अनुदिनी ४० – ‘I -20’ / Blog 40 – ‘I – 20’
"साहेब फक्त ५ वर्षे प्रीमियम भरायचा आहे” या बोलीवर आकाश ने प्रपोजल फॉर्म वर सही केली. पुढे त्याने विचार केला की सदर प्लॅन हा २० वर्षांचा आहे तर त्यातून मधेच बाहेर न पडणे हे उत्तम! त्यापेक्षा उरलेली वर्षे प्रीमियम भरणे अधिक उचित ठरेल. आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. " बाबा, युनिव्हर्सिटीचा ॲडमिटचा मेल आला!", निशिगंधा आकाशच्या गळ्यात पडत चित्कारली. "आता तुम्ही I -२० ची तयारी कराल ना?" मंडळी! ही, निशिगंधा! वय वर्षे २३, फॅशन डिझायनिंग मधे पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याच्या तयारीत. तीच्या स्वप्नांबरोबर उड्या मारणे आकाशला जड जाणार होते. पण अर्थातच मुलीचा बाप आणि तोही एकुलत्या एका, त्यामुळे त्यालाही उसने बळ आणून तिच्या उड्यांबरोबर स्पर्धा करावी लागत होती. तोंडाला फेस येणे, जीव गुदमरणे, धाप लागणे, पाय गळपटणे, या सर्व विशेषणांचा अनुभव आकाशला तीच्या MS च्या फीचा आकडा ऐकून आला. मागील १०० पिढ्यांच्या उत्पन्नाची गोळा बेरीज करूनही हा आकडा पार होऊ शकत नव्हता. सुदैवाने त्याने १७/१८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ULIP प्लॅन ने त्याला हात दिला. त्याचा 'Investment Portfolio' अगदीच काही त्या शब्दा एवढा वजनदार नव्हता, पण तो इमाने इतबारे साधारण दीड लाख ULIP योजनेत वर्षाकाठी भरत होता. अधून मधून प्रीमियम व्यतिरिक्त अधिक रक्कम पण तो त्यात भरत होता. "अरे, अथर्व! माझा लॅपटॉप आण जरा" आकाश ने मुलाला फर्मान सोडले. निशिगंधाच्या I -20 च्या तयारीच्या अनुषंगाने तो असलेल्या पुंजीची (Funds) उजळणी (Summary) करू लागला.एक, एक, करता जसे आकडे समोर येत गेले तसा त्याचा धीर वाढू लागला. सगळी जमापुंजी ६० लाखाच्या आसपास पोहोचली होती. त्यातील ULIP ची रक्कम च ५० लाख पर्यंत जमली होती. बराच विचार केल्यावर, बाकी रक्कमेकरता 'शैक्षणिक कर्ज' (Education Loan) घेण्यासाठी तो मानसिकरित्या तयार झाला. आता, आकाशने लॅपटॉप टेबलावर ठेवला आणि पाय लांब करून शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. मंडळी आपण काय कराल? PPF (Public Provident Fund) ला पर्याय (परताव्याच्या दराच्या अनुषंगाने) म्हणून जर आपण ULIP योजनांकडे पाहाल तर १५ ते १८ वर्षात आपल्याला १०% परतावा मिळण्यास हरकत नाही. या योजनेत आपल्याला विमछत्रा (Life Insurance) सोबत बाजारातील गुंतवणुकीचा ही फायदा मिळतो. युलिप योजनेत आपण भरत असलेल्या हप्त्यातून (Premium) जरी काही शुल्क (Charges) वजा केले जात असले तरी १५ ते २० वर्षांचा कालावधी विचारात घेता त्याची सरासरी अल्पच असते. सदर योजनेत ‘जोखमीचा’ (Growth), ‘सुरक्षित’ (Secured) अथवा दोघांचा समन्वय असलेले ‘मध्यम स्वरूपातील’ (Balanced) असे फ़ंड निवडीचे पर्याय उपलब्ध असतात, तसेच पॉलिसी दरम्यानच्या काळात निवडलेला पर्याय बदलता पण येतो. इतरही काही गुण वैशिष्ट्ये आहेत. भेटी अंती बोलूच. |
||
“Sir, you need to pay the premium only for 5 years” On this commitment, Akash had signed the proposal form. Later he mulled over that this plan has a tenure of 20 years and it shall be better not to exit it before 20 years! Instead, it shall be apt to pay the premium for the remaining years. And this decision of his was right. “Dad, I got the mail from the university regarding my admission,” said Nishigandha as she hugged her dad. “Now, please prepare for I-20?” Friends! She is Nishigandha. Age 23, Preparing to go to the US for higher education in Fashion Designing. It was going to be difficult for Akash to cope up with her aspirations and dreams. But she was his only daughter, so he was mustering all the strength to support her. Foaming, Suffocation, Panting, Lifelessness – all these feelings were felt by Akash after he learned the amount of the fees of her MS studies in the US. The amount could not be matched even after totaling all the income of the last 100 generations. Fortunately, he had started a ULIP plan about 17 / 18 years ago and this came in handy. His investment portfolio did not live up to the expectation though, but he was investing ₹. 1.5 lakhs every year without fail in the ULIP plan. Sometimes, he also invested some extra amount. “Atharva, please fetch my laptop,” Akash asked his son. He was summing up his funds and investments as regards the 'I-20' preparation for Nishigandha. He let out a sigh of relief as he started looking at the amount that was accumulated. His funds had reached an amount of ₹. 60 Lakhs. ULIP was ₹. 50 Lakhs. After thinking it over for a while, he was prepared to take an education loan of a balanced amount. Akash kept the laptop on the table, stretched his legs, and closed his eyes to relax. Friends, what will you all do? As an alternate option to PPF (in terms of returns), if you contemplate investing in ULIP for 15 to 18 years, then 10% returns can be generally expected. You also get the benefits of life insurance in this plan. Even though some amount of fees are deducted from the premium of ULIP, the average deduction of these fees calculate to be nominal over the investment for 15 to 18 years. In ULIP, the Balanced fund (combination of equity and debt), Growth, or Secured fund options are available, and the selected option can be switched during the tenure of the ULIP policy. There are other features and benefits too. Shall discuss in person. |
Comments
Post a Comment