अनुदिनी ३९ - 'BSc पास कि नापास' / Blog 39 - 'BSc Passed or Failed'

नमस्कार मंडळी!

नुकताच आम्ही आमच्या मित्रांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला.

त्या दिवशी कविता वाचनाचा कार्यक्रम झाला, ती कविता आपल्या सोबत शेअर करतो.

तर, मंडळी!

थोडं कवीते विषयी.

मित्रांनो, कवीला ह्या सतत बदलणाऱ्या जगात, निसर्गचक्रात काही न बदलणारे आकडे दिसत आहेत आणि ह्या आकड्यांचा तो काही संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि काय आश्चर्य कवीला हे शब्द स्फुरले.

कवितेचं नाव आहे ‘बरं झालं,आर्यभट्टाचा जन्म झाला’

सहा ऋतूंचे सहा सोहळे,

सप्त सुरांनी-इंन्द्रधनुंनी जग हे सजले,

आठ दिशांनी दिशा ह्या उजळे,

आणि ऐकंलत का, ऐकंलत का हो, ९ व्या महिन्यात ‘हे’ बाळ जन्मले.

बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!


मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

नाहीतर ९ नंतर च्या आकड्यांची अडली असती गाडी,

नाहीतर टीनएज ची वळली असती बोबडी,

नाहीतर नसते आले की हो धोक्याचे १६ वं वरीस,

नाहीतर नसती आली गद्धेपंच्चवीशी,

आणि मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

आणि साजरा झाला ‘अंजू-विरू’ च्या लग्नाचा २५ वा वाढदिवस.

आणि मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

नाहीतर जमली नसती तुमची आमची १० जणांची गट्टी!

मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!


अश्या प्रकारे काव्य वाचनाने मंडळी आम्ही आमच्या मित्रांचा लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा केला.

आता लग्नाची २५ वर्षे म्हणजे वयाची पन्नाशी ओलांडली की राव!

मग त्याचा आणि निश्चिंतच्या ब्लॉग चा काय संबंध?

मंडळी संबंध आहे.

या वयात दोघेही BSc ची परिक्षा उत्तीर्ण की राव!

काय, चक्रावलात ना!

Blood pressure, Sugar level आणि Cholesterol, ह्या टेस्ट हो!

आपल्या जीवनाला अर्थ प्राप्ती ही अर्थार्जन करताना BSc परीक्षेच्या रिझल्ट मध्ये कमी मार्क मिळवण्यात आहे, त्या करिता ही आयोजन नियोजन हे हवेच.

काय गंमत आहे ना! कमी मार्क मिळवण्यासाठी प्लॅनिंग!

आपण काय कराल?

मंडळी! तब्बेतीची काळजी घ्या.

मी काही आहारतज्ञ नाही, योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि अमलांत आणा.

भलेही आपल्या वारसाला आपण मागे काही ठेवलं नाही तरी चालेल, पण त्याची शुगर टेस्ट Positive होऊ न देणे हे महत्वाचे.

मग तुम्हीपण कमी गुण मिळवणार ना BSc परीक्षेत?

Hello Friends!

Recently, we celebrated the 25th wedding anniversary of one of our friends.

We read a poem during that celebration, which I am sharing with you.

Now, regarding the poem, Friends, the poet can visualize some stable numbers and he is attempting to relate some reference to these numbers.

And to everybody’s surprise, the poet found these words.

The name of the poem is 'Good that Aryabhatt was born.'

सहा ऋतूंचे सहा सोहळे,

सप्त सुरांनी-इंन्द्रधनुंनी जग हे सजले,

आठ दिशांनी दिशा ह्या उजळे,

आणि ऐकंलत का, ऐकंलत का हो, ९ व्या महिन्यात ‘हे’ बाळ जन्मले.

बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

नाहीतर ९ नंतर च्या आकड्यांची अडली असती गाडी,

नाहीतर टीनएज ची वळली असती बोबडी,

नाहीतर नसते आले की हो धोक्याचे १६ वं वरीस,

नाहीतर नसती आली गद्धेपंच्चवीशी,

आणि मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

आणि साजरा झाला ‘अंजू-विरू’ च्या लग्नाचा २५ वा वाढदिवस.

आणि मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!

नाहीतर जमली नसती तुमची आमची १० जणांची गट्टी!

मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला!


And this celebration of the 25th marriage anniversary culminated with the reading of this poem.

25th marriage anniversary means the couple has crossed the age of 50.

What does this have to do with the ‘Nishchints’ blog?

At this age, they both have passed the exam of BSc!!

Confused?

Blood pressure, Sugar level, and Cholesterol – These tests!

Our life becomes meaningful if we pass the BSc exam with 'fewer marks' while earning. And this can be achieved through planning only.

Isn’t it funny? Planning to earn fewer marks?

What will you do?

Friends, take care of your health.

I am not a dietician, so please consult an expert and implement the diet plan.

Though you may not leave behind any property to your heir, ensure that his sugar test will not be positive.

I hope you got my point.

So, you too will attempt to pass the BSc test successfully?

Comments

  1. Great Concept. Great & effective link of ARYABHATTA, Discovery of ZERO, Wedding Anniversary & BSC Pass or Fail

    ReplyDelete

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !