अनुदिनी ६८-व्याजदर आणि रोख्याची किंमत / Blog 68–Interest rate and bond price
हातातल्या कागदातील शेवटची भजी मटकावताना सॅम उर्फ समर्थचे लक्ष त्या कागदावरील मजकुराकडे गेले.
'इंटरेस्ट रेट्स अँड बाँड प्राईस हॅव इन्व्हर्स रिलेशनशिप', 'व्याजदर आणि रोख्याची किंमत यांच्यात व्यस्त संबंध असतो.'
"समर्थ, तुलाही वडापाव हवा का?" अरूकाकांनी आवाज दिला.
"चालेल!"
सँडी अगोदरच गाडीत जाऊन बसलेला, मागोमाग सॅम आणि अरूकाकाही आले.
ते तिघेही पावसाळी पिकनिकच्या पायलट ट्रिपसाठी निघाले होते.
गाडीत सॅमने अरूकाकांसमोर मघाचा कागद फडकावला.
“काका याबद्दल जरा समजवता का?”
"हो, हो सांगतो!" काकांनी पाण्याचा घोट घेत सुरूवात केली.
"अरे तुम्हाला ‘आयपीओ’ प्रकार परिचयाचा आहे ना?"
"हो!"
"तर मग, लोकांकडून निधी गोळा करण्याचाच हा एक प्रकार, पण यावर तुमच्याकडून घेण्यात येणाऱ्या रकमेवर परताव्याचा दर हा सुरवातीलाच अधोरेखित केलेला असतो त्याला ‘कूपन रेट’ म्हणतात. दुसरे असे की बाजारात हे कर्जरोखे निधी गोळा करण्यासाठी सरकारी व निमसरकारी संस्था, आस्थापने या दोघांकडून बाजारात आणले जातात.
आता हे आणताना ज्याप्रमाणे समभागांची दर्शनी किंमत ही दहा रूपये असते, (सध्या त्यावर प्रीमियम आकारला जातो,तो भाग वेगळा) त्याप्रमाणे कर्ज रोख्यांची कमाल दर्शनी किंमत ही एक हजार रुपये आणि त्याच्या पटीत असते व त्यावर देण्यात येणाऱ्या परताव्याचा दर म्हणजे ‘कूपन रेट’ हा सुरूवातीलाच ठरलेला असतो. म्हणजे समजा दर्शनी मूल्य दहा हजाराचे कर्जरोखे हे आठ टक्के कूपन रेटने बाजारात विक्री करावयास आले, तर त्यावरील आठ टक्क्याच्या परताव्याचा दराने रुपये ८०० वार्षिक परतावा असेल.
काय सॅम, समजतंय ना!
येस, काका!
"पण ह्या आठ टक्के परताव्याला 'इंटरेस्ट रेट' न म्हणता 'कूपन रेट' का म्हणतात?"
गाडी एक्सप्रेस हायवेला लागली आणि सॅंडीने गाडी auto pilot मोडवर टाकली आणि थोडा निवांतपणे बोलता झाला.
"सांगतो!"
“अरे, हे कर्जरोखे बाजारात मागणी पुरवठ्याच्या झोपाळ्यावर झुलत असतात. म्हणजे आज आरबीआयने अर्धा टक्का रेपो रेट कपात केली तर सहाजिकच बँका देखील ठेवीवरील व्याज दरात कपात करतील. मघाचं जे रुपये दहा हजार दर्शनी मूल्य असणारं कर्जरोख्याचं उदाहरणं घेतलं ते आता अधिक चर्चेत येतील कारण त्यावरील परताव्याचा म्हणजेच कूपन रेट हा आठ टक्के आहे, उजवा आहे.
साहजिकच त्यांची मागणी वाढेल. त्यामुळे समजा, कर्जरोख्यांची किंमत ही बारा हजार रुपयांवर स्थिरावली तर सँडी तुला काय वाटतं वार्षिक परतावा किती असेल? ”
"काका, सिम्पल ९६०!"
पाऊस थांबला होता, सॅंडीने कारची काच थोडी खाली केली. गार वाऱ्याची झुळूक गाडीत पसरली.
"सँडी, एकदम चूक!" अरूकाका बरसले.
"इथेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल!"
अरे, तुमचा बाराचा पाढा बरोबर आहे. पण गोची ही आहे की आठ टक्के हा 'कूपन रेट' आहे जो कर्जरोख्यावर मिळणाऱ्या परताव्याचा दर सूचित करतो. त्यामुळे रोखे बाजारात येताना त्यावर मिळणाऱ्या परताव्याविषयी खात्री दिलेली असल्याने आत्ताही ८०० रुपयेच परतावा हा रोखेधारकाला मिळणार.
त्यामुळे आता कर्जरोख्याची किंमत १२,००० रू. झाली असताना धारकाला ८०० रुपयेच मिळणार त्यामुळे परताव्याचा दर म्हणजेच व्याजदर हा ६.६६६ टक्के पडणार."ओ, ये बात है!" दोघांनी तोंडाचा चंबू केला.
"तर, सद्य परिस्थिती कर्जरोखे घेण्याच्या योग्यतेची नसून कर्ज फेडण्याच्या योग्यतेची आहे!" दोघेही एकाच सुरात ओरडले.
_______________________________________________________
The paragraph on that paper caught Sam alias Samarth’s attention when he was eating the last fritter.
“Interest rate and bond price have inverse relationship”
“Samarth, do you also want ‘Vada Pav’?” asked Aru Kaka.
“Yes, that’s fine!”
Sandi had already gone and sat in the car, Sam followed and Aru Kaka too.
All three were out on pilot monsoon trip.
Sam waved that above referred paper before Aru Kaka.
“Kaka, can you explain this a bit please?”
“Yes, of course” Kaka began while sipping the water.
“You guys would be conversant with IPO, right?”
“Yes!”
“So then, this is also one of the methods of collecting the funds from people, but the rate of returns on these funds are underlined in the beginning and is called as ‘Coupon Rate’. Secondly, to collect these funds, government or semi-government organizations trade them in the market.
Now, the face value of a share is ₹. 10 (Though a premium is charged on this presently), same way the face value of these bonds is ₹. 1000 and in multiples of 1000. And the coupon rate (rate of return) on these bonds is firmed up in the beginning itself. For example, suppose the bonds with face value of ₹. 10000 are floated in the market for selling at the rate of 8% coupon rate, then the returns on ₹. 10,000 shall be ₹. 800 per annum at the rate of 8%.
“Sam, do you understand?”
“Yes, Aru Kaka”
“But why it is called as coupon rate and not interest?”
As the car touched the express highway, Sandy put the car in autopilot mode and got a bit relaxed to converse.
“Yes, let me tell you. These bonds are influenced by the demand and supply in the market. That is, if the RBI cuts the repo rate by half percent, then the banks, too, will cut the interest rate on the deposits. So, if we consider the bond that has the face value of 10,000, they shall become the talk of the town as the coupon rate is 8%, which is more.
Obviously, its demand will increase. So suppose, if the value of this bond stabilizes at ₹. 12,000, then what will be annual returns on this bond Sandy?”
“Kaka, Simple ₹. 960”
It had stopped raining, so Sandy that lowered the window glass a bit. The fresh and cold breeze spread within the car.
“Sandy, Absolutely wrong” reprimanded Aru kaka.
“You shall get the answer to your question here itself!”
“Your table of twelve is right. But lest you forget that the coupon rate is fixed at 8% that defines the rate of return on the bonds. Therefore, as the assurance of 8% is given during the introduction of the bonds in market, it will fetch ₹. 800 even now.
Therefore, even when the cost of bond is ₹. 12,000, the bearer of the bond shall get ₹. 800 only and consequently the rate of interest shall be 6.6666%”
“Oh, I see” said both in unison.
In short, if the value of bond increases in the market the rate of return changes but the coupon rate remains constant.
“So, in the present situation, it is not a good proposition to buy bonds but to repay the loan” both again shouted in unison.
Comments
Post a Comment