला सांगितले.

मंडळी, काय झालं! तात्यासाहेबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी पॉलिसी काढल्या होत्या.

आता जर त्यांना पॉलिसीचे दस्तऐवज नाही सापडले तर त्याची नक्कल प्रत (duplicate policy) मिळण्यासाठी त्यांना संबंधित विमा शाखेशी संपर्क करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

काय मंडळी, वाचूनच डोकं ठणकलं की नाही!

देव करो आणि तात्यासाहेबांची कागदपत्रे मिळो!

घटना क्र.३

"आता कुठे आणि कसं शोधायचं हा एक मोठा प्रश्नच आहे!" पाटील मॅडम मनाशीच उद्वेगाने म्हणाल्या.

तेवढ्यात बँक मॅनेजर केबिन मध्ये आले.

“आपल्या सह्या झाल्या का?” त्यांनी विचारले.

“हो.” पाटील मॅडमनी सर्टिफिकेट्स पुढे केली.

श्री पाटील यांनी अजून कुठे-कुठे गुंतवणूक केली आहे याची त्यांना कल्पना येत नव्हती. म्हंटलं तर, घरी येणाऱ्या पत्रव्यवहारावरून म्युच्युअल फन्ड, शेयर्स, विमा पॉलीसी आहेत हे कळत होत पण त्यांची ठोस अशी पूर्णपणे माहिती त्यांच्याकडे नव्हती.

मंडळी, ह्या घटनांमधून आपल्याला काय दिसते तर, मनस्ताप, अगतिकता, असहाय्यपणा.

केलेल्या गुंतवणुकीतून वेळेत पैसे उभे रहावेत अशी प्रत्येकाची माफक अपेक्षा असते आणि ती रास्तच आहे. पण त्याला पडलेल्या मर्यादा आपण वरील प्रसंगांतून बघितल्या.

जर, सुनीलने विम्याचे कागदपत्र सोबतच नेले असते तर तिथून दाव्याच्या (maturity) फॉर्मवर सही करून कुरियर ने पाठवले असते.

जर, तात्यासाहेबांनी आपल्या नोकरीचे स्वरूप बघता अधिक जागरूक राहून कागदपत्रे सांभाळली असती तर?

श्री पाटील ह्यांच्या निधना नंतर झालेला मनस्ताप त्यांच्या पत्नीला झाला नसता. जर त्यांनी सजगपणे त्यांची गुंतवणूक वेळच्या-वेळी माहित करून घेतली असती.

मंडळी! आपण जाणता की, ह्या जर-तर ला काही अर्थ नसतो.

आणि 'अर्थात' तर कधीच नसतो.

पण मग ह्या मानवी स्वभावाला म्हणा किंवा त्यावेळच्या परिस्थितीच्या मर्यादेला काही उपाय नाही का?

युरेका SSSSSS!

अहो, असे दचकू नका!

आता विमापॉलीसीचे आपण Dematerialization म्हणजेच डिमॅट स्वरूपात जतन करू शकता.

(ह्यात दस्तऐवज (documents) डिजिटल स्वरूपात संकेत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे कागदपत्रे सांभाळण्याची गरज नाही.)

मंडळी, काय म्हणालात?

"त्याने काय होणार?"

अहो, म्हणजे सुनीलने पॉलिसिच्या दाव्याच्या कागदपत्रावर सही करून सोबत  डिमॅटच्या  स्वरूपातील मूळ पॉलिसीचे दस्तऐवज जोडले की झालं.  जगाच्या पाठीवर कुठूनही त्याला ही सेवा उपलब्ध.

सौ. पाटील सारख्यांची चिंताच मिटेल कारण एकाच डिमॅट स्टेटमेंटमध्ये त्यांना शेअर्स, म्युच्युअल फन्ड आणि विम्याचा सर्व तपशील उपलब्ध होईल.

मंडळी!

आणि आता तात्यासाहेबांना आपल्या मंडळींना (spouse) शोध कामाला लावायची गरज पडणार नाही. सर्व काही एका क्लीकवर उपलब्ध असेल.

सध्या ही सेवा काही मर्यादित विमा कंपन्यापुरतीच उपलब्ध आहे.

आपल्याला काय करता येईल?

खाली नमूद केलेल्या संकेत स्थळाला भेट देऊन Insurance Repository विषयी अधिक जाणून घ्या.

https://nir.ndml.in

Sunil - Tatyasaheb - Patil

'Hello, Sunil!'
“How are you?”
“You haven’t called in a long time!!”
“When are you coming to India?”

“Not sure yet, But I don’t think I will come in the near future, not for the next 2-3 years”, replied Sunil.

Friends, Sunil lives in America, and his insurance policy has matured. But as he won’t be coming to India soon, he will not be getting the policy claims on time owing to the delay in the submission of original policy documents.

 Incident No. 2

“Your mother called a couple of days ago. The policy you subscribed to while you were at Kolhapur has matured, and the money will be disbursed, so please send the original documents pertaining to this policy.” Tatyasaheb’s wife was telling him.

“Oh yes, Good that you reminded me; we had subscribed one more policy in your name while we were in Nashik; please keep those policy documents ready too,” Tatysaheb asked his wife to do so.

Friends, Due to his transferable job, Tatyasaheb had taken policies from various places.

Now, if they are not able to find the original policy documents, they shall have to contact the respective branch office of the policy company and will need to submit the necessary documents to get the duplicate copy.

So, you must have got tense after reading this, isn’t it?

We pray that Tatyasaheb gets his necessary policy documents!!

Incident No. 3

“Where and how do I find it is a big question,” Mrs Patil murmured to herself in resentment.

Just during then, the Bank manager entered the cabin and asked, “Did you sign the documents?”

“Yes”, and Mrs Patil handed the certificates.

Mrs Patil was not able to contemplate where all Mr Patil had made his investments. Actually, she knew that the investments were made in shares, mutual funds, policies etc., based on the letters and communications received at home; however, she did not have any confirmed list of investments.

Friends, what we see from these incidents are Frustration, resentment, and helplessness.

Everybody has a meagre and genuine expectation that the investments can be liquidated in need of time. And we also saw the limitations in the above situations.

Had Sunil taken the original documents along with him, he could have signed the claim documents and sent them by courier.

Had Tatyasaheb been careful, considering his job profile, and preserved the documents properly!!

Mrs Patil would also not have to go through this frustrating ordeal had she learnt about the investments Mr Patil made from time to time while he was still alive.

Friends, we all know that these tales of ifs and buts are not useful at all and are all the more useless when it comes to monetary transactions.

But then, do such laxity or limitations have any remedies?

Eureka SSSSS!!!!!!

Oh! Don’t be bewildered!!

Now, one can preserve the policy in the form of De-materialization (Demat)

And how would it be helpful? An obvious question!!

This means Sunil has to attach the policy in the form of a Demat along with the claim form. In such a way, he can get the money at any place in the world.

People like Mrs Patil can go carefree as she can have all the details in one single Demat statement of all the investments in shares, mutual funds, and policies.

This is dematerialization. 

Friends!

And Tatysaheb shall not need to put his wife on the job of locating and searching the policy documents. All of these are accessible with one click.

Presently this service and facility are available for a few limited Policy companies. 

What you can do is visit the URL stated below and get more information about all this.

https://nir.ndml.in

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'