अक्षय पात्र
मंडळी ! मागचा
"फुलपुडीचा" ब्लॉग वाचून एक जेष्ठ आप्त म्हणाले "मिलिंद, अरे! जुन्या
गोष्टींची आठवण झाली रे!. त्या वेळेस १२ टक्के व्याज घ्यायचो,आता सगळंच
कठीण आहे!
या ६ - ७ टक्क्यात कसं काय होणार?".
मी म्हणालो, "अहो काका! त्यावेळेस आपण व्याजावर लक्ष दिलेत, पण जर आपण
तेव्हा वर्षासन (Annuity) च्या योजना निवडल्या असत्या तर आजही तुम्हाला
११ टक्के परतावा मिळाला असता".
मित्रांनो! गुंतवलेल्या रक्कमेवरील परताव्याचे (Returns) चार प्रकार
असतात, व्याज,कुपन रेट,लाभांश (Dividend), भाडे (Rent) आणि वर्षासन
(Annuity).
व्याज म्हणाल तर ते ठराविक कालावधीसाठी ठराविक दराने मिळते.
कुपन रेट हा रोख्यावरील (Bond) परतावा निश्चित करत असतो. रोख्याच्या
(Bond) खरेदी व विक्रीच्या किंमतीनुसार ह्या परताव्याचा दर बदलत असतो.
म्हणजे, रु १००० दर्शनी किमतीचे (Face Value) चे रोखे जर ६% कुपन रेट ने
बाजारात आले तर वर्षाला रु ६० परतावा असेल पण उद्या हेच रोखे बाजारात रु
९०० ला विकले गेले तर घेणाऱ्याला त्याचा परताव्याचा दर ६.६७% असेल. कारण
ठरल्या प्रमाणे त्यालाही रु ६० चाच कुपन रेट मिळेल पण रोख्याच्या (Bond)
खरेदीच्या किंमतीनुसार त्याचा दर हा बदललेला असेल [(६०/९००) * १००].
लाभांश च्या बाबतीत म्हणाल तर तो कंपनीच्या, फ़ंडाच्या कामगिरीवर अवलंबून
असतो. बदलणारा असतो.
तर, एखाद्या स्थावरजंगम मालमत्तेचे भाडे (Rent) हे बऱ्याच इतर बाबींवर
अवलंबून असते. ठराविक कालावधी नंतर करारनाम्याचे नूतनीकरण (Renewal),
देखभाल (Maintenance), मालमत्ता कर (Municipal Tax) ई. गोष्टींची
जबाबदारी असते.
मंडळी! वर्षासन हे कायमस्वरूपी उत्पन्न देणारे गुंतवणुकीचे एक साधन असुन
ते एका ठराविक दराने (Fixed rate) ठरवलेल्या पद्धतीने (MLY,QLY,HLY,YLY)
एका ठराविक तारखेला त्या व्यक्तीच्या बँक खात्यात आयुष्यभर (Rest of the
life) जमा होत रहाते.
ह्यातील ठळक बाब अशी की, ते एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती संयुक्तिकपणे
(Jointly) ही घेऊ शकतात. ज्याच्या मुळे खात्रीपूर्वक परताव्याची
(Guaranteed Returns) हमी पहिल्या व्यक्तीच्या पश्चात दुसऱ्या व्यक्तीस
त्याच्या आयुष्यभर मिळते; एका शाश्वत उत्पनाची (Guaranteed Returns)
तरतूद करता येते. ज्याच्यावर, बदलत्या व्याजदराचा परिणाम होत नाही, हे
विशेष!
मंडळी! आमच्या ह्या आजोबांनी १५-१६ वर्षापूर्वी जर रु १० लाखाचे वर्षासन
(Annuity) घेतले असते तर आजही त्यांना रु १,१०,००० (११ टक्के दराने) मिळत
राहिले असते.
राव, नोकरी दरम्यान मिळणारा महागाई भत्ता (Variable Dearness Allowance)
निवृत्ती नंतरही मिळावा ह्या साठी आपण काय करतो? का, आपल्याला असे वाटते
की, नोकरी संपली आता महागाईचा व आपला संबंध संपला?
मंडळी, नक्कीच नाही!
उलटपक्षी मिळालेल्या ठराविक पुंजीतून (Fixed Amt.) पुढील अनिश्चित
काळाकरता (Indefinite period) खर्चाची तरतूद करणे हे मोठे जिकरीचे
(Exhausting), कारण ही पुंजी (Fixed Amt.) म्हणजे जणू बादलीतील पाणी,
उपसले की संपले, त्यात कायम स्वरूपी उत्पन्नाची जोड नसणार.
थोडक्यात, आपल्या आयुष्याच्या संध्याकाळचे (Retirement period) आर्थिक
गणित मांडताना, कायम स्वरूपी निश्चित उत्पन्न (Guaranteed Income) आणि
उत्पन्नात वाढ ह्यांचा समन्वय (combination) साधणे अत्यावश्यक.
ह्यासाठी, वर्षासना सोबत, रोखे, व्याज व लाभांश देणारी आणि म्युच्युअल
फ़ंडातील Passive Fund मधील गुंतवणूकही काही प्रमाणात योग्य.
थोडक्यात वर्षासन म्हणजे पानाच्या मध्यभागी वाढलेला मस्त गरमागरम
वरण-भात, वर तुपाची धार आणि बरोबर लिंबाची फोड. खरी भूक भागावणारे,
तब्येत सांभाळणारे जेवण.
तर, उत्पन्नाचे इतर पर्याय हे, लोणचे,चटणी, कोशिंबीर, फक्त चवीला!
पानाच्या डाव्या बाजूला, कोपऱ्यात वाढलेले.
काय मंडळी,
जमला का बेत?
जरूर कळवा.
|
wah wah milindji deliciously explained
ReplyDeleteवा सकाळी सकाळी वाफाळलेला भात, वरण आणि वर तुपाची धार.... व्वा झक्कास बेत... धन्यवादच
ReplyDelete