तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद !

शेंगदाणा तेल ५ लिटर, साखर ६ किलो, चहा पावडर १ किलो.

बाबा, अरे, आता सगळी यादी वाचून दाखवु की काय?

प्राजक्ता वैतागून म्हणाली.

अग नको,

फक्त महत्वाच्या जिन्नसा (items) वाच म्हणालो, म्हणजे काही रहायला नको. 

तुझ्या शॉपिंग कार्ट मध्ये किती टोटल झाली?

डॅड, ६ के!, प्राजक्ता उत्तरली.

डॅड, मी मागची शॉपिंग हिस्टरी तपासली सगळ्या जिन्नसा (items) घेतल्यात पण टोटल जवळपास ६०० ने वाढली. अगं, भाववाढ ही होतच असते. चल, असे म्हणून योगेशने आपल्या मुलीलातर पिटाळले पण सहज कुतूहल म्हणून ऍपवर १५ वर्षानंतरची भाववाढ तपासली.

मंडळी!

खरं पाहिलं तर, एका ठराविक वर्षानंतर आपला खर्च किती वाढला असेल हे नक्की सांगता येणार नाही. पण, साधारण वयाच्या ५० ते ५५ दरम्यान असणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के उत्पन्नाची सोय ही निवृत्ती नंतरच्या पुढील २० ते २५ वर्षाकरिता असलेली उत्तम.

आणि हो, ही सगळी खर्चाची गणितं मांडत असतानाच आपल्या मनाला शांतता, विरुंगुळा कशात मिळतो हे ही ह्या वयात चाचपडायला सुरवात करावी आणि त्यातून थोडेफार अर्थाजन झाले तर उत्तमच.

कारण होते असे की, बरेचदा आपल्या ५५ ते ५८ च्या दरम्यान मुलांना त्यांच्या लग्नानंतर त्यांचे घर घ्यायला, सजवायला आपल्याकडून मदत केली जाते. एकाच शहरात असूनही आई-वडिल व मुलं वेगवेगळे राहतात; साहजिकच खर्च वाढतो. त्यामुळे, निवृत्ती नंतर पुढे जमेल तेवढे आपल्या आवडीच्या कामातून थोडेफार अर्थाजन व्हावे ह्या अनुषंगाने वयाच्या पन्नाशी नंतर जरूर नियोजन करावे.

बँकेत, पोस्टात पैसे गुंतवून त्या व्याजावर साठी नंतरचा काळ स्वस्थ बसून घालवणे हे दिवस गेले.

निसर्ग नियमानुसार शरीर प्रकुर्तीत बदल हा होणारच. जवळच्या आप्तजनांचा वियोग सहन करावा लागणारच. अशा वेळी नुसता बँक बॅलन्स उपयोगाचा नसून आपली मानसिक तंदुरुस्ती ही खूप महत्वाची!

तर मंडळी, त्यासाठी मनाला कुटुंबात, संसारात गुंतवून ठेवण्यापेक्षा आपल्या आवडत्या छंदांत गुंतवून ठेवणे हे कधीही उत्तम!

हीच खरी निवृत्ती!

ह्या वयात तोच खरा जिवाभावाचा सखा, आपला आप्तजन असेल.

काय मंडळी, थोडं सेंटी (sentimental) झालात का!

असो, तर आपल्याला काय करायचं?

पन्नाशीच्या आसपास ह्या करता एखाद्या इंडेक्स फन्डमध्ये गुंतवणूक सुरु करावी जो पुढील ८

ते १० वर्षाच्या कालावधीत आपल्याला नेहमीच्या गरजांव्यतिरिक्त इतर आवडत्या कामाकरता वापरता येईल.

काय मग! करायची का सुरवात?

Toor Dal, Chana Dal & Hobbies !

“5 liters Groundnut oil, 6 KG Sugar, 1 KG Tea - Dad! Should I read the entire shopping list now?”

Prajakta exclaimed in resentment.

“No! I said just read aloud the important items so that they are not missed out. So! What is the total cost of items in the shopping cart?”

“Dad, it's 6000” Answered Prajakta. “Dad, I just checked the shopping history and compared the cost of all the items. The total cost has increased by about ₹. 600”

“Dear, inflation is a part of life. Okay,” Yogesh ended the conversation and sent his daughter for shopping. And out of curiosity, he just checked the inflated costs over the last 15 years in the app.

Friends!

Actually, it is very difficult to estimate the increase in our expenses over a stipulated period. However, it is always better to provision about 60 to 70 percent of the income that we earn at 50 or 55 for the upcoming 20-25 years.

Off course, while tallying all these expenses, one should start exploring avenues to keep one busy and engaged, and possibly if this engagement is a source of earning, it is most welcome. Because, many times, when one crosses the age of 55 or 58, the children expect some financial support from the parents to set up their homes as they are starting up after being newly married.

Though the parents and children stay in the same town, they stay separate, and obviously, this leads to increase expenditures. Therefore, planning to pursue the job one likes and earn some money through this job after retirement is definitely a good idea.

Investing in banks and post office and earning interest is not a feasible idea today. Also, aging is accompanied by ailments, and consequently losing the near and dear ones will be grievous. In such events, it is very important to have, not only a bank balance, but our mental health also needs to be good.

So, Friends, it is essential that you keep yourself engaged in your favorite hobby rather than just being emotionally attached to the family alone.

This means “REAL RETIREMENT”

This hobby will be your emotional partner during this age.

Friends, you all got a bit sentimental! Isn’t it?

That’s okay, now what do we do?

Start investing in any of the index funds that will be useful for provisioning for siring your hobbies apart from helping you meet your regular expenses.

So, shall we start?

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'