अनुदिनी १८ - “आनंद” / Blog 18 - "Anand"

आनंद

मागच्या आठवड्यात मस्त लॉन्ग वीकएंड मिळाला.

पावसाची रिपरिप चालू होती आणि मस्त दुपारची झोप होऊन हातात चहाचा कप होता. समोरच शेल्फवर  "आनंद" पिच्चरची सीडी दिसली.

जे आज ५० - ६० वयाच्या पुढे आहेत, त्यांनी "आनंद" नक्कीच बघितला असणार! अमिताभच्या करियरची सुरवात खऱ्या अर्थाने ह्या पिच्चरने झाली, असं म्हणतात. सोबत होता "काका" म्हणजे "राजेश खन्ना".  मला वाटतं  "अभिताभ व राजेश खन्नाचा" हा  एकमेव सिनेमा असावा.

पिक्चरचे स्क्रिप्ट उत्तम होतच पण गाणीसुद्धा भावस्पर्शी होती.

"ज़िन्दगी कैसी है पहेली  हाय, कभी तो हँसाए, कभी ये रुलाये"

मंडळी! ह्यातील शेवटचा सिन एकदम अंगांवर काटे आणणारा!

राजेश खन्ना मरणाशी झुंजत असतो त्याला प्रचंड श्वास लागलेला असतो. त्याचे हे हाल इतरांना बघवत नसतात पण ते हताश असतात. काकाला  नाटकांची आवड असते त्याच्या एका आवडत्या नाटकातील टेप तो लावायला सांगतो.

"मौत तू एक कविता है ..... " . इकडे काकाच्या श्वासाची गती वाढलेली असते आणि थोड्याच वेळात "बाबू मोशाय SSSSS "  अशी मोठयाने हाक मारून काका जातो.

सगळेच एकदम स्तब्ध आणि शांत आणि तेव्हड्यात काकाचा धीर-गंभीर आवाज पुन्हा ऐकूं  येतो "बाबू मोशाय SSSS " सगळे एकदम दचकून बेडकडे बघतात, काका निशब्ध पहुडलेला असतो पण समोरचा टेप सुरु झालेला असतो.

मंडळी! हा शेवटचा सीन जरूर बघा.

काकाने एकदम सही काम केलय!

बर, असो! तर सांगायचं काय होत, तर काकाला कॅन्सर झालेला असतो!

मंडळी, असे एकदम सिरियस होऊ नका राव!

अहो, आज तुमच्या, आमच्या माहितीतील डझनभर लोकांना हा आजार होऊन गेल्याचे आपल्याला माहिती असेल. म्हणजे, आजार गेला आणि व्यक्ती पूर्णपणे बरी झाली. अहो अगदी लांब कशाला जाता, आमच्या कुटुंबातील व्यक्तीला हा आजार होऊन गेला.

त्यावेळची मनाची धाकधूक आणि धावपळ आम्ही अनुभवली आहे. झालेला उपचारावरचा, औषधावरचा  खर्च जरी मेडीक्लेमने दिला तरी, ओला-उबरने येणे-जाणे आणि इतर फुटकळ वाटणारा खर्च आम्हाला त्यावेळेस चांगलाच जाणवला.

तर मंडळी ह्या घरच्या भेद्याला (कारण, आपल्याच शरीराने आपल्या विरुद्ध पुकारलेले हे बंड असते ना राव!) नेस्तनाबूत करण्यासाठी काही वर्ष निकराने झुंज द्यावी लागते.

गनीम तसा चिवट असतो!

तर सांगायचं काय होतं तर, ह्या करता बरीच रसद (पैसा) पुरवावी लागते.

त्याकरता ह्या युद्धात मेडीक्लेम सोबत मित्र पक्षाची, भा.आ.महामंडळाच्या (LIC ) “कॅन्सर कव्हर” ची मदत घेणे हे उचित ठरते.

 हि योजना काय आहे?

  • सदर योजना ही निश्चित फायदे (Fixed Benefit) देणारी योजना आहे. म्हणजे, खर्च कितीही झाला असला तरी विमारक्कमेच्या २५ टक्के,  हे जर हि व्याधी प्रार्थमिक स्वरूपातील असेल तर दिले जातात आणि जर तिने प्रार्थमिक टप्पा ओलांडला असेल तर पूर्ण १०० टक्के विमा रक्कम दिली जाते.
  • त्या सोबत ह्या दुसऱ्या टप्प्यात रु १० हजार दर महिना (दहा लाखाच्या विमा रक्कमेवर) १० वर्षे दिले जातात जरी ती व्यक्ती हयात असो वा नसो.
  • सर्वात महत्वाचे, पुढील सर्व विमाहप्ते माफ केले जातात.
  • मंडळी, ह्या विमाहप्त्याला ८० डी कलमा अंतर्गत, कर सवलत हि मिळते.

मग, केव्हा भेटूया?

Anand

The last week had a nice long weekend.

It was drizzling incessantly, and I was having a cup of hot tea after my afternoon nap. And then, my eyes spotted the Videos CD of “Anand” on the shelf.

People who are above 50 years of age must have surely watched this movie. They say that the career of Amitabh Bachhan actually got a start after this movie. His co-star was “KAKA,” i.e., Rajesh Khanna. I guess this could be the only movie of Amitabh & Rajesh Khanna.

The script of the movie was undoubtedly good, and the songs, too, were emotional.

"ज़िन्दगी कैसी है पहेली  हाय, कभी तो हँसाए, कभी ये रुलाये"

Friends, the last scene of this movie is too sentimental and hair-raising.

Rajesh Khanna is fighting for life and is panting for breath. Nobody can dare watch his agony, but they know they are helpless. Kaka is fond of drama, and he asks to play the tape of his favourite Drama as his last wish.

“मौत तू एक कविता है .....” & Kaka is breathing heavily. He breaths his last by loudly calling out, “Babu Moshay ssss”

Everybody is still and quiet, and then suddenly, the sound of “Kaka” reverberates in the room again, calling out “Babu Moshay”. Everyone is taken aback and scared, looking at the bed, “Kaka” is lying on the bed lifeless, but it is the tape that is playing “Kaka’s” voice.

Friends, please watch this last scene for sure.

“Kaka” has really played this role superbly.

So, let it be! I wanted to tell you that “Kaka” was suffering from Cancer in this movie.

Friends, don’t be serious.

Nowadays, Cancer has become a ubiquitous and mundane ailment, and we know more than a dozen people who are ailing from this disease. With the advancement of technology and science, Mankind has started defeating cancer now. People are fully recovering from cancer. Let me tell you, even one of our family members fully recovered from it. We were worried and frightened then. Though the medical expenses were refunded by the Mediclaim policy, expenses of travelling by OLA-UBER were exorbitant.

Friends, this cancer is our own home-bred enemy (because it is our own body that has retaliated against itself) and has to be defeated with great and firm resolve. 

This enemy is a hard nut to crack.

I wanted to say that it needs a lot of money to treat this disease.

And hence along with the Mediclaim policy, it is prudent to have a “Cancer Cover” policy from LIC. 

Now, what is this scheme?

  • This policy is fixed benefits giving policy. It means, irrespective of the expenses incurred, 25% of the policy assured amount is disbursed when the cancer is in the first stage. If cancer has crossed the first stage, 100% of the policy assured amount is disbursed.
  • Further to the above, ₹. 10,000/- per month (against a policy of ₹. 10 Lacs) is paid for 10 years, even if the patient is alive or not.
  • And most importantly, in the second case, all the premiums are waived.
  • Friends, this also fetches an income tax rebate under the Section 80D clause on the premium.

So! When do we meet?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !