अनुदिनी ३५ – ‘निवांत’ / Blog 35 – ‘Relaxed’

‘निवांत’

नमस्कार मंडळी!

काय कसे आहात? असे विचारल्यावर, "मजेत, छान, मस्त, ठीक," यांपैकी कोणतेही उत्तर न येता "एकदम निवांत" असे चारही मुंड्या चीत करणारे उत्तर कसे वाटते?

मागील आठवड्यात आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला भेटण्याचा, दर्शनाचा योग आला.

तिथे ह्या 'एकदम निवांतची' गाठ-भेट झाली.

म्हणजे तिथे कोणी कोणाची ख्याली-खुशाली विचारली की त्याला एकच उत्तर, 'एकदम निवांत'!

मंडळी, निवांत म्हटलं की कसं एकदम 'शांत, शांत' वाटतं ना?

म्हणजे आपल्याकडील, मजेत, मस्त, छान, यांच्यापेक्षा अधिक उजवा 'निवांतपणा' वाटतो ना?

ह्या, 'निवांतपणात' असं वाटतं जणू काही एकदम समाधीच लागली आहे, आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून एकदम अलिप्त!

असा हा 'निवांतपणा' आपल्याला साठी नंतरच जवळचा वाटतो; आपल्या पेन्शनच्या कारकीर्दीत.

बरोबर ना!

आता, पेन्शन म्हंटलं की Employees’ Pension Scheme (EPS), Superannuation Scheme,

National Pension Scheme (NPS), हे परिचित शब्द डोळ्यासमोर तरळतात. क्वचितच, वार्षिकी (annuity) हा शब्द समोर येतो.

तर मंडळी, ह्यात काय वेगळेपण आहे..?

तत्पूर्वी आपण वर नमूद केलेले इतर पेन्शनचे पर्याय जाणून घेऊ.

आपण जर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी चे (Employees' Provident Fund) सभासद (Member) असाल तर आपण कर्मचारी निवृत्ती योजनेत (EPS) सहभागी होऊ शकाल. ह्यात पगाराच्या १२% रक्कम ही ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ म्हणजेच (EPF) करिता कर्मचारी देतो. त्यातील ८.३३% एवढी रक्कम ही कर्मचारी निवृत्ती योजनेत (EPS)वळती केली जाते आणि तेवढीच रक्कम कंपनी देखील EPS मध्ये भरते. नियमानुसार रु १५ हजार पगाराची कमाल मर्यादा विचारात घेता, कर्मचाऱ्याला ५८ वर्षापासून महिना कमाल रू ७५०० तर किमान १००० रू पेन्शन मिळू शकते.

आता नवीन प्रस्तावित कर्मचारी निवृत्ती योजनेत (EPS) पगाराची कमाल मर्यादा नसल्याने निवृत्तीच्या वेळी मागील ६० महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या ५०% रक्कम ही निवृत्ती वेतन म्हणून (Pensionable salary) विचारात घेतली जाईल. असो!

सेवा निवृत्ती योजनेत (Superannuation scheme), खासगी व्यवस्थापन, त्यांनी निवडलेल्या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगाराच्या १५ टक्क्यापर्यंत रक्कम भरते आणि ह्यात कर्मचारी स्वेच्छेने स्वतःचे योगदान देऊ शकतो. आता, NPS कडे वळू!

NPS ही योजना २००४ पासून कार्यान्वित झाली. सदर योजनेत कर्मचारी त्याच्या पगाराच्या १०% योगदान देतो. निमसरकारी व्यवस्थापनात, कंपनी पगाराच्या १०% योगदान करते तर सरकारी योजनेत ते १४% असते. ही योजना बाजाराशी संलग्न आहे. सर्वसामान्य व्यक्ती पण स्वेच्छेने या योजनेत सहभागी होऊ शकतात. ह्यात आपण वयाच्या ६० ते ७५ दरम्यान केव्हाही पेन्शनला सुरवात करू शकतो.

तर मंडळी मी काय सांगत होतो की, ह्या योजनांव्यतिरिक्त ‘वार्षिकी योजनेचाही’ (Annuity Scheme) विचार करा. नुसता विचारच नाही तर तो अंमलातही आणा.

कारण, ह्या योजनेत फक्त एकरक्कमीच गुंतवणूक करायची असते. तसेच आपल्याला कायमस्वरूपी उत्पन्न लवकरात लवकर म्हणजे वयाच्या तिशी पासून सुरू करता येते.

तर काही योजना आपल्याला प्रलंबीत वार्षिकी (Deferred Annuity) देऊ करतात. म्हणजे आज एकरक्कमी गुंतवणूक केली की तुम्ही पेन्शन किती वर्षांनी सुरू व्हावी हे सुरुवातीलाच ठरवू शकता.

हा कालावधी १ वर्ष ते १२ वर्षांपर्यंत प्रलंबीत करता येतो.

मंडळी! महत्वाचे असे की, ह्यातील Annuity चा दर हा आजीवन स्थिर राहतो.

सख्खी भावंडे, आई-वडील आपल्या अपत्याकरिताही संलग्नपणे ही योजना घेऊ शकतात.

आपण काय कराल?

राव! आपल्याला जमेल त्या वेळी, वेगवेगळ्या कालावधीसाठी Annuity बुक करा.

उदाहरणच द्यायचे झाले तर, समजा आज आपण ५० वर्षांचे असाल आणि १२ वर्षांनी आपल्याला पेन्शन हवी असेल तर १४.३२% हा दर लागू होईल आणि तीच थोडी लवकर म्हणजे वयाच्या पंचावन्नला हवी असेल तर ९.०५% हा दर लागू होईल आणि अजून थोडं उशिरा, सत्तावन्नला तर तो १०.४३% असेल. हा दर आजीवन कायम राहील हे विशेष!

तर, आपल्या लक्षात आले असेल की, आज वयाच्या जेवढ्या उशिरा Annuity घेतली जाईल तेवढा दर जास्ती मिळेल.

आणि मंडळी, आपण तर जाणताच कि, अर्थव्यवस्थेत ज्या वेळेस व्याजदर चढे असतात त्यावेळी Annuity चे दर ही वाढलेले असतात.

तर, सजगपणे वेगवेगळ्या दराने व वेगवेगळ्या कालावधीसाठी आपण Annuity विकत घेतलीत तर आयुष्यभरासाठी खात्रीपूर्वक स्थिर उत्पन्नाची सोय करू शकता.

मग, सजग गुंतवणूकदार बनत आहात ना?

'Relaxed'

Hello Friends!

Hello, How are you? When you ask this question, and your answer is not any one of these “Enjoying or Good or Fine or OK” and instead if you give a stunning reply as “Nivant” how would it feel?

Last week I happened to go to Kolhapur to seek the blessings of Goddess Ambabai.

It was there that I met this 'Nivant'.

That is, if anyone inquiries about your well-being, the ubiquitous reply would be ‘Nivant’.

Friends, when someone says “Nivant", one feels at peace, right?

That is, 'Nivant' feels a notch higher than the popular “Enjoying or Good or Fine or OK”, isn’t it?

This state of being 'Nivant' is like an indication of Enlightenment and isolation from surrounding things.

This 'Nivant' feeling is welcome for us later, when we start earning the pension. Right!

Now, when we talk of pensions, we recollect familiar words like Employees’ Pension Scheme, Superannuation Scheme, and National Pension Scheme.

Rarely does the word 'Annuity' come to our mind.

So, friends, What’s so different about this?

But before that, let us understand the other options of pension.

If you are a member of the Employees’ Provident Fund, then you can get the benefits of the Employees' Pension Scheme (EPS). 12% of the Salary is contributed towards Employees’ Provident Fund i.e., EPF by the employee. 8.33% of the amount from the EPF contribution is deposited in the Employees’ Pension Scheme (EPS) account and an equal amount is also contributed by the employer into the account. Considering the upper limit of ₹. 15000/- employees can get a pension of between ₹. 1000 to ₹. 7500 per month.

According to the new proposed scheme, as there is no upper limit, 50% of the average of the last 60 months' salary is considered as pensionable salary.

Under the Super Annuation Scheme, the private company’s management deposits up to 15% of the employee’s salary in the employee’s account in the chosen scheme.

Now let us look at NPS!

NPS came into effect in 2004. Under this scheme, the employee contributes 10% of his salary. In private companies, the management contributes 10% of the employee’s salary whereas in government organizations, this contribution is 14%. This scheme is linked with the market.

Anybody can choose to participate in this scheme. Pension can be started anytime between the age of 60 and 75 years.

So, friends, I was saying that besides these above 3 options, there is also another option of 'Annuity Scheme' that can be considered, rather opted for.

Because one just has to invest a lump-sum amount in this scheme and can avail of the guaranteed pension lifelong from the age of 30 itself.

Some schemes do also have an option of deferred annuity where the time can be deferred between 1 to 12 years.

The important aspect of this scheme is that the rate of annuity is constant for the lifetime.

This can be availed jointly between self, siblings / parents / spouse / children.

What can you do?

Book annuities for different time periods as per convenience.

For example, suppose you are 50 now and you want the pension to start after 12 years, then you would get the pension at the rate of 14.32% and if you opt to avail of pension from the age of 55 then the rate would be 9.05%, similarly at the age of 57 the rate would be 10.43%. This rate shall remain constant for the rest of the lifetime.

So, with this, you will realize that the more deferred the annuity is, the more the pension rate shall be.

And of course, you already know that when the interest rates are high in the economy, so are interest rates in annuity.

Thus, if you prudently buy annuities at different times for varied time periods, you will provide for an assured lifetime income.

So, have you decided to invest prudently?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !