अनुदिनी ४२ - 'सिग्नल' / Blog 42 - 'Signal'

नमस्कार मंडळी!

कसे आहात?

आत्ता परवा शिळफाट्यावरून वाशीला चाललो होतो. शिळफाट्याच्या चौकाजवळ रहदारीमुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

थोडा वेळ वाट बघितली आणि नंतर गाडी बंद करून शांतपणे आजूबाजूला बघत बसलो. थोड्याच अंतरावर १२ ते १५ वर्षांची २-३ मुले चाफ्याच्या फुलांचा छोटासा हार ट्रॅफिक मध्ये थांबलेल्या गाड्यांसमोर नाचवून विकायचा प्रयत्न करीत होती.

तेवढ्यात एक लहान मुलगा हातात लहान स्प्रेची बाटली घेऊन पळत येताना दिसला, त्याच्याकडे छोटासा वायपर देखील होता. समोरच्या कारच्या ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या दाराची काच त्याने पटापट हातातल्या स्प्रेने पाणी मारून, वायपरने स्वच्छ केली आणि काचेवर नॉक करून त्याने पैसे मागीतले. त्या ड्रायव्हरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण मग लगेच त्याने दुसऱ्या कारकडे धाव घेतली.

काम करूनही मोबदला दिला जात नाही म्हणून कोणतेही आर्जव वा हुज्जत न घालता तो तडक नव्या उमेदीने दुसऱ्या गाडीकडे वळला होता.

मंडळी बघायला गेले तर मुंबईतील कोणत्याही सिग्नलवर दिसणारे एक सर्वसामान्य दृश्य.

पण, त्या मुलाने दाखवलेल्या परिपक्वतेने (Prudent thought) त्या दृश्यात वेगळेच रंग भरले.

प्रसंग दुसरा:

"अरे, ठीक आहे! पण, माझ्याकडे 'मेडिक्लेमची' पॉलिसी आहे की!" विनयने निर्वाणीच्या सुरात सुदेशला सांगितले.

मंडळी, झालं असं कि, सुदेश 'कॅन्सर कव्हर' योजनेविषयी सांगत होता. विनयला तो काही अंशी पटला देखील पण त्याने वरील शंका बोलून दाखवली.

मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या,

‘पैसा आहे म्हणून विमा विकत घेता येत नाही तर मी विमा देण्याच्या योग्यतेचा आहे म्हणून मला विमा दिला जातो.’

काय, मंडळी चक्रावलात ना!

अहो, ‘मी’ म्हणजे माझी तब्बेत, ती जर विमा कंपनीच्या ‘धडधाकटच्या’ व्याख्येत बसत नसेल तर मला विमा मिळणार नाही. त्यामुळे परिपक्व (prudent) विचार असा असावा की, आज जर मी फिट आहे, तर माझा ‘Health Insurance’ चा Portfolio ‘कॅन्सर कव्हर’ योजनेने upgrade करणे आवश्यक.

आता मंडळी, मी आवश्यक ह्या करता म्हणतोय कारण की,

‘कॅन्सर कव्हर’ ही निश्चित लाभ देणारी (Defined benefit) योजना आहे. म्हणजे २० लाखाची विमा रक्कम असेल आणि जरी लाखभर रुपये खर्च आला असेल तरीही विमा रकमेच्या २५ टक्के म्हणजे पाच लाखाचा दावा खात्रीपूर्वक (Guaranteed Claim) दिला जाईल.

पण, मेडीक्लेम योजना फक्त नुकसान भरपाई (indemnify the loss) करून देते. म्हणजे, एखाद्याची मेडीक्लेम पॉलिसी दोन लाख रुपयाची आहे आणि क्लेम जर दीड लाखाचा असेल तर त्या दाव्याची कमाल मर्यादा हि दीड लाख पर्यंतच असेल.

मंडळी! दुसरा असाही एक परिपक्व (Prudent thought) विचार, मेडीक्लेम योजना औषध-पाण्याच्या खर्च देईल तर आजारादरम्यान बुडालेले उत्पन्न (Loss of wages) 'कॅन्सर कव्हर' देईल.

आणि जाता, जाता! मित्रांनो, पन्नास वयाच्या व्यक्तीला २० लाखाच्या विम्यासाठी वर्षाला फक्त २४ हजाराचा हप्ता येतो आणि तोही त्याच्या वयाच्या पंचाहत्तरी पर्यंत. इतरही काही वेगळेपण ह्या योजनेत आहे, भेटीअंती बोलूच.

बाकी, मंडळी! विचारांचं वेगळेपणच आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देत असतं, त्या मुलासारखं, बरोबर ना?

Greetings!!

How are you?

Just a couple of days ago, I was going to Vashi through Shilphata. At the crossroads, due to traffic jams, a lot of vehicles queued up. I waited for some time and then shut down the engine and started looking around coolly. A few feet away, 2-3 children between 12 and 15 years were luring the people in the car to buy magnolia (Chafa) garlands.

Just about then, I saw a small boy carrying a spray bottle and a wiper. He swiftly sprayed the water on the car’s windscreen ahead of me and wiped the windshield. He knocked on the window glass and asked for money. The driver in that car ignored him. The boy ran towards the next vehicle without waiting to be paid for his effort. With new hope in mind, he headed towards another car.

Friends, this is a mundane sight everywhere at the signals in Mumbai. But the prudent approach of that boy was exemplary.

Another Incident:

“Yes, it’s okay, but I have a mediclaim policy,” Vinay said to Sudesh in an exasperation tone.

Friends! Sudesh was explaining a ‘Cancer Cover’ scheme to Vinay. And he was convinced to some extent, but he expressed his above doubt.

Friends, please note one thing.

The policy cannot be issued simply because one can buy it, but it can be sold on eligibility only.

Stunned, aren’t you?

This means that if I am certified as unfit as per the defined parameters of Insurance Co., I shall not be issued the policy.

So the prudent thought would be to upgrade the existing mediclaim policy scheme with 'Cancer Cover' while I am ‘Fit.’

I say so because the ‘Cancer Cover’ plan is an assured and defined benefit plan. If the policy is worth Rs. 20 Lakhs, and the expenses are Rs. 1 Lakh, then a 25% of the policy amount, i.e., Rs. 5 Lakhs guaranteed claim, can be availed.

But the mediclaim policy only gives the amount eligible for indemnifying loss. If one has, a policy of Rs. 2 Lakhs and the claim is Rs. 1.5 Lakhs, then the maximum limit of the claim shall be Rs. 1.5 Laks only.

The second prudent thought is that if Medicalim shall cover the medical expenses, the Cancer Cover shall cover income lost during the treatment.

And lastly, a person aged 50 has to pay a *premium of Rs. 24,000 pa up to 75 years for a policy of Rs. 20 Lakhs.

Also, we will talk about other benefits of this policy when we meet.

Finally, friends, thinking differently definitely brings a sheen to the personality, like that boy, right?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !