अनुदिनी ७० - बेड चार्जेस / Blog 70 – Bed Charges


नमस्कार, मंडळी!

काय म्हणता?

कसे आहात?

नुकताच दसरा येऊन गेला. आता दिवाळीचे वेध. आणि आता तर काय मोदी साहेबांनी ‘GST’ माफीची भेट देऊ केलीय. त्यामुळे यंदा दिवाळीत जरा जास्तच फटाके फुटतील!

बंर, असो!

राव, ह्या GST वेव्हरने खरा सुस्कारा कोणी सोडला असेल ना तर तो, ‘जेष्ठ नागरिकांनी!’

का बरं?”  म्हणून विचारताय!

अहो, मेडिक्लेमचे प्रिमियम!

ज्या टक्यांनी ‘मेडिक्लेम’ चे प्रिमियम वाढत आहेत ती बघता बरेच जण वार्षिक प्रिमियम भरण्यासाठी बॅंकेत आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit) सुरु करत आहेत.

अहो, बरोबरच आहे ना!

पन्नास-साठ हजाराचा फटका एकदम एका महिन्यात, खरोखरच फटकारतो की हो!  आता त्यावर १८ टक्याचा GST नाही, म्हणजे नऊ-दहा हजाराचा सुखद गारवा जेष्ठांच्या खिश्याला ऊब देतोय.

तर मंडळी आता मेडिक्लेमचाच विषय निघालाय तर एक किस्सा आठवला. 



झालं असं की
, आपल्या या कथेतील नायक आप्पासाहेबांना हॅास्पिटलमध्ये भरती करावं लागलं. नेहमीप्रमाणे हॅास्पिटलमधून विचारणा झाली, “मेडिक्लेम आहे का?”

हो, पाच लाखांचा आहे!” 

अप्पासाहेबपण निर्धास्त होते.

पण, बघतात तर त्यांच्या रूममध्ये अजून एक व्यक्ती.

अरे! मेडिक्लेम आहे ना!

तर, आपल्याला स्पेशल रुम हवी” इति अप्पासाहेब.

त्याप्रमाणे अप्पासाहेबांची स्वारी स्पेशल रूममध्ये शिफ्ट झाली.

चार दिवसांनी स्वारीला डिस्चार्ज मिळाला.

एकूण बील झालं चार लाखाच्या आसपास.

मग काय झालं

“विमा तर पाच लाखाचा होता ना?”

अहो राव, इथेच तर सगळा गोंधळ झाला ना!”

अप्पासाहेबांची मुलं पण निर्धास्त होती की ५ लाखाच्या आत बील झालंय म्हटल्यावर विमा कंपनी पूर्ण बील भरणार. पण झालं भलतंच, जवळपास तीन लाख अप्पासाहेबांना खिशातून भरावे लागले की हो!

काय, चमकलात ना!

सांगतो मंडळी, सांगतो!! 

तत्पूर्वी सर्व प्रथम एक नियम लक्षात ठेवा.

मेडिक्लेम विमा पॅालीसीत, आपल्याला विमा रकमेच्या १ टक्का ह्या दरानेच दिवसाचे बेड चार्जेस दिले जातात.(काही विमा कंपन्यांच्या अपवादात्मक योजना वगळता)

तर, आपल्या कथेचे नायक दिवसाला पाच हजार मिळण्यास पात्र होते.

पुढची बाब, तुम्ही ज्या प्रमाणात, टक्क्यात वरील श्रेणीचं‘बेड टेरिेफ’ घेत आहात त्याच प्रमाणात तुम्हाला बीलातील औषधांचा खर्च वगळता इतर खर्च सोसावा लागतो. (काही विमा कंपन्यांच्या योजनांचे अपवाद वगळता)

म्हणजे अप्पासाहेबांनी पाच हजारच्या ऐवजी दिवसाला आठ हजार रुपयाचा‘बेड टेरिफ’ प्लॅन घेतला; त्यांना देय असलेल्या बेड चार्जेसच्या रकमेच्या सरळसरळ साठ टक्के वाढीव.

मंडळी, एक बाब समजून घ्या. विमा कंपनी तुम्ही-आम्ही दिलेल्या प्रिमियमच्या माध्यमातून ‘Pull Fund’ तयार करते आणि ह्या फंडातूनच आलेले दावे दिले जातात. त्यामुळे अप्पासाहेब ह्या पूल फंडात योगदान कमी करुन जास्त रक्कमेचा विम्याचा दावा करु शकत नाहीत. जे विम्याच्या ‘To indemnify the loss and not to make a profit’ ह्या मूलभूत संकल्पनेलाच धक्का पोहचवते आणि म्हणूनच अप्पासाहेबांना दाव्यातील साठ टक्के रक्कम भरावी लागली (ज्याला ‘Copay’ असे संबोधले जाते)

तर, मंडळी वेळीच आपल्या मेडिक्लेमच्या विमा रक्कमे बाबत सजग होऊन निर्णय घ्या.

_____________________________________________________________________



Hello, Friends!

How are you?

We just celebrated Dasara. Now it’s the advent of Diwali. And now Modiji has gifted us with GST reforms. This will lead to a noisier celebration of Diwali.

Anyway!

Actually, the greatest respite of the GST waiver is to the 'senior citizens!'

“How?” is your question!

It is Mediclaim Premium!

Considering the rate at which the premium is increasing, people are arranging it through savings from recurring deposits.

It’s pretty obvious, friends!

A monthly load of about ₹50,000 to ₹60,000 is definitely a jolt, and 18% GST on top of the premium is exorbitant. However, the GST waiver has brought some warmth of ₹9,000 to ₹ 10,000 to the pockets of senior citizens.

Just because we brushed on Mediclaim, I remembered an anecdote.



It so happened that the hero of this story had to be admitted to the hospital, and the mundane question was asked by the hospital: “Do you have Mediclaim insurance?”

"Yes, it is ₹ 5 Lakhs!”

Appasaheb was carefree.

However, he saw another patient in his room.
“Hey, we have Mediclaim, so we need a special room!”

Accordingly, Appasaheb moved to the special room.

After four days, he was discharged.

The total bill was close to ₹ 4 Lakhs.

“So what?”

“Insurance was for 5 Lakhs, right?”

“Friends, this is where the confusion started.”

Appasaheb’s children, too, were under the impression that the bill was less than ₹ 5 Lakhs and the insurance company would pay the entire bill. But it did not happen so; instead, Appasaheb had to shell out around ₹ 3 lacs from his pocket.

This is quite stunning, no?

Let me tell you, but before that, remember this rule.

In the Mediclaim policy, the bed charges paid per day have a cap of 1% of the assured amount. Thus, the hero of our story was eligible to get ₹ 5000 per day.

That is, Appasaheb availed of a bed at ₹8,000 per day, which is 60% more than the allowed amount.

Friend, please understand one thing. The insurance company makes a 'Pool Fund' out of the premiums received from their customers and settle the claims from this fund. 

Therefore, Appasaheb cannot claim a larger amount when he is contributing less to the pool fund, which defeats the very slogan and fundamental principle of the insurance company – “To indemnify the loss and not make a profit” and therefore, Appasaheb had to pay 60% of the claimed amount (which is called a copay)

So friends, it is essential that you get the timely awareness of the Mediclaim insurance amount.

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

फुलपुडी - PhulPudi

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

एक दुपार ! - One Afternoon !