सुकेष्णा - Sukeshna

सुकेष्णा

ताई, पासबुकं ठेवली हाय. जरा बँकेत जाल का?

नाव, सुकेष्णा!

वय अंदाजे ३० च्या आसपास.

सदा हसमुख!

लोकांची घरकामे करून संसाराला हातभार लावणारी.

नवरा प्लम्बिंगची कामे करतो. पदरी दोन मुली.

शिक्षण न झाल्यातच जमा पण व्यवहार जाणणारी.

कामाला चुणचुणीत!

लॉकडाऊन च्या दिवसात त्यांच्या भागात बरेच धान्य वाटप होत होते. बाई एकदम हुशार आणि मेहनती. त्या सामानातून वडे,भजी बनवून विकून बाईने १०-१५ हजार कमावले.

मंडळी! आत्ता हा अचानक बायोडेटा कशाला? असा प्रश्न आपल्याला पडला असणार!

बरोबर ना!

सांगतो!

अगं SS सुकेष्णा! तुझं पासबुक आणलय S गं भरून!

आणि हो! सोबत एक फॉर्म आणलाय त्यावर सही करून दे!

स्वयंपाकघरातून (Kitchen) पदराला हातपुसत सुकेष्णा बाहेर आली आणि फॉर्मवर बिनबोभाट (without hesitation) सही करून दिली.

अग, तुला महिन्याला सहाशे रुपये बाजूला काढायला जमेल का?

असं विचारून ताईने तिला योजना समजावून दिली.

मंडळी!

सोबत दिलेल्या तक्त्यावरून (Chart) आपल्याला वयानुसार भरावयाचा हप्ता व पेन्शन आणि पश्चात मिळणारी रक्कम ह्याची माहिती मिळेल.

“अटल पेन्शन” ही एक दुर्लक्षित राहिलेली योजना आहे असे मला वाटते.

अधिक माहिती करता आपण https://npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Scheme_Details.pdf ह्या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

Sukeshna

“Tai, I have kept my passbook, Will you please go to the bank?”

Name: Sukeshna, 

Age:  Around 30 Years.

Always with a smile on her face!!

Works as a housemaid and helps to support her family by earning some income. Has two daughters; the Husband is a plumber. Sparsely educated yet well acquainted with the daily chores.

Smart at work.

During the lockdown, they used to get ample food grains through the free aid scheme for the poor in the area she lived. So, this toiling and the smart lady used to make “wade” & “bhajji” and sell them. She earned close to ₹.15 thousand by selling these.

Friends! Wondering, suddenly, why this Bio-data?

Right?

Let me explain!

“Sukeshna, Your passbook is updated. And yes, there is a form along with it; please sign that form.”

Sukeshna came out of the kitchen, wiping her hands on her stole, and signed the form without any apprehension.

“Will you be able to spare ₹ 600/- every month?” Madam asked her and explained the scheme to her.

Friends! The chart indicates the payable premium as per the age.

It also shows the amount of pension that one will get during old age and the amount after death, respectively.

“Atal pension” is one such neglected scheme, in my opinion.

For more detail you may visit the following link... https://npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Scheme_Details.pdf

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !