Posts

अनुदिनी - २० 'ओपन टायटल' / Blog -20 'Open Title'

Image
ओपन टायटल दारावरची बेल वाजली, अप्पासाहेबांनी कुरियर घेतलं आणि टीपॉयवर ठेवलं. स्वारी परत पेपर वाचनात गुंग झाली. हे आमचे अप्पासाहेब, नुकतेच रिटायर्ड झाले होते. दोन्ही मुलांची नुकतीच लग्न झाली होती. आता साहेब संसाराच्या जबाबदारीतून अगदी मुक्त झाले होते. ह्या नवीन वळणावर त्यांची गाडी अजून रुळलेली नव्हती. ते थोडे जास्तच निवांत झाले होते. झोपण्या-उठण्याच्या ,खाण्या-पिण्याच्या वेळेचं गणित बसवण्याच्या भानगडीत न पडता त्यांचा आपला मनमौजी दिनक्रम चालू होता. दारावरची बेल वाजली, तुषारने, अप्पासाहेबांच्या मुलाने दार उघडले. हा,या! तुषारने आलेल्या व्यक्तीला बसवलं. "हा फॉर्मचा सेट आहे" ती व्यक्ती उद्गारली. “ह्या सूचना पत्रावर (intimation letter) सही करा आणि सोबत मृत्यूदाखल्याची प्रत जोडा.” त्या व्यक्तीने पुस्ती जोडली. मंडळी, अप्पासाहेब अचानक निवर्तले. हो! हा, सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. कुटुं...

अनुदिनी - १९ 'असा मी असा मी' / Blog -19 'Asa mi Asa mi'

Image
असा मी...असा मी! एकदा मी असाच हिच्याबरोबर कापडखरेदीला गेलो होतो. हिचं नेहमीप्रमाणं ते हे काढा हो,ते ते काढा हो, चाललं होतं. मी थोडासा इतर गिऱ्हाहीकांकडे (customers) पाहण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात ही म्हणाली, "कसं आहे हो अंग?" (fairness) मी म्हटलं, "खूपच गोरं आहे नाही?" “गोरं?” असं म्हणून ही एवढ्यांदा ओरडली की मी ज्या गोऱ्या अंगाकडे पाहत होतो तेदेखील दचकलं. लुगडं (saree) हे अंग झाकण्यासाठी असतं अशी माझी समजूत. आता लुगड्यालाही अंग असतं हे मला काय ठाऊक ! नागपूर, महेश्वर, इरकल, इचलकरंजी, कांजीवरम, बनारस, वगैरे गावं पुरुषांचा सूड घेण्यासाठी स्थापन झाली आहेत. एकदा मला ही अशीच म्हणाली होती, "हा पडवळी रास्ता बरा आहे का बैंगणीच घेऊ?" मला आधी हा रास्ता कोण ते ठाऊक नव्हतं. पण पडवळ (snake gourd) ही गोष्ट नावडती असल्यामुळं “हा बैंगणीच बरा दिसतोय,” म्हणून मी एका लुगड्यावर (saree) हात ठेवला. 'इश्शं! अहो, हाच तर पडवळी आहे !" लगेच मी चलाखी करून म्हटलं, ...

अनुदिनी १८ - “आनंद” / Blog 18 - "Anand"

Image
आनंद मागच्या आठवड्यात मस्त लॉन्ग वीकएंड मिळाला. पावसाची रिपरिप चालू होती आणि मस्त दुपारची झोप होऊन हातात चहाचा कप होता. समोरच शेल्फवर  "आनंद" पिच्चरची सीडी दिसली. जे आज ५० - ६० वयाच्या पुढे आहेत, त्यांनी "आनंद" नक्कीच बघितला असणार! अमिताभच्या करियरची सुरवात खऱ्या अर्थाने ह्या पिच्चरने झाली, असं म्हणतात. सोबत होता "काका" म्हणजे "राजेश खन्ना".  मला वाटतं  "अभिताभ व राजेश खन्नाचा" हा  एकमेव सिनेमा असावा. पिक्चरचे स्क्रिप्ट उत्तम होतच पण गाणीसुद्धा भावस्पर्शी होती. "ज़िन्दगी कैसी है पहेली  हाय, कभी तो हँसाए, कभी ये रुलाये" मंडळी! ह्यातील शेवटचा सिन एकदम अंगांवर काटे आणणारा! राजेश खन्ना मरणाशी झुंजत असतो त्याला प्रचंड श्वास लागलेला असतो. त्याचे हे हाल इतरांना बघवत नसतात पण ते हताश असतात. काकाला  नाटकांची आवड असते त्याच्या एका आवडत्या नाटकातील टेप तो लावायला सांगतो. "मौत तू एक कविता है ..... " . इकडे काका...

अनुदिनी -१७ "बळवंत जोशी – चिन्मय" / Blog-17 "Balwant Joshi - Chinmay"

Image
बळवंत जोशी – चिन्मय बळवंतराव, रांगेतून बाहेर पडले. पासबुकातील रक्कम त्यांनी नजरेखालून घातली आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. टाळयांच्या कडकडाटात श्री बळवंत जोशी ह्यांच्या निरोप समारंभाची सांगता झाली. कंपनीच्या नियमानुसार त्यांना सोडण्यासाठी गाडी आणि बरोबर HR चा हेड होता; चिन्मय नुकताच जॉईन झाला होता. “साहेब, निघायचं?” चिन्मयने बुके व प्रेझेन्टस ठेवता ठेवता विचारलं. “Yes! Young Boy!” जोशीसाहेबांनी ब्लेझर शोफरकडे दिला आणि रिलॅक्स होऊन बसले. “साहेब, आता पुढे काय?” चिन्मयने गप्पांकडे विषय वळवला. अरे! पुढे काय ह्याचे मला काही विशेष वाटत नाही कारण आवडत्या क्षेत्रात काम करून अर्थाजन करावयाचे ठरवलेले होते त्यामुळे कामात आनंद होता त्यामुळे उगीचच निवृत्तीकडे (retirement) डोळे लागलेले नव्हते. आता तेच काम पुढेही करायचे. काय आहे चिन्मय, आपण उगीचच ५८, ६० ह्या आकड्यांचा बागुलबुवा करून घेतो आणि नवीन काही शिकायची उमेद मारतो. “ओ! YES! म्हणजे, तुम्ही अजून शिकणार?” “Wow, Sir! ...

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

Image
राजेश खन्ना-हेमा मालीनी “ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “ओडले एड्लीई ओ…” काय मंडळी, हे गाणं आपल्या परिचयाचं नसेल असं होणारच नाही. वाचता, वाचता तुम्ही ते मनात गुणगुणायला सुरवात देखील केली असणार. बरोबर ना! अहो, गाण्यातले शब्द तर अर्थपूर्ण आहेतच पण हे गाणं ज्या दोघांवर चित्रित (picturized) केलंय ती, दोघं ही त्यावेळची एकदम सुपरहिट जोडी ना राव! त्यामुळे भट्टी एकदम मस्त जमली! ह्या गाण्यात राजेश खन्ना, हेमामालिनीला घेऊन ज्या प्रकारे बुलेट चालवतो…, त्याचे ठीक आहे राव, तशी गाडी चालवण्याचे त्याला पैसे मिळाले, पण आपलं काय? एकतर, "मामा" आपल्याला बाजूला घेईल आणि आपलंच पाकीट खाली करेल आणि ह्या पावसात अशी गाडी चालवल्यावर, तर आपलं रद्द केलेलं लायसन्स परत मिळवण्यासाठी आपण धडधाकट असू की नाही ते माहित नाही. पण, आयुष्याच्या त्या वळणावर अशी झोकदार डबलसीट गाडी आपण चालवली असेलच, जरी नसेल चालवली, तरी ...

चाय पे चर्चा - Chai Pe Charcha

Image
चाय पे चर्चा "काय जोशी साहेब!" "डिक्लेरेशन, चा फॉर्म भरला का?" "अरे! भरला आहे, पण या ८० सी च्या दिड लाखाने गोची करून ठेवलीये ना!" “हां! ते तर सर्वांचंच कायमचं दुखणं आहे”, बळवंतरावांनी दुजोरा दिला. "पण मग, NPS अकाऊंट उघडा की राव!" बळवंतराव पुटपुटले. "अरे, ते माहित आहे! पण आज माझं वय आणि रिटार्यमेन्ट चं वय बघता ह्या ६ - ७ वर्षात NPS मध्ये पैसे भरून काय उपयोग?" "अगदी पूर्ण पन्नास हजार जरी ह्या ६ - ७ वर्षात भरले तर ह्या ३.५० - ४ लाखात पेन्शन ती काय मिळणार?" "त्या पेक्षा टॅक्स भरलेला बरा!", वैतागून जोशी खुर्चीत बसले. हसत हसत, बळवंतरावांनी चहाचा मस्त भुरका घेतला. तेवढ्यात, जोशींचापण चहा आला. "घे, अगोदर चहा घे! मग सांगतो काय करता येईल ते!" बळवंतराव उत्तरले. “तू हस लेका!” “तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड ना!” “दर, ३ - ५ वर्षांनी नव-नवीन गाड्या घ्याल, लेटेस्ट लॅपटॉप घ्याल, आणि मग कर वाचवायचा म्हणून त्...

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

Image
ज्यूलीचे प्रश्न नमस्कार मंडळी! आज रविवार आणि मला खात्री आहे,आज ब्लॉग वर काय लिहिलंय ह्या उत्सुकतेने आपण आपल्या गॅझेटवर क्लीक केले असणार. काय बरोबर ना! हो, आज थोडासा वेगळा विषय! मंडळी, आमच्या व्यवसायाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी "मिलिअन डॉलर राऊंड टेबल" ही अमेरिकेत स्थित विशेषकरून विमा क्षेत्रातील उच्च व्यावसायिकांची एक संघटना आहे (Premium Association of Financial Professionals) ह्या ठिकाणी खास करून विमा विक्रीच्या संबंधातील काळानुरूप बदलत जाणारे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. तसेच, वैयक्तिक विकासासोबत समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या विकासासाठी ही जगभरात कार्यक्रम राबवणे, असे समाजभिमुख कामही, ही संघटना १९३७ पासून करत आहे. मंडळी! माणसासाठी भावनिक गुंतवणूक ही फार महत्वाची असते. संपूर्ण आयुष्यात कळायला लागल्या पासून मनात उद्भवलेल्या भावनांच्या बळावरच तो सर्वसाधारण व्यवहार करत असतो. सर्व धावपळीचं, तथाकथित नियोजनाचं सार हे आपापल्या भावविश्वात राहून एक...

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

Image
आग्रह आणि स्मोकिंग दारातून पेपर टाकून पेपरवाला पळाला. बळवंतरावांनी पेपर उचलला तर आतील पत्रक (Pamphlet) खाली पडले. कोणत्यातरी विम्याच्या योजनेची जाहिरात होती. शांतपणे बळवंतरावानी ते पत्रक बाजूला ठेऊन पेपर उलगडला. मंडळी! गेल्या सहा महिन्यांपासून आपण माझ्या अनुदिनीच्या माध्यमातून संपर्कात आहात. आपल्याला जाणवलं असेल कि, विमा योजनांच्या व्यतिरिक्त इतर गुंतवणुकीच्या विषयीच जास्त लिहिलं गेले, कारण जस सिगारेटच्या पाकिटावर वैज्ञानिक ईशारा असतो तसं विमा योजनांच्या जाहिरातीत शेवटी एक वाक्य असते "विमा एक आग्रहाची विशेष वस्तू आहे" (Insurance is the subject matter of solicitation). तर, मंडळी ज्या बाबतीत आग्रह करावा लागतो अश्या नावडत्या विषयावर जास्त लिहिण्यात काय अर्थ! बरोबर ना! पण, मंडळी! आग्रह म्हंटला ना की, छान जेवणाच्या पंक्तीतला बासुंदी नाहीतर श्रीखंडाकरिता केलेला प्रेमळ आग्रह आठवतो. विम्याच्या बाबतीत तो नको असतो पण त्याचे फायदे हवे असतात आणि मंडळी गंमत म्हण...

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

Image
तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! शेंगदाणा तेल ५ लिटर, साखर ६ किलो, चहा पावडर १ किलो. बाबा, अरे, आता सगळी यादी वाचून दाखवु की काय? प्राजक्ता वैतागून म्हणाली. अग नको, फक्त महत्वाच्या जिन्नसा (items) वाच म्हणालो, म्हणजे काही रहायला नको.  तुझ्या शॉपिंग कार्ट मध्ये किती टोटल झाली? डॅड, ६ के!, प्राजक्ता उत्तरली. डॅड, मी मागची शॉपिंग हिस्टरी तपासली सगळ्या जिन्नसा (items) घेतल्यात पण टोटल जवळपास ६०० ने वाढली. अगं, भाववाढ ही होतच असते. चल, असे म्हणून योगेशने आपल्या मुलीलातर पिटाळले पण सहज कुतूहल म्हणून ऍपवर १५ वर्षानंतरची भाववाढ तपासली. मंडळी! खरं पाहिलं तर, एका ठराविक वर्षानंतर आपला खर्च किती वाढला असेल हे नक्की सांगता येणार नाही. पण, साधारण वयाच्या ५० ते ५५ दरम्यान असणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के उत्पन्नाची सोय ही निवृत्ती नंतरच्या पुढील २० ते २५ वर्षाकरिता असलेली उत्तम. आणि हो, ही सगळी खर्चाची गणितं मांडत असतानाच आपल्या मनाला शांतता, विरुंगुळा कशात मिळतो हे ही ह्या वयात चाचपडायला सुरवात...

घर..घर ! Ghar..Ghar !

Image
घर .. घर ! अरे, संज्या पुढच्या महिन्यात दोन दिवस लागून सुट्टी आली आहे, तुझ्या अलिबागच्या घराची किल्ली देशील का? अरे, Why not! जा! जाऊन ये! गॅस पासून AC पर्यंत सगळ्या सोयी केलेल्या आहेत. मस्त आराम करून ये आणि हो गरज पडलीच तर शेजारच्या वाडीतील मावशी स्वयंपाक करायला येतील, एकदम झक्कास स्वयंपाक बनवतात. संजू उत्साहाने सांगत होता. संजू ने नुकतीच पन्नाशी पार केली होती. एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी, असे चौकोनी कुटुंब. चिरंजीव अभियांत्रिकी शाखेत तर कन्या फ़ॅशन डिझाइनर मधे करियर करण्याच्या प्रयत्नात. संजू, एकहाती हा तंबू पेलत होता. आज संजूचा राहत्या घरासोबत त्याच्या आवडत्या सेकंडहोमचाही हप्ता (EMI) चालू होता. दोन्ही मुलांना येत्या १ - २ वर्षात बाहेर जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा मनोदय, पण संजूकडे त...

सुकेष्णा - Sukeshna

Image
सुकेष्णा ताई, पासबुकं ठेवली हाय. जरा बँकेत जाल का? नाव, सुकेष्णा! वय अंदाजे ३० च्या आसपास. सदा हसमुख! लोकांची घरकामे करून संसाराला हातभार लावणारी. नवरा प्लम्बिंगची कामे करतो. पदरी दोन मुली. शिक्षण न झाल्यातच जमा पण व्यवहार जाणणारी. कामाला चुणचुणीत! लॉकडाऊन च्या दिवसात त्यांच्या भागात बरेच धान्य वाटप होत होते. बाई एकदम हुशार आणि मेहनती. त्या सामानातून वडे,भजी बनवून विकून बाईने १०-१५ हजार कमावले. मंडळी! आत्ता हा अचानक बायोडेटा कशाला? असा प्रश्न आपल्याला पडला असणार! बरोबर ना! सांगतो! अगं SS सुकेष्णा! तुझं पासबुक आणलय S गं भरून! आणि हो! सोबत एक फॉर्म आणलाय त्यावर सही करून दे! स्वयंपाकघरातून (Kitchen) पदराला हातपुसत सुकेष्णा बाहेर आली आणि फॉर्मवर बिनबोभाट (without hesitation) सही करून...