अनुदिनी -१७ "बळवंत जोशी – चिन्मय" / Blog-17 "Balwant Joshi - Chinmay"

बळवंत जोशी – चिन्मय

बळवंतराव, रांगेतून बाहेर पडले.

पासबुकातील रक्कम त्यांनी नजरेखालून घातली आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

टाळयांच्या कडकडाटात श्री बळवंत जोशी ह्यांच्या निरोप समारंभाची सांगता झाली.

कंपनीच्या नियमानुसार त्यांना सोडण्यासाठी गाडी आणि बरोबर HR चा हेड होता; चिन्मय नुकताच जॉईन झाला होता.

“साहेब, निघायचं?” चिन्मयने बुके व प्रेझेन्टस ठेवता ठेवता विचारलं.

“Yes! Young Boy!”

जोशीसाहेबांनी ब्लेझर शोफरकडे दिला आणि रिलॅक्स होऊन बसले.

“साहेब, आता पुढे काय?” चिन्मयने गप्पांकडे विषय वळवला.

अरे! पुढे काय ह्याचे मला काही विशेष वाटत नाही कारण आवडत्या क्षेत्रात काम करून अर्थाजन करावयाचे ठरवलेले होते त्यामुळे कामात आनंद होता त्यामुळे उगीचच निवृत्तीकडे (retirement) डोळे लागलेले नव्हते. आता तेच काम पुढेही करायचे.

काय आहे चिन्मय, आपण उगीचच ५८, ६० ह्या आकड्यांचा बागुलबुवा करून घेतो आणि नवीन काही शिकायची उमेद मारतो.

“ओ! YES! म्हणजे, तुम्ही अजून शिकणार?”

“Wow, Sir! You are great!”

“अरे, सध्याची परिस्थितीच अशी आहे की, ह्या ही वयात तुम्हाला बौध्दिक आणि शारीरिक फिटनेस ठेवायचाच आहे. निवृत्ती (retirement) ही संकल्पनाच (concept) बाद ठरणारी आहे.”

जोशींनी आपल्या चष्म्याची काच पुसत विधान केलं.

पण, सर! तरीही, Regular Income साठी तुम्ही काय नियोजन (planning) केले?

अरे! आपलं सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना (PPF) आहे की!

परवाच जाऊन PPF चं पासबुक भरून आणलं, ४० लाखाचा आकडा पार केला आहे.

आता, ते मी एका ब्लॉक करता म्हणजे ५ वर्षासाठी वाढवलं (extend).

“ओके, मग!”

त्यातून ह्या शिल्लकीच्या (Balance) जास्तीत जास्त ६०% रक्कम एका ब्लॉक मध्ये (पाच वर्षात) घेऊ शकतो.

आणि एक महत्वाचं, आपल्याला पगारात, दर तीन महिन्यांनी महागाई भत्ता (Variable Dearness Allowance) मिळतो.

हो, बरोबर!

ह्या, सार्वजनिक भविष्य निर्वाह योजनेत (PPF), दरवर्षी एप्रिल च्या १ ते ४ तारखेदरम्यान तू अगदी ५०० रुपये जरी भरलेस ना, तरी जमा असलेल्या रक्कमेवर त्या वर्षाचे पूर्ण व्याज मिळेल.

समज, मी ४० लाखातले २ लाख काढले, आता ३८ लाखावर, ५ टक्के जरी व्याज मिळाले ना (रु १.९० हजार ) तर, मी म्हणेन मला महागाई भत्ता (VDA) मिळाला!

“वा! Simple but quiet interesting Sir!” चिन्मयच्या भुवया उंचावल्या.

हे व्याज (Interest) अधिक शिल्लक (Balance) ह्यावर पुढल्या वर्षी परत व्याज, अशी चक्रवाढ (compounding) निदान दहा - बारा वर्षे चालूच राहील की!

बाकीच्याही काही गोष्टी आहेत, "ड्राइव्हर सर्कल वरून उजवीकडे घे!", जोशींनी सूचना दिली.

"हा, कॉर्नरची दुसरी बिल्डिंग!"

“ओक सर! सुखी माणसाचा सदरा म्हणतात तो हाच तर!”, चिन्मय हसतहसत म्हणाला.

ड्राइव्हरने प्रेझेन्ट व बुके घेतले आणि जोशींनी हसत हसत चिन्मयचा निरोप घेतला.

Balwant Joshi - Chinmay

Balwantrao stepped out of the queue.

He had a sense of satisfaction when he eyed the balance in the passbook.

The sendoff of Mr. Balwant Joshi culminated with a thunderous ovation.

As per the company rules, the company car would drop him to his house and the HR head would also accompany his journey to the house. Chinmay had very recently joined as the HR head.

“Let’s start, Sir” asked Chinmay while stowing the bouquets and the presents.

“YES! Young boy” replied Balwantrao and sat in car relaxed while handing over the blazer to the chauffer.

“Sir, now what next?” asked Chinmay breaking the silence into some conversation.

“See! I never bothered myself with that question – What next? I had decided to make my living by working in the field that I liked. So that gave pleasure in work and hence I had never looked forward to retirement.”

“Chinmay, we, unnecessarily fear the age of 58 / 60 and brand it as retirement age. This, unknowingly, kills our enthusiasm and interest in learning new things.”

“Oh! YES, that means you are going to pursue studies?” “Wow Sir, you are great!”

“The prevailing situation mandates you to keep your physical and mental fitness good and up to date. The concept of retirement is slowly fading and getting outdated.” Said Joshi wiping his spectacles.

“Yet, Sir! What planning have done for regular income?”

“We have the PPF scheme for this, young man”

“Recently I got my PPF passbook updated. I have a balance of more than ₹. 40 Lacs.  And I am extending it for one more block, i.e., 5 more years.”

“Ok, so” asked Chinmay

“I can withdraw maximum 60% of the prevailing balance in a one block (5 years). Ah and yeas one more important thing, we get Variable dearness allowance in our salary”

“Yes, right” agreed Chinmay

“If you just deposit ₹. 500/- in your PPF account between 1st and 4th of April then you get full interest on the balance in the account”.

“Suppose I withdrew ₹. 2 Lacs out of the ₹. 40 Lacs and if I get just about 5% interest (₹. 1.9 Lacs) on ₹. 38 Lacs, then it is like getting the Variable DA.

“Wow, Simple but interesting Sir” said Chinmay with an awe.

Thus, the interest plus balance will fetch interest again the next year and this compounding cycle shall continue over the next 10 to 12 years!!

There are a few other things too.

“Take the next right at the circle” instructed Joshi to the driver. “The second building around the corner”

“Ok, sir! It was nice and interesting talking to you. You have enlightened me” said Chinmay

The driver retrieved the bouquets and presents & Balwant Joshi bade farewell to Chinmay

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !