अनुदिनी ६५ - वाढीव हप्ता आणि पूल फंड / Blog 65 -An increased Premium and Pool Fund.





नमस्कार मंडळी!

असं कधी आपल्या बाबतीत झालं आहे का?

म्हणजे तुम्ही विमा पॅालीसी घेते वेळी एक प्रिमियम होता आणि ज्या वेळेस तुमचा प्रस्ताव  (Proposal)  विमा कंपनीने स्विकारला त्या वेळेस तो वाढला.

जर, असं झालं असेल ना तर मंडळी काळजीचं कारण नाही.

का? विचारता.

सांगतो,सांगतो!

राव, थोडा वेगळा विचार करा!

विमा पॅालीसी विकणारी ‘विमा कंपनी’ ही एक कंपनी आहे ना की, धर्मदाय संस्थाम्हणजे ती फायद्यातच काम करणार. बरोबर ना!

हा, तर!

तिचा नफा, I mean profit  कशात असणार?

विमा पॅालीसीचा कालावधी जर वीस वर्षाचा असेल तर पूर्ण वीस वर्ष प्रिमियम घेण्यात की मधेच मृत्यूदावा (Death claim) देण्यात?

काय, चक्रावलात का?

हा! बरोबर विचार केलात, पूर्ण वीस वर्षे प्रिमीयम घेण्यात विमा कंपनीचा फायदा आहे, ना की मधील काळात मृत्यूदावा देण्यात!

मंडळी, आता विमा कंपनीने विमाप्रस्ताव स्वीकारण्यात तिचा  नफा बघितला हे तर तुम्हाला पटलं.

बरोबर!

ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे कंपनीला खात्री आहे की, ही व्यक्ती पॅालीसीचा कालावधी पूर्ण करणार. 

काय राव,बरोबर ना?

So, tension not!

तुम्ही म्हणाल,अहो! 'त्यांनी माझा प्रिमियम तर वाढवला ना!’  

ओके!

आता मला प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला ब्लडप्रेशर, शुगरचा काही त्रास?

अहो, तेच तर ना!

काही नाही, सगळं काही एकदम ओके!

राव, तुम्ही म्हणता ‘सगळं काही ओके!’

जऽऽरा, आपल्या मनाशी संवाद साधा.



विचारा त्याला, अरे तू सकाळी उठून ते रात्री झोपेपर्यंत ज्या काही क्रिया गेली वीस-पंचवीस वर्षे करीत आला आहेस त्या जाणतेपणी किती आणि अजाणतेपणी किती?

म्हणजे, सकाळी उठल्यावर दात घासणे ही क्रिया अजाणतेपणाने होऊन जाते पण तेवढ्याच जाणतेपणाने जेवणाच्या, झोपेच्या वेळा पाळल्या जातात का?

जाणतेपणी, आफिसमधील ताणतणाव, नैराश्यावर आपल्याकडे काय उपाय असतो?

ह्या सर्व क्रिया नकळतपणे शरीरावर, मनावर परिणाम करत असतात.

अरे, मग तसं काही असतं तर मग आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला काही सांगितलं असतं ना

ते तर फक्त म्हणाले  ‘काही नाही, दररोज अर्धा-पाऊण तास चाला, जरा खाण्यावर लक्ष द्या,’

 बस!

आणि इथे तर तुम्ही आमचा प्रिमियम वाढवून मोकळे! 

हा! एकदम बरोबर प्रश्न केलात राव!

त्याचं काय असतं, तुमच्या आजच्या मेडिकल रिपोर्टचे निदान, म्हणजे Diagnosis करणे ही आपल्या फॅमिली डॅाक्टरची भूमिका. त्यामुळे जर आपला,  LDL, HDL चा रेशो Normal range च्या अलीकडे-पलीकडे  असेल तर तो normal ला आणण्यासाठी तुम्हाला आज काय करावे लागेल ते त्यांनी सांगितले.

तर, विमा कंपनीची भूमिका ही Prognosis ची, ती आपल्या रिपोर्टचा एकूण कल बघता पुढील दहा-बारा वर्षात आपले  आयुष्य किती जोखमीचे असू शकते हे बघते आणि त्यानुसार किती प्रिमियम आकारायचा हे निश्चित करते. ह्या भूमिकेत विमा कंपनी फक्त सुरवातीलाच असते (किंवा बंद पडलेली विमा पॅालीसी पुनर्जीवित reinstate करताना) एकदा का विमा प्रस्ताव स्विकारल्यावर दर वर्षी त्यांना मेडिकल रिपोर्टचे Diagnosis करायचे नसते. ह्या मधील कालावधीत तुमची जीवनशैली सुधारली की बिघडली ते विचारत नाहीत.

त्यामुळे आज जी जोखीम आपल्या फॅमिली डॅाक्टरला सध्या फक्त १० टक्के जाणवते ती विमा कंपनी पुढे किती वाढू शकते ह्याचा हिशोब करते आणि त्या प्रमाणे ती जोखीम, तो विमा प्रस्ताव  कोणत्या अटीवर स्वीकारायचा, अथवा नाही ते  ठरवते.

जरा खूपच लांबतंय का?

पण, राव मुद्दाच असा नाजूक आहे तर स्पष्टीकरण भरभक्कम हवं ना! नाही, आहेच!

म्हणून!

हातर मी काय म्हणत होतो?      

हे अशाप्रकारे वर्गीकरण करण्याचे अजून एक कारण म्हणजे मंडळी विम्याचे दावे हे एका ‘Pool Fund’ मधून दिले जातात. समजा १००० प्रत्येकी भरुन १००० जणांचा,पूर्ण तंदुरुस्त ग्रुपचा एक ‘Pool Fund’ आहे. ह्या ग्रुपमधील व्यक्तीच्या पश्चात १ लाखाची विमा रक्कम देय असेल.

आता ह्या ग्रुपमध्ये एखादी तुलनेने जास्त शारीरिक जोखीम असणारी व्यक्ती येणार असेल तर मंडळी तिला १००० पेक्षा जास्तच हप्ता भरावा लागेल. कारण त्या व्यक्तीला विम्याची रक्कम (Death claim) देण्याची शक्यता ही तुलनेत कदाचित लवकर असू शकेल आणि ती निरोगी व्यक्तींनी जमवलेल्या ‘Pool Fund’ मधून द्यावी लागणार आहे. 

त्यामुळे त्याला अधिक भार लावूनच त्यांच्या ग्रुप मध्ये प्रवेश मिळेल.

म्हणून मित्रांनो मी सांगत असतो की पैसे आहेत म्हणून विमा मिळेलच असे नाही.

तुमचं काय मत?


----------------------------------------------------------------------------------



Hello Friends!

 

Has such a thing ever happened to you?

 

That is, the policy's premium is higher after purchasing the policy than it was while proposing.

 

If at all such thing happens, then there is nothing to worry about.

 

Why?

 

Let me tell you!

 

Just think a bit.

 

An insurance policy-selling entity is also a business establishment, not a charitable trust! 


Thus, it will work for profiteering. Right!

 

Yes, So!

 

How can it gain profit?


If the policy's tenure is twenty years, will it profit from getting the entire premium of twenty years or by settling the death claim?

 

Confused?

 

You are right; it will profit from earning the entire premium over 20 years. And it will never benefit from settling death claims midterm.

 

Friends, now you are convinced that the policy company has ensured its profit while accepting the insurance proposal. Right!

 

This also means that the company is sure that the person shall complete the policy term. Right?

 

So, no need to be tense!

 

You would say, “​But they have increased my premium.”


OK!


Nothing to worry about, everything is fine!


How can you say, “Everything is fine​?"

 


Just introspect and ask yourself about all the activities you have been doing for the past 25 years; after waking till sleeping, how many were done with knowledge, and how many were done without knowledge or as a habit.

 

For example, brushing your teeth after waking is an activity done as a habit, but do we follow our food and sleeping habits with the same defined routine?

 

How do you tackle the tensions and depression due to the working pressure in the office?

 

All such things affect our health, mind, and body without our knowledge.


In that case, our family doctor would have hinted to us, no? 


Instead, he just advised me to walk for 30 to 45 minutes daily and have food watchfully, and you have increased the premium for no reason!

 

Yes, you have raised the correct query!

 

The doctor has just advised you of the measures you need to take to normalize the LDL-HDL ratio.

 

The policy company evaluates our proposal based on the prognosis, estimates the risk to our health over the next 10 to 12 years, and then decides the premium. This is done by the company only in the beginning or while reinstating the lapsed policy.

 

Once the company accepts the proposal, it will not insist on providing health reports every year. They will never ask you if your lifestyle has improved or deteriorated.

 

Therefore, the insurance company calculates the growth in our health risk over the years based on the risk our family doctor anticipates.

 

This kind of classification is because the claims are settled from the pool fund. Suppose 1000 healthy people form a pool fund by contributing ₹. 1000 each. Then, the liability for each person will be ₹. 1 Lakh on death.

 

Now, if any person joining this group carries more risk than the healthy people in the group, then obviously, this person shall pay a higher premium. 


Because the possibility of settling the death claim in such a person’s case is higher than that of others, and it will have to be paid from the pool fund accumulated by healthy people.

 

Therefore, one will only get entry into this after paying an extra premium.

 

Therefore, I have been saying,​"Just having money does not guarantee that one can buy an insurance policy.​"

 

What is your opinion?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !