Posts

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

Image
राजेश खन्ना-हेमा मालीनी “ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “ओडले एड्लीई ओ…” काय मंडळी, हे गाणं आपल्या परिचयाचं नसेल असं होणारच नाही. वाचता, वाचता तुम्ही ते मनात गुणगुणायला सुरवात देखील केली असणार. बरोबर ना! अहो, गाण्यातले शब्द तर अर्थपूर्ण आहेतच पण हे गाणं ज्या दोघांवर चित्रित (picturized) केलंय ती, दोघं ही त्यावेळची एकदम सुपरहिट जोडी ना राव! त्यामुळे भट्टी एकदम मस्त जमली! ह्या गाण्यात राजेश खन्ना, हेमामालिनीला घेऊन ज्या प्रकारे बुलेट चालवतो…, त्याचे ठीक आहे राव, तशी गाडी चालवण्याचे त्याला पैसे मिळाले, पण आपलं काय? एकतर, "मामा" आपल्याला बाजूला घेईल आणि आपलंच पाकीट खाली करेल आणि ह्या पावसात अशी गाडी चालवल्यावर, तर आपलं रद्द केलेलं लायसन्स परत मिळवण्यासाठी आपण धडधाकट असू की नाही ते माहित नाही. पण, आयुष्याच्या त्या वळणावर अशी झोकदार डबलसीट गाडी आपण चालवली असेलच, जरी नसेल चालवली, तरी ...

चाय पे चर्चा - Chai Pe Charcha

Image
चाय पे चर्चा "काय जोशी साहेब!" "डिक्लेरेशन, चा फॉर्म भरला का?" "अरे! भरला आहे, पण या ८० सी च्या दिड लाखाने गोची करून ठेवलीये ना!" “हां! ते तर सर्वांचंच कायमचं दुखणं आहे”, बळवंतरावांनी दुजोरा दिला. "पण मग, NPS अकाऊंट उघडा की राव!" बळवंतराव पुटपुटले. "अरे, ते माहित आहे! पण आज माझं वय आणि रिटार्यमेन्ट चं वय बघता ह्या ६ - ७ वर्षात NPS मध्ये पैसे भरून काय उपयोग?" "अगदी पूर्ण पन्नास हजार जरी ह्या ६ - ७ वर्षात भरले तर ह्या ३.५० - ४ लाखात पेन्शन ती काय मिळणार?" "त्या पेक्षा टॅक्स भरलेला बरा!", वैतागून जोशी खुर्चीत बसले. हसत हसत, बळवंतरावांनी चहाचा मस्त भुरका घेतला. तेवढ्यात, जोशींचापण चहा आला. "घे, अगोदर चहा घे! मग सांगतो काय करता येईल ते!" बळवंतराव उत्तरले. “तू हस लेका!” “तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड ना!” “दर, ३ - ५ वर्षांनी नव-नवीन गाड्या घ्याल, लेटेस्ट लॅपटॉप घ्याल, आणि मग कर वाचवायचा म्हणून त्...

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

Image
ज्यूलीचे प्रश्न नमस्कार मंडळी! आज रविवार आणि मला खात्री आहे,आज ब्लॉग वर काय लिहिलंय ह्या उत्सुकतेने आपण आपल्या गॅझेटवर क्लीक केले असणार. काय बरोबर ना! हो, आज थोडासा वेगळा विषय! मंडळी, आमच्या व्यवसायाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी "मिलिअन डॉलर राऊंड टेबल" ही अमेरिकेत स्थित विशेषकरून विमा क्षेत्रातील उच्च व्यावसायिकांची एक संघटना आहे (Premium Association of Financial Professionals) ह्या ठिकाणी खास करून विमा विक्रीच्या संबंधातील काळानुरूप बदलत जाणारे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. तसेच, वैयक्तिक विकासासोबत समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या विकासासाठी ही जगभरात कार्यक्रम राबवणे, असे समाजभिमुख कामही, ही संघटना १९३७ पासून करत आहे. मंडळी! माणसासाठी भावनिक गुंतवणूक ही फार महत्वाची असते. संपूर्ण आयुष्यात कळायला लागल्या पासून मनात उद्भवलेल्या भावनांच्या बळावरच तो सर्वसाधारण व्यवहार करत असतो. सर्व धावपळीचं, तथाकथित नियोजनाचं सार हे आपापल्या भावविश्वात राहून एक...

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

Image
आग्रह आणि स्मोकिंग दारातून पेपर टाकून पेपरवाला पळाला. बळवंतरावांनी पेपर उचलला तर आतील पत्रक (Pamphlet) खाली पडले. कोणत्यातरी विम्याच्या योजनेची जाहिरात होती. शांतपणे बळवंतरावानी ते पत्रक बाजूला ठेऊन पेपर उलगडला. मंडळी! गेल्या सहा महिन्यांपासून आपण माझ्या अनुदिनीच्या माध्यमातून संपर्कात आहात. आपल्याला जाणवलं असेल कि, विमा योजनांच्या व्यतिरिक्त इतर गुंतवणुकीच्या विषयीच जास्त लिहिलं गेले, कारण जस सिगारेटच्या पाकिटावर वैज्ञानिक ईशारा असतो तसं विमा योजनांच्या जाहिरातीत शेवटी एक वाक्य असते "विमा एक आग्रहाची विशेष वस्तू आहे" (Insurance is the subject matter of solicitation). तर, मंडळी ज्या बाबतीत आग्रह करावा लागतो अश्या नावडत्या विषयावर जास्त लिहिण्यात काय अर्थ! बरोबर ना! पण, मंडळी! आग्रह म्हंटला ना की, छान जेवणाच्या पंक्तीतला बासुंदी नाहीतर श्रीखंडाकरिता केलेला प्रेमळ आग्रह आठवतो. विम्याच्या बाबतीत तो नको असतो पण त्याचे फायदे हवे असतात आणि मंडळी गंमत म्हण...

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

Image
तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! शेंगदाणा तेल ५ लिटर, साखर ६ किलो, चहा पावडर १ किलो. बाबा, अरे, आता सगळी यादी वाचून दाखवु की काय? प्राजक्ता वैतागून म्हणाली. अग नको, फक्त महत्वाच्या जिन्नसा (items) वाच म्हणालो, म्हणजे काही रहायला नको.  तुझ्या शॉपिंग कार्ट मध्ये किती टोटल झाली? डॅड, ६ के!, प्राजक्ता उत्तरली. डॅड, मी मागची शॉपिंग हिस्टरी तपासली सगळ्या जिन्नसा (items) घेतल्यात पण टोटल जवळपास ६०० ने वाढली. अगं, भाववाढ ही होतच असते. चल, असे म्हणून योगेशने आपल्या मुलीलातर पिटाळले पण सहज कुतूहल म्हणून ऍपवर १५ वर्षानंतरची भाववाढ तपासली. मंडळी! खरं पाहिलं तर, एका ठराविक वर्षानंतर आपला खर्च किती वाढला असेल हे नक्की सांगता येणार नाही. पण, साधारण वयाच्या ५० ते ५५ दरम्यान असणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के उत्पन्नाची सोय ही निवृत्ती नंतरच्या पुढील २० ते २५ वर्षाकरिता असलेली उत्तम. आणि हो, ही सगळी खर्चाची गणितं मांडत असतानाच आपल्या मनाला शांतता, विरुंगुळा कशात मिळतो हे ही ह्या वयात चाचपडायला सुरवात...

घर..घर ! Ghar..Ghar !

Image
घर .. घर ! अरे, संज्या पुढच्या महिन्यात दोन दिवस लागून सुट्टी आली आहे, तुझ्या अलिबागच्या घराची किल्ली देशील का? अरे, Why not! जा! जाऊन ये! गॅस पासून AC पर्यंत सगळ्या सोयी केलेल्या आहेत. मस्त आराम करून ये आणि हो गरज पडलीच तर शेजारच्या वाडीतील मावशी स्वयंपाक करायला येतील, एकदम झक्कास स्वयंपाक बनवतात. संजू उत्साहाने सांगत होता. संजू ने नुकतीच पन्नाशी पार केली होती. एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी, असे चौकोनी कुटुंब. चिरंजीव अभियांत्रिकी शाखेत तर कन्या फ़ॅशन डिझाइनर मधे करियर करण्याच्या प्रयत्नात. संजू, एकहाती हा तंबू पेलत होता. आज संजूचा राहत्या घरासोबत त्याच्या आवडत्या सेकंडहोमचाही हप्ता (EMI) चालू होता. दोन्ही मुलांना येत्या १ - २ वर्षात बाहेर जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा मनोदय, पण संजूकडे त...

सुकेष्णा - Sukeshna

Image
सुकेष्णा ताई, पासबुकं ठेवली हाय. जरा बँकेत जाल का? नाव, सुकेष्णा! वय अंदाजे ३० च्या आसपास. सदा हसमुख! लोकांची घरकामे करून संसाराला हातभार लावणारी. नवरा प्लम्बिंगची कामे करतो. पदरी दोन मुली. शिक्षण न झाल्यातच जमा पण व्यवहार जाणणारी. कामाला चुणचुणीत! लॉकडाऊन च्या दिवसात त्यांच्या भागात बरेच धान्य वाटप होत होते. बाई एकदम हुशार आणि मेहनती. त्या सामानातून वडे,भजी बनवून विकून बाईने १०-१५ हजार कमावले. मंडळी! आत्ता हा अचानक बायोडेटा कशाला? असा प्रश्न आपल्याला पडला असणार! बरोबर ना! सांगतो! अगं SS सुकेष्णा! तुझं पासबुक आणलय S गं भरून! आणि हो! सोबत एक फॉर्म आणलाय त्यावर सही करून दे! स्वयंपाकघरातून (Kitchen) पदराला हातपुसत सुकेष्णा बाहेर आली आणि फॉर्मवर बिनबोभाट (without hesitation) सही करून...

भाडे की हप्ता? - Rent or EMI ?

Image
भाडे की हप्ता? नमस्कार मंडळी! समीरला नुकताच H1B व्हिसा मिळाला. गेले तीन वर्ष तो अमेरिकेत होता. MS, पूर्ण केलं आणि नंतर OPT वर एक वर्ष काम केलं आणि लगोलग पहिल्या प्रयत्नात त्याला H1B व्हिसा मिळाला. कॉलेजच्या आणि उमेदीच्या दिवसात तो रेन्टेड अपार्टमेंटमध्ये रहात होता, ह्या दिवसात साधारण १८०० ते २००० डॉलर महिना च्या आसपास तो भाडे देत होता. मंडळी! सांगायची विशेष बाब ही की, आज त्याच भाड्याच्या किंमती एवढ्या EMI मध्ये त्याने स्वतःचे घर घेतले. शिळफाट्यावरून ठाण्याकडे जात होतो,नेहमीचीच होर्डिंग्ज, सुंदर कॉम्प्लेक्सच्या जाहिरातींनी सजली होती.पण आज मनात वेगळेच विचार घोळत होते. आजूबाजूला मोठमोठे नावाजलेले गृहप्रकल्प (Housing Projects) पूर्ण होऊन त्यांचे नवीन प्रकल्प ही (Projects) सुरु झाले होते.एकेका गृहप्रकल्पात साधा...

एक दुपार ! - One Afternoon !

Image
एक दुपार ! दुपारची वेळ होती. कॉल संपवून घरीच निघायच्या घाईत होतो. पार्किंग मधून गाडी बाहेर काढतांना समोरच्या बसटॉपवर रावसाहेब दिसले. अहो SS रावसाहेब! मी हाक मारली. “गेल्या आठदिवसापासून आमची ही हॉस्पिटलमध्ये आहे. डबा घेऊन चाललोय. तिथे जेवणाची सोय आहे, पण ही चवीने खाणारी! सध्या मॉर्निंग वॉक हा असा चाललाय.” रावसाहेब हसत हसत म्हणाले. ह्या ही परिस्थितीत, रावसाहेब आपली विनोदबुद्धी टिकवून होते. गेले वर्षभर असं चालू आहे. दिनेशची आणि सुनेची पण हॉस्पिटलची वारी चालू असते, सुट्या संपल्यात, आता "विदाऊट पे" वर चकरा चालूच आहेत. दरवेळेस टॅक्सी परवडत नाही, म्हणून हा असा इथे उभा,बसची वाट बघत! चेहऱ्यावर तोच मिस्कीलपणा ठेवत रावसाहेब मन मोकळे बोलते झाले. मंडळी! रावसाहेबांची मेडीक्लेम पॉलिसी होती, त्यामुळे हॉस्पिटलच्या खर्चाची तशी त्यांना चिंता नव्हती. पण जरी ते परिस्थीला हसत सामोरे जात होते तरी इतर गोष्टीतला होणारा खर्च हा नजरेआड होत नव्हता, त्याची झळ पोहचत होतीच. ते खर्च मेडीक्लेम पॉलि...

नुकसान भरपाई - Indemnify

Image
/> नुकसान भरपाई नमस्कार मंडळी! आपल्याला, “To indemnify the loss and not to make a profit” हे विधान माहित आहे का? मंडळी! हे विधान सर्वसाधारण विमा व्यवसायास (General Life Insurance) लागू होते, ज्यात, मेडिक्लेम, बिल्डिंग, मशीनरी, गाडी-घोडा इ. चा विमा अंतर्भूत होतो. आता म्हणाल, आज एकदम गाडी-घोडयावर? हा! तर, झालं असं! रोहन, म्हणजे माझ्या मित्राच्या मुलाला कार घ्यायची होती. पठ्याने अगोदरच ऑनलाईन टेस्ट-ड्राईव्ह बुक केली होती. मस्त पैकी अर्धातास रपेट मारली. मलापण गाडी आवडली, मस्त १८ इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि एकदम हटके डिझाईन, SUV च्या वरच व्हेरिएंट होतं. काका! आवडली का? रोहनने विचारलं. येस! एकदम मस्त! आणि पठ्याने, थोड्याच वेळात गाडी बुक केली पण. ...

अक्षय पात्र -Akshay Patra

Image
अक्षय पात्र मंडळी ! मागचा "फुलपुडीचा" ब्लॉग वाचून एक जेष्ठ आप्त म्हणाले "मिलिंद, अरे! जुन्या गोष्टींची आठवण झाली रे!. त्या वेळेस १२ टक्के व्याज घ्यायचो,आता सगळंच कठीण आहे! या ६ - ७ टक्क्यात कसं काय होणार?". मी म्हणालो, "अहो काका! त्यावेळेस आपण व्याजावर लक्ष दिलेत, पण जर आपण तेव्हा वर्षासन (Annuity) च्या योजना निवडल्या असत्या तर आजही तुम्हाला ११ टक्के परतावा मिळाला असता". मित्रांनो! गुंतवलेल्या रक्कमेवरील परताव्याचे (Returns) चार प्रकार असतात, व्याज,कुपन रेट,लाभांश (Dividend), भाडे (Rent) आणि वर्षासन (Annuity). व्याज म्हणाल तर ते ठराविक कालावधीसाठी ठराविक दराने मिळते. कुपन रेट हा रोख्यावरील (Bond) परताव...