अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'
‘EPS-NPS’ "यावे यावे!" अप्पासाहेबांनी दार उघडून महेशच व त्याच्या सौ चं स्वागत केलं. "अगदी वेळेवर आलास!" इती अप्पासाहेब. "हं... जेवणाची वेळ आणि आमंत्रण आम्ही टाळत नसतो." महेश ने लगोलग चौकार मारला. " तू लेका सुधारायचा नाहीस" अप्पासाहेबनी हसत हसत महेशच्या पाठीवर थाप मारली आणि सोफ्यावर बसवले. "अरे सकाळच्या न्याहारीलाच (breakfast) आलो असतो पण 'EPS' चा फॉर्म भरण्याच्या विषयी माहिती बघत बसलो आणि उशीर झाला. "तुला काय वाटते वाढीव पेन्शन चा पर्याय निवडावा की नको?" "तू आता भरला आहेस ना, मग काय काळजी करतोस." "अरे, नाही! मी फक्त माहिती गोळा करत होतो." "तुझे मत काय?" "बरं, ऐका! हे वेलकम ड्रिंक, 'पन्ह' घ्या!" इति सौ. बळवंत वहिनी. "आता तुझ्या बाबतीत म्हणशील तर पहिली बाब अशी की, तुला साधारण मागील १५ वर्षांची एकत्रीत रक्कम व्याजासहित भरायची आहे ते कसे करणार आहेस; भले काही रक्कम EPF मधून वळती केली जाईल पण उरलेली?" "बरे तू आजूबाजूला बघतोच आहेस सत्तरी - पंचाहत्तरी गाठलेले लोकपण छान कामे करत आहेत, म्हणजेच आयुष्यमान सुधारत आहे. त्यामुळे या योजनेत नवनवीन सभासद येत राहिले तरच हा फंड पुरेल." "आता, ह्यातील मिळणारी पेन्शन ही ठरलेल्या सूत्रानुसार दिली जाणार आहे म्हणजे निश्चित लाभ (defined benefit) देणारी, (६० महिन्याचा सरासरी पगार × झालेली सेवा)/ ७० त्यामुळे फंड कितीने वाढतो आहे अथवा नाही याचा मिळणाऱ्या पेन्शन वर काही परिणाम होणार नाही, सरकारला सभासदाला ठरलेली पेन्शन ही द्यावीच लागेल ही मोठी जोखीम आहे." "तसेच, मगाशी म्हंटल्या प्रमाणे तुझा EPF ज्यावर आज ८.१५ ह्या दराने व्याज दिले जात आहे; हा फन्ड मागील बाकी भरण्यासाठी वापरला जाणार जो परत मिळणार नाही ही बाबपण न पटणारी आहे." "त्यामुळे ६० महिन्याच्या सरासरी पगाराच्या ५०% पेन्शन हे विधान कितीतरी सुखावह वाटले तरी वरील मुद्दे हे सुख टिकू देत नाहीत." "त्यापेक्षा मी म्हणेन तू NPS मध्ये खाते उघड." बळवंतराव हातातील पन्ह्याचा ग्लास टीपॉयवर ठेवत म्हणाले. "अरे हो! तू त्या विषयी बरेचदा लिहीत असतोस." इती महेश. "हो, बरोबर पण आज परत त्याच मुद्याचा आग्रह धरण्याचे कारण की आता नवीन नियमानुसार तू निवडलेल्या 'वर्षासन देणारी कंपनी' (ASP) कडून वेगवेगळे पेन्शन चे पर्याय एकाच वेळी घेऊ शकतोस, जर तू तात्काळ पेन्शनचा पर्याय घेतला असशील आणि जर तुझ्या फंडाचे मूल्यांकन हे रु १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर." "अहो, तुम्ही असेच गप्पा मारत बसणार की जेवणार पण!" इती भगिनी मंडळ. "अग, जेवणासोबत गप्पा ऊर्फ हे ज्ञान हे पूरक (complementary) आहे त्यामुळे ते आधी.” “हॉटेलात जेवायला गेल्यावर तू सुपा सोबतचा पापड आधी घेतेस ना, तसेच... " महेश ने PJ मारला. "हं.... तर मी काय म्हणत होतो?" हसत हसत बळवंतराव उद्गारले. "असे वेगवेगळे पेन्शन चे पर्याय निवडल्याने वर्षासनाच्या एकूण दरात नक्कीच सकारात्मक वाढ होते.” “महेश, तुला मी Annuity Service Provider (ASP) कोणत्या आहेत आणि त्यांनी उपलब्ध केलेले पेन्शन चे पर्याय, याचा ईमेल करतो म्हणजे तुला कळेल.” मंडळी आपण काय कराल? सोबत दिलेल्या लिंक वरून आपल्याला वर्षासन देणाऱ्या कंपन्या (ASP) व त्यांनी उपलब्ध करून दिलेले वर्षासनाचे पर्याय समजतील. वर्षासनाच्या पर्यायाची लिंकमंडळी! गुंतवणुकीचा निर्णय हा व्यक्तिसापेक्ष असतो, त्यामुळे महेशला दिलेला सल्ला हा आपल्याला लागू होईलच असे नाही. व्यक्तिशः भेटूनच ह्या विषयी निर्णय घेणे योग्य. मग केव्हा भेटूया? |
||
'EPS-NPS' “Welcome welcome!” Appa Saheb said to Mahesh and his wife while opening the door for them. “You came at the right time,” said Appa Saheb. “Yes, of course, we are punctual, especially for meals and invitations” answered Mahesh promptly. “You are incorrigible,” said Appa Saheb patting Mahesh on his back and seated him on the sofa. “Actually, I would have come right at breakfast time, but got stuck up perusing the EPS form to understand the information and hence I got late. “What is your opinion regarding the new pension scheme? Should one select the option of additional pension or not?” “You have anyways filled it, so why worry now.” “No! I was just gathering information.” “What is your opinion?” “Well, Listen, first please have this welcome drink” quipped Mrs. Appa Saheb. “If we talk about you, then the first thing is, you need to pay the lump sum amount with interest over the last 15 years; how will you manage that? Though they may deduct some amount from the EPF, what about the balance?” “Also, you are seeing around that people in the age of 70 – 75 are still working well, which means the life expectancy is improving. So, this fund will be adequate only when new members join this scheme.” “The pension in this scheme shall be calculated as per the below formula, i.e., it is a defined benefit scheme." (Average salary of last 60 months X number of years of service) / 70 “Therefore, whether the fund is adequate or not, the government has to pay the decided pension, and this is a big risk.” “Also, as said earlier, you are getting an interest of 8.15% on your EPF amount; and this fund will be used up to make up for the shortfall and will not be credited back to you which is not convincing.” “Therefore 50% of the 60 months average salary as pension though may seem so comforting, the above points wash out this comfort.” “I would rather suggest you open a NPS account,” said Appa Saheb keeping the glass on the tee-poy. “Oh yes! You write quite frequently on this” exclaimed Mahesh. “Yes, Right, but now I recommend NPS again today because, due to the new rule, now you can opt for multiple pension options from the same ASP (Annuity Service Provider), provided you choose immediate pension and if your fund evaluates to ₹. 10 Lakhs or more then.” “Are you just going to keep discussing this or are going to have lunch as well?” asked the wives of both. “Knowledge is complimentary along with the lunch, hence first the discussion, just like you ordered sup and preferred to have a Papad first, which is complementary when we dine in the hotel” joked Mahesh. “Ah, yes… So, what was I saying?” began Appa Saheb. “Choosing the different options definitely increases the annuity rate.” “Mahesh, I will mail you the list of the Annuity Service Providers (ASP) along with the pension options they offer.” Friends, what will you do? This link will give you more insight on the various ASPs and their respective annuity options. Link to Annuity OptionsFriends, the investment decision is totally person specific, and the aforesaid option may not be applicable to you. Meeting in person will be best to take a good and right decision. So, when do we meet? |
Comments
Post a Comment