अनुदिनी ५९ - तुम्ही जीवन विमा खरेदी करू शकत नाही. का? / Blog 59 - You can’t buy Life Insurance. Why?



एक, दोन , तीन…दहा..बारा!

आऽऽआ! 

राहुलने दणकन दोन्ही डंबेल्स जमिनीवर सोडले.

नमस्कार मंडळी!

तुम्ही ओळखलं असेलंच आपल्या कथेचा नायक जीम मध्ये वर्क आऊट करतो आहे.

राहुल, वय वर्ष ३०, उंची ५ फूट १० इंच आणि वजन ८२ किलो.

असो, मंडळी! आज मला काय सांगयचंय तर, एखाद्याला वाटलं आयुष्यावर विमा घ्यायचा आहे म्हणून विमा पॅालीसी विकत घेता येत नाही. 

काय आहे मंडळी! बाकी सर्व ठिकाणी आपण, तुम्ही-आम्ही ग्राहक म्हणून मिरवू शकतो अपवाद ‘विमा व्यवहार!’

ग्राहक हा राजा असतो. 

कोणत्याही व्यवहारात ‘घेणारा’ हा ग्राहक असतो. पण, विम्याच्या बाबतीत म्हणाल तर तसे नसते. ह्या  व्यवहारात या राजाला कधी नमते घ्यावे लागते. त्याच्या अटींवर विमा प्रस्ताव पूर्ण होऊ शकत नाही. 

मंडळी! उलटपक्षी विमा व्यवहारात विमा कंपनीच ग्राहकाच्या, राजाच्या भूमिकेत असते. 

काय चक्रावलात ना?

सांगतो, कसे काय ते!

मंडळी! मला सांगा आज तुम्ही ₹ १२०० ला दोन  डझन आंबे घेतलेत आता ह्यातले समजा २ आंबे खराब निघाले तर? हं, तुम्हाला ते बदलून देण्याची हमी आंबेवाला देतो; पण समजा एखाद्या विमा इच्छुकास मधुमेहाचा त्रास आहे तर?

राव! इथेच विमा कंपनी ही ग्राहकाच्या भूमिकेत जाते.


जसा आपण पेटीतला प्रत्येक आंबा हातात घेऊन, नाकाला लावून, म्हणजे हुंगून घेतो. तद्वत विमा कंपनी आपल्याकडे येणारा विमा इच्छुक हा आपल्या  मानक तक्त्यात (Standard Chart) मध्ये बसतोय की नाही हे बघते. नसेल तर ‘आंबा’ परत न करता अतिरिक्त हप्ता लावून विमा प्रस्ताव स्विकारण्याची तयारी दाखवते.

तुम्ही हे नक्कीच मान्य कराल की उत्तम तब्येत  असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत मधुमेही व्यक्तीचे एकंदरीत आयुष्य हे विमा कंपनीच्या दृष्टीकोनातून जास्त जोखमीचे असते.

मंडळी, नुसतीच एखादी व्याधी नाही तर तुम्हाला गंमत वाटेल.अहो, जर एखाद्याच्या पायाला सहा बोटं असतील तरी देखील विमा कंपनीच्या दृष्टिकोनातून  ती जोखीम  समजली जाते.

तर, आपल्या कथेच्या हिरोचं, राहुलचंच बघा की राव! कोणतीही व्याधी नाही पण त्याच्या उंचीचं आणि वजनाचं गणित मांडून ‘Body Mass Index’  काढाल तर तो विमा कंपनीच्या  मानक तक्त्यात (Standard Chart) न बसणारा आहे आणि त्याकरिता त्याला विम्याच्या मानक (Standard)  हप्त्यावर अतिरिक्त हप्ता भरुनच विमा मिळेल. म्हणूनच साहेबांनी वर्कआऊट करायला सुरवात केली.

आता, आपल्याला पटलं असेलच की ‘विमा व्यवसायात’ विमा कंपनीच खऱ्या अर्थाने ग्राहक असते आणि म्हणूनच मला हवा तेव्हा, हव्या त्या रकमेचा आणि हव्या त्या हप्त्यात विमा घेण्याचा पर्याय नसतो. म्हणूनच विमा व्यवहारात आपण ग्राहकाच्या भूमिकेत वावरण्यासाठी आपलं तब्येतरूपी नाणं खणखणीत ठेवणे आवश्यक आणि ते तसे ज्यावेळेस असते त्यावेळेस चाल-ढकल न करता वेळीच योग्य त्या रकमेचा विमा करुन घ्यावा!

काय राव पटतयं ना?

आपला अभिप्राय जरुर कळवा.

------------------------------------------------------------------------------------------------


One, two, three . . ..  ten…twelve!

Ah, s s s Ah!

Rahul dropped the dumbbells on the floor with a bang.

Hello Friends!

You must have already guessed that the hero of our story is working out in a gym.

Rahul, Age 30, height 5 feet 10 inches and weight 82 Kg.

So, friends, what I want to tell you is suppose someone feels that if he has to take insurance on life, then it is not possible to buy the policy at his will.

Friends, we enjoy the privilege of being a customer elsewhere, but insurance is an exception to this.

The consumer is king in all transactions as he is the buyer. But in the case of insurance, it is not so. 

The king has to bow and accept some clauses without which the proposal cannot be completed.
 
Friends, in contrast, the insurance company is in the role of the king.

Confused? Let me tell you how!

Friends, suppose you buy 2 dozen mangoes for Rs. 1200, and two mangoes happen to be decayed then? 

This is where the insurance company gets into the role of consumer. 



The way we sniff each and every mango we buy to ensure it is good, similarly, the insurance company evaluates the person intending to buy the insurance for compliance with its standard chart. If the person is non-compliant, then instead of rejecting, the insurance company proposes to increase the premium and accepts the proposal.
 
You will surely agree that the life of a diabetic is at more risk than that of a normal and fit person. 

Friends, you will feel it is odd that not only any ailments but even if a person has 6 fingers on the foot, it is considered a risk by the insurance company.
 
Just take the example of our hero, Rahul; in spite of having good health, he is not complying with the standard chart of the BMI due to the skewed height-to-weight ratio. So, he will have to pay a premium other than the standard applicable premium for the person complying with the standard chart.

And that is why Rahul began to work out.
 
Now, you must have been convinced that the insurance company is the king of the business of insurance. 

Therefore, there is no option to buy insurance at your will, i.e., as per my premium, my amount, and my time.
 
Therefore, maintaining very good health is essential and important to be a customer in the insurance business.

And when your health is in really good shape, you should purchase the insurance policy without procrastination.
 
Please do give your feedback.

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'