अनुदिनी ५७ - गुंतवणूक कुठे? म्युच्युअल फंड, PPF की विमा पॉलीसी? Blog 57 - Where to invest? Mutual fund, PPF, or Life insurance policy?

  
 "किती मिळतील?"

 "ह्याच्या पेक्षा बाबांनी इक्विटी मध्ये गुंतवले असते तर..."

 "मिहीर, असे आहे!"

केलेल्या गुंतवणुकीतून रक्कम केव्हा किती मिळावी, हे मुद्दे महत्त्वाचे जरूर असतात. पण ते  व्यक्तीसापेक्ष असतात आणि त्यावेळच्या परिस्थितीनुरूप ते घेतले जातात.

मार्केट हे नेहमीच मागणी पुरवठा या नियमावर हेलकावे खात असते. मग ते तुझे दररोजच्या जीवनातील आवश्यक, अत्यावश्यक पदार्थ, वस्तू अथवा एखाद्या कंपनीच्या शेअरची नाहीतर म्युच्युअल  फंडातील फंडाची NAV असो, बाजार हा 'Bullish' आणि 'Bearish' अशा दोन 'B' वर बेतलेला असतो. 


ह्या उलट तुझी, माझी आर्थिक उद्दिष्ट्ये ही स्थिर असतात. ती उद्दिष्ट्ये योग्य त्या वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. अशा वेळेस स्थिर परतावा देणाऱ्या, तसेच कर मुक्त, जोखीम नसलेल्या गुंतवणुकीकडे पर्याय म्हणून बघीतले जाते. 


काळाबरहुकूम (Due to passage of time) इतर गोष्टींसोबत गुंतवणुकीचेही पर्याय, प्राधान्य बदलते. पण असे असले तरी व्यक्तीची मानसिकता मात्र बदलत नसते. गुंतवणुकीत सुरक्षितता असावी ही गरज, धारणा त्या वेळेस ही होती आणि आजही आहे. त्यामुळे किती मिळणार हे महत्वाचे होते पण परतव्याचा दर तसा गौण (Secondary)  होता. आणि म्हणूनच त्या वेळेस बाबांनी ह्या विमा योजनेला प्राधान्य दिले.


आता आज तू, बाबाने आणि काकाने मिळून जी आर्थिक घडी उभी केली आहे त्यावर उभा आहेस. सहाजिकच तुझी नजर ही अधिक उंचीकडे ,जोखीम घेण्याच्या मानसिकतेत आहे. तर जरूर आपण म्युच्युअल फंडाचा विचार करु, पण तोही पूर्णपणे करता तू गुंतवणूक करू शकत असणाऱ्या रक्कमेच्या ६०% रक्कम ही सुरक्षित परतावा देणाऱ्या दीर्घ मुदतीच्या पर्यायात म्हणजे, भविष्य निर्वाह योजना (PPF) ,  एंडॉमेंट विम्यात गुंतव; उरलेली ४०% रक्कम ही जोखीम सदृष्य योजनेत,म्हणजे म्युच्युअल फंडात, समभागात (Equity), गुंतवण्यास हरकत नाही.


आता महत्वाचे हे की जोखीम सदृष्य पर्यायातील गुंतवणुकीतील सुरवातीची 0% रक्कम दरवर्षी काही ठरावीक टक्क्याने वाढव पण दीर्घ मुदतीच्या सुरक्षित पर्यायातील गुंतवणूक मात्र तीन ते चार वर्षाच्या अंतराने वाढवत जा.


असे केल्याने तुझ्या टप्या-टप्याने वाढत जाणाऱ्या जोखमीतील गुंतवणुकीला सुरक्षित गुंतवणुकीचे पाठबळ (Support) राहील.आणि हळू-हळू तुझी जोखीम घेण्याची क्षमता (Risk appetite) वाढत जाईल. 


पुढे वयाच्या पन्नाशीच्या आसपास तुझ्या जबाबदाऱ्या स्थिरावलेल्या असतील त्यावेळेस या वळणावर तू गुंतवणुकीचे प्रमाण वाढवू शकशील. 


थोडक्यात काय तर गुंतवणुकीचे पर्याय निवडताना डोळसपणे निवडावे


तर मिहीर, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खात नाही, तद्वत मार्केट मध्ये वृध्दी (Growth) आहे म्हणून तेच एकमेव गुंतवणुकीचे साधन नसावे.”


तर, मंडळी! आजच्या अनुदिनी विषयी आपला अभिप्राय जरूर कळवा. 


धन्यवाद!

----------------------------------------------------------------------------------------------------

“How much would I get?”

“Instead of this, what if Dad would have invested in equity......?”


“Mihir!”

It is important to know when and how much returns would the investments fetch. But above all, the investments are person-oriented, and they are influenced by the situation at the time.

Dear, Markets usually swing with rule of demand and supply. 
Whether it is the daily need item or extremely needed item or share of a company or NAV of MF, the Market always behaves as per the Bullish or Bearish Trend.


Contrary to this, our finance aims are stable. It is important to fulfill those aims at the right time. At such times, investment in stable, Tax Free, less risky, or no-risk options is chosen.

With the passage of time, like other things, priorities and options also change. 
But the psyche of the investor does not change. 


Safety in investment is the need that prevailed then and prevails now as well. Hence, the amount of returns was imperative as opposed to the rate of return. And therefore, Dad chose life insurance then.


Now today, you have the set business developed by your father and uncle. 
So, obviously, you will aim at higher returns with higher risks. So, we will surely review the option of Mutual Funds. 


Not 100%, but just 60% of the total investment that you can make should be in no-risk, long-term confirmed gains such as a Public Provident Fund (PPF) or an endowment plan. A balance of 40% can be invested in risk-associated Mutual Funds/Company Shares.


Now the important thing is to increment the 40% risk-associated investment on a yearly basis, whereas the 60% long-term no-risk investment can be incremented every 3 to 4 years.

In such a way, the growth in high-risk investment will be supported by the investment made in the long-term no-risk scheme, and your risk appetite shall also gradually grow.

Later, when you are nearing the age of 50 and your responsibilities have reduced, you increase your investment.

In short, the investments should be done judiciously.

Just because there is growth in the market does not mean that you should invest only in the market.


​So, Mihir! I hope you got my point!









Comments

  1. Valuable heavy weight words r used by u to all investors for investing their money for future..

    ReplyDelete

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !