चाय पे चर्चा - Chai Pe Charcha

चाय पे चर्चा

"काय जोशी साहेब!" "डिक्लेरेशन, चा फॉर्म भरला का?"

"अरे! भरला आहे, पण या ८० सी च्या दिड लाखाने गोची करून ठेवलीये ना!"

“हां! ते तर सर्वांचंच कायमचं दुखणं आहे”, बळवंतरावांनी दुजोरा दिला.

"पण मग, NPS अकाऊंट उघडा की राव!" बळवंतराव पुटपुटले.

"अरे, ते माहित आहे! पण आज माझं वय आणि रिटार्यमेन्ट चं वय बघता ह्या ६ - ७ वर्षात NPS मध्ये पैसे भरून काय उपयोग?"

"अगदी पूर्ण पन्नास हजार जरी ह्या ६ - ७ वर्षात भरले तर ह्या ३.५० - ४ लाखात पेन्शन ती काय मिळणार?"

"त्या पेक्षा टॅक्स भरलेला बरा!", वैतागून जोशी खुर्चीत बसले.

हसत हसत, बळवंतरावांनी चहाचा मस्त भुरका घेतला. तेवढ्यात, जोशींचापण चहा आला.

"घे, अगोदर चहा घे! मग सांगतो काय करता येईल ते!" बळवंतराव उत्तरले.

“तू हस लेका!”

“तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड ना!”

“दर, ३ - ५ वर्षांनी नव-नवीन गाड्या घ्याल, लेटेस्ट लॅपटॉप घ्याल, आणि मग कर वाचवायचा म्हणून त्यावर घसारा (depreciation) घ्याल EMI च्या व्याजावर (interest) वजावट (deduction) घ्याल!”

“अरे लेका, ह्या चहाचं बीलपण तू क्लेम करशील, बिझनेस प्रमोशन एक्सपेन्सेस म्हणून!”

“भरडले जातो ते आम्हीच!”

जोशी फारच वैतागले होते.

“अरे, वैतागू नकोस! एक पर्याय आहे.” बळवंतराव सांगू लागले.

“हे बघ, तू आता ६ वर्षांनी रिटायर्ड होतोयस, तेव्हा तू ५८ चा असशील.”

“काय करायचं, दरवर्षी पन्नास हजार NPS मध्ये भर. साधारण ८ टक्क्याने तुझा फन्ड वाढत गेला तर वयाच्या ५८ व्या वर्षी तो साधारण ४ लाखापर्यंत पोहचलेला असेल. बरोबर!”

“हा, मग?” काहीतरी पर्याय सापडला म्हणून जोशींचे डोळे चमकले.

आता, तुला पेन्शन ६० व्या वर्षांपासून सुरु होणार होती बरोबर?

तर, उरलेली पुढची २ वर्षे कमीत-कमी रक्क्म NPS मध्ये भर!

“त्याने, काय होणार?” इती, जोशी.

“अरे, तुझ्या युनिट्सचं मूल्यांकन (valuation) जर ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी झालं तर तू पूर्ण रक्कम काढू शकतोस.”

“त्यामुळे, तुटपुंजी ( nominal amount) पेन्शन घेण्याची तुला सक्ती नाही!”

“काय, पटलं का?” बळवंतरावांनी खुलासा केला.

मंडळी, आपण काय कराल!

अनिवासी भारतीय (NRI) व परदेशी नागरिकत्व असेलेली भारतीय वंशाची व्यक्ती (OCI) सुद्धा NPS चे खाते उघडू शकते.

NPS अकाऊंट मधून पेन्शन सुरु होण्याच्या वेळेस आपण खालील पैकी एक पर्याय निवडू शकता,

१. फन्डाच्या पूर्ण रकमेवर पेन्शन घेणे.

२. फन्डाच्या ६० टक्के रक्कम काढणे आणि उर्वरित रकमेवर पेन्शन घेणे.

३. जर फन्डाचे मूल्यांकन (valuation) ५ लाख किंवा कमी असेल तर पूर्ण रक्कम काढून घेणे.

Chai Pe Charcha

Hello, Joshi Saheb! Did you submit the declaration form?”

“Yes, of course, but the 80C clause of 1.5 Lacs has ruined all my plans.”

“Ya, That is the problem with everyone,” Balwantrao seconded.

“But then, why don’t you opt for NPS” Murmured Balwantrao.

“Yes, I know, but considering my present age and the age of retirement, I barely have 6 to 7 years. What is the use of investing in NPS for such a small span?”​

Even if I accumulate about 4 Lacs by investing 50,000/- per annum over these 6 to 7 years, I would just get some meager amount as pension “I would, rather, pay the tax,” Mr. Joshi said out of frustration.

Balwantrao slurped his tea as Joshi, too, got his tea.

“Have your tea first, I will tell you what can be done after the tea,” said Balwantrao as he laughed.

“Hmm, Laugh it off, man! You are self-employed; after every 3 to 5 years, you change your car, buy the latest laptop, then save tax by claiming depreciation, avail deduction on EMI’s interest, etc., etc.”

“You would as well claim this tea bill on account of business promotion” The frustration of Joshi was apparent.

“Keep calm Joshi, there is one good option” continued Balwantrao.

“After 6 years, when you will be 58, you will retire, so invest about 50,000/- in NPS. Your fund would grow about 8%, approximately ₹. 4 Lacs. Right?”

“Yes, then!” Joshi’s eyes gleamed at the newly found option.

“Your pension will commence from the age of 60, right? So, you further invest the bare minimum amount for 2 years in NPS,” said Balwantrao.

“Then?” asked Joshi.

“If the valuation of your units is less than ₹. 5 Lacs, then you can withdraw the entire amount, and you won’t be compelled to avail yourself the scanty pension that would be earned from ₹. 5 Lacs. Do you agree?” Clarified Balwantrao.

Friends, what you should do!

Note that NRI and Foreign nationals of Indian Origin too can open the NPS account.

You can choose any of the following options at the time of commencement of the pension,

1. Avail pension on the entire amount of your NPS fund.

2. Withdraw 60% of your NPS fund and avail of pension on the balance amount.

3. If your fund’s valuation is less than EQ to 5 Lacs, you can withdraw the entire amount.

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'