अनुदिनी ४१-'जिनी व राक्षस' / Blog 41- 'Genie & Demon'

हॅलो, मिहीर! छान कॅफे शोधलायस.

" हो आमचा वीकेंडचा अड्डा येथेच भरतो" इति मिहीर.

कुमार सरांनी खुर्ची मागे सरकवून त्यावर आपली बॅग ठेवली आणि बाजूच्या खुर्चीवर बसले.

" हाय मिहीर!"

"हॅलो अंकल!"

मुग्धा आणि राहुल दोघेही एकामागे एक दार ढकलून आत आले.

"हॅलो डियर!” कुमार सरांनी दोघांना हॅंडशेक केला.

“अरे, मिहीर अंकल साठी काहीच मागवले नाहीस?” मुग्धा टेबल वर पर्स ठेवत डाफरली .

" अरे! आज सेकंड Saturday, आजची ऑर्डर आणि बील देण्याचा राहुलचा दिवस आहे." मिहीरने डोळे मिचकावत पाण्याचा ग्लास घेतला.

“अरे, नाही! दोस्तलोग आजकी शाम अंकल के नाम" असे म्हणून कुमार सरांनी प्रत्येकाच्या हातात मेन्यू कार्ड ठेवले.

“Oh no, uncle! You are our guest" तिघांनी मिळून एकाच सुरात कलकलाट करून सरांना खुर्चीत बसवले.

“Rahul! you place the order.” इति मुग्धा.

“मला कोल्ड कॉफी अँड नॅचोज विथ डीप” मिहीरने आपली फेवरेट ऑर्डर सोडली.

“काका तुम्ही काय घेणार?” राहुलने विचारले.

“मला पण कोल्ड कॉफीच सांग” कुमार सरांनी मेन्यू कार्ड टेबल वर ठेवत सांगितले.

“So, Rahul! सध्या काय चाललंय!” सरांनी आता विषयाला हात घातला.

“Sir! मम्मा आणि ड‌ॅड दोघेही छान नोकरी करत आहेत, आणि मी पण गेल्या वर्षीच जॉबला लागलोय. सगळे काही Cool!” राहुल, मोबाईल सायलेंट मोडवर ठेवत उत्तरला.

"आणि काका मला विचाराल तर दोन वर्षांनी MS करायला जायचा बेत आहे. सध्या माझ्यावरसुद्धा काहीच जबाबदारी नाही. जो काही पगार येतो तो माझा खर्च आणि MS करिता मी Mutual फंडात SIP सुरू केले आहे त्यातच संपतो." एव्हडं बोलून मुग्धाने स्टफ्ड मशरूमचा घास घेत आपले तोंड बंद केले.

"Great!” कुमार सरांनी आपल्या चष्म्याची काच पुसत दोघांकडे पाहत स्मित केले.

“तुम्ही मुले एकदम नशीबवान. लहानपणी आम्ही जिनीची आणि जादूच्या दिव्यातील राक्षसाची गोष्ट वाचली होती. त्यात आपण जे मागू ते जिनी आणि राक्षस क्षणार्धात समोर उभे करायचे.”

“आता तुम्हा मुलांना घरात ‘Alexa’ आणि बाहेर ‘Amezon’, ‘Swiggy’, ‘Zomato’, ‘Ola’, ‘Uber’ तुमच्या सेवेसाठी हात जोडून उभे आहेत. पिक्चर, नाटकाची तिकीट बुकींग्जसुद्धा घरबसल्या मिळतात.”

“खरेदी करायला 'थंडगार प्रशस्त मॉल’; त्यातील प्रत्येक गोष्टीत असलेल्या varieties. सगळं काही जादूई दुनिये सारखं.”

“एकदम Awesome! बरोबर शब्द वापरला ना मी?” कुमार सरांनी हसत हसत विचारले.

"Yes Sir!" तिघे एकसुरात ओरडली.

“आज तुमच्याकडेही जिनी आणि राक्षस आहे, क्रेडिटकार्डच्या रूपाने. तेही घासले, I mean swipe केले की वस्तू हजर. फक्त हा क्रेडिट कार्डचा राक्षस तुमच्या मानगुटीवर बसून देऊ नका. नाहीतर हा राक्षस तुमच्या आर्थिक नियोजनाचे तीन- तेरा म्हणजे Fiasco करेल.

दोस्तांनो! प्रत्येकाला पैसे कमवावेत असे वाटणे गरजेचे नाही. 'पैसा हवा आहे’, ही एक सहज गरज आहे. जी आवश्यक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी असून 'पैसा कमवायचा आहे' ही 'पैसा हवा आहे ' ह्या मानसिकतेच्या वरची पातळी आहे.

ह्या दोन पातळ्यांमधील समन्वय खूप महत्वाचा आहे!

मिहिरला, इंटिरियर डिझाइनर म्हणून स्वतःला प्रेझेंटेबल रहावेच लागेल.पण बरोबर appealing गॅजेट्स जसे iPad, iPhone बाळगणे ही त्याला गरजेचे आहे. पण करियरच्या ह्या टप्प्यावर (stage) कर्ज काढून कार घेणे गरजेचे नाही. त्याऐवजी Ola, Uberचा वापर करणे योग्य.

So, guys! Be sure before spending, Check! इच्छेपोटी खर्च करत आहात की गरजेपोटी.

तेवढ्यात पावसाची जोरात सर आली आणि मंडळी आपापल्या बॅगा घेऊन आत पळाली. सगळेजण थोडेफार भिजले.

लगेच राहुलने ऑर्डर मागवली, “दो प्लेट गरमागरम कांदा भजी, जल्दी!”

मिहिरने विचारले, “आता ही ऑर्डर गरजे-पोटी की इच्छे-पोटी?” आणि सगळे हसू लागले.

मित्रांनो आपण काय कराल?

गरजेपोटी व इच्छेपोटी खर्च कोणते ते समजून उमजूनच खर्च करा.

गुंतवणुकीची जी दोन मर्मस्थाने आहेत, चक्रवाढ व्याज (Law of compounding) व सरासरी (Law of average), ह्या दोन्ही ठिकाणी आपण किती वर्षे (Number of years) गुंतवणूक करत आहात हे महत्वाचे.

त्यामुळे आपली कमावती वर्षे वाया घालवू नका.

Hello Mihir! Nice café you have found out!

“Yes, this is our weekend hangout,” said Mihir.

Kumar Sir kept his bag on the chair and sat on the adjacent chair.

“Hi, Mihir!”

“Hello, Uncle!”

Mugdha and Rahul joined one after the other.

“Hello Dear!" Kumar sir greeted the two with a handshake.

“Hey Mihir, you haven’t ordered anything for the uncle?” Mugdha said in dismay while keeping her purse on the table.

“Hey, it’s the second Saturday today and it’s Rahul’s turn to order and pay the bill,” said Mihir winking his eye.

“Hey, no! Today evening, I shall be the host” said Kumar sir and handed over the menu card to all three.

“Oh No! Uncle, you are our guest today” Said all three in unison.

Mugdha: “Rahul you place the order”

“I shall have cold coffee and Nachos with dip” Mihir placed his favorite order.

“Uncle, What will you have?” Asked Rahul

“I too will have cold coffee,” said Kumar sir keeping the menu card on the table.

“So, Rahul! What going on nowadays!” Kumar sir opened the topic.

“Sir, Mom, and Dad are both fine doing their jobs and I too secured a job last year. Everything is smooth and tension free.” answered Rahul while he turned his mobile on silent mode.

“And uncle, if you ask me, I am planning to do MS after two years. Presently, I too don’t have any responsibilities. All my salary is used for my expenses and for the MS & I have started the SIP and thus all my salary gets used up” said Mugdha and ate a morsel of Stuffed Mushroom.

“Great!” Wiping his glasses, Kumar sir smiled at both.

“You children are very fortunate. In our childhood, we had read the story about the Genie and the Demon who would present whatever we wished for in a moment.”

“Now you have 'Alexa' at home and 'Amazon', 'Swiggy', 'Zomato', 'Ola', and 'Uber' at your service outside the home. You can even book tickets for movies or plays from home itself.

“A cool Air-conditioned mall for shopping with so many varieties of goods. Just like a fantasy world.”

“All awesome! Right word isn’t it?" asked Kumar, Sir.

“Yes Sir!” shouted all three in unison.

“Today you have the ‘Genie’ and ‘Demon’ in the form of a credit card. When you rub it, I mean swipe it, you can buy what you want. Just ensure that this ‘Demon’ does not swallow you. Else this Demon will bugger up your financial planning and create a big fiasco.”

Friends, not everybody wishes to earn scores of Monies. Money is needed though to fulfill financial needs. 'Need of money' is an upper level though than 'wanting money'. It is very important to have a proper balance here.

Mihir needs to be presentable as he is an interior designer. Hence having appealing gadgets like iPad, iPhone is the need of his profession. But, at this stage of his carrier he need not buy a car on loan. Instead, he can travel using 'Ola' / 'Uber'.

So before spending, just ensure whether the expenditure is out of wish or out of need.

Suddenly, a spell of rain forced all of them to rush inside. All got wet, somewhat.

Immediately, Rahul ordered “दो प्लेट गरमागरम कांदा भजी, जल्दी!”

Mihir asked “Now is this order ‘out of wish’ or ‘out of need’?” everybody started laughing.

Friends, what will you do?

Please think about the ‘wish’ and ‘need’ and then spend rationally.

Two great methods of investments, i.e., the ‘Law of Compounding’ and the ‘Law of Averaging’ are available to us. It is important for how many years one invests in these two available methods.

Don’t waste years of earnings.

Comments

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !