अनुदिनी ३६ -'लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज' / Blog no. 36 - 'Lifebuoy, Hawkins, and Bajaj'
‘लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज’ नमस्कार मंडळी! काय, कसे आहात? तुम्ही ही जाहिरात बघितली किंवा ऐकलीत का? "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय लाईफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ" बरं, ही जाहिरात? "ये जमीन ये आसमान, ये जमीन ये आसमान, हमारा कल, हमारा आज, बुलंद भारत की, बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज" अरे, काय चाललंय? सांगतो, सांगतो! आणि ही एक शेवटची, "हॅाकिन्स की सिटी बजे खुशबू ही खुशबू उडी मजेदार लज्जतदार खाना है तैय्यार हर खाना स्वादिष्ट बनाये, मिनीटोमें झटपट पकाये हॉकिन्स प्रेशर कुकर" ह्यांचा इथे काय संबंध? सांगतो, सांगतो! बरं, मंडळी आपल्याला लाईफ ईन्शुरन्स काय असतो हे माहित आहे. टर्म प्लॅनचा तर राव, मोठाच गवगवा आहे. आयुर्विम्यात परतावा हा कमी असतो ही माहिती बहुतेकांना आहे. तर, विम्याची मिळणारी रक्कम मग ती मुदत संपल्यावर असू दे किंवा मृत्यूच्या पश्चात, ती करमुक्त असते हे ही कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक असेल. पण मी तुम्हाला सांगतो जर विम्याच्या संदर्भात जर आपल्याला १० प्रश्न विचारले तर खाली विचारलेल्या एका प्रश्नात नक्कीच आपली विकेट उडेल. काय राव, मग लावता का पैज! तर प्रश्न असा आहे की, चिंतामणरावांनी त्यांच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी (PG) घेतलेल्या विमा पॉलिसी दरम्यानच्या कालावधीत त्यांचा हृदय विकाराने अचानक मृत्यू झाला. जर विमा पॉलिसी घेऊन त्यांना बरोबर ४ वर्षेच झाली असतील; तर ह्या परिस्थितीत खालीलपैकी कोणता पर्याय त्यांच्या मृत्यूदाव्या संदर्भात लागू होईल? 1. दाव्याची रक्कम न मिळता पॉलिसी तिथेच संपेल. 2. त्या वेळेस दाव्याची रक्कम मिळेल पण मुदतीनंतर मिळणार नाही. 3. त्या वेळेस दाव्याची रक्कम न मिळता, मुदतीनंतर बोनससाहित पूर्ण रक्कम मिळेल. काय म्हणता? लाईफ लाईन वापरायची मुभा हवी आहे ? अहो खुशाल वापरा की....इथे कुठे मला तुम्हाला करोड रुपये द्यायचे आहेत. हा! आता सांगा बरं कुठला पर्याय निवडलात? जर पर्याय क्रमांक ३ निवडला असेल तर.......... तो..... बरोबर आहे! मंडळी आता लक्षात घ्या! लाईफबॉय साबण स्वच्छतेबरोबर सुगंधही देईल. तर, हॅाकिन्सप्रेशर कुकर अन्न तर शिजवेलच पण त्याचबरोबर अन्नाची चव पण वाढवेल. बजाज ची स्कूटर आपला प्रवासाचा वेळ तोही सुखदपणे वाचवेल. तसेच मंडळी, विमा पॉलिसी ही नुसतीच मुदतीचा विमा घेण्यासाठी नसावी( term insurance) ज्यात फक्त मृत्यू पश्चातच विमारक्कम देय होते, ना की ती परतावा करमुक्त आहे म्हणून असावी किंवा त्याच्यामुळे कराची बचत होते म्हणून असावी. पण, ती असावी कारण ह्या सर्वांबरोबर तिच्यात कर्त्याच्या पश्चात पुढील हप्ते माफ (PWB) होऊन मुदती नंतर ती आपल्या चिंतामणरावांच्या कन्येच्या उच्चशिक्षणाची स्वप्ने पूर्ण करू शकते म्हणून. कारण, आपली कर्तव्ये ही आपल्या कुटुंबीयांकरता दिवास्वप्न न ठरावी. मंडळी आपण काय कराल? व्यक्तीच्या पश्चातही प्रियजनांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या PWB करिता पण विमा पॉलिसी घ्या. कारण, व्यक्तीच्या जाण्याच्या दुःखाला काळ हे औषध असते पण नसलेल्या पैशाची सल मात्र काळानुरूप तीव्र होते. काय , बरोबर ना! |
||
'Lifebuoy, Hawkins, and Bajaj' Hello Friends! How are you? Have you heard of or seen this advertisement? "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ" Ok, if not the above then the one below? "ये जमीन ये आसमान, ये जमीन ये आसमान, हमारा कल, हमारा आज, बुलंद भारत की, बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज" What’s this? What’s going on? I will tell you, be patient. And now the last one, "हॅाकिन्स की सिटी बजे, खुशबू ही खुशबू उडी, मजेदार लज्जतदार खाना है तैय्यार, हर खाना स्वादिष्ट बनाये, मिनीटोमें झटपट पकाये, हॉकिन्स प्रेशर कुकर" Why are these being referred to here? Yes, Let me tell you! Well, friends, We all know what is life insurance, and the term plan is all hyped up. Almost all know that the returns on Life insurance are less. And, many of us also know that the insurance amount dispersed after maturity or death is tax-free. However, if you have to answer 10 questions on life insurance, you would surely fail to answer at least one. Don’t believe it? Want to bet? Well, the question is, Chintamanrao had taken an insurance policy for his daughter's higher studies (PG) and he, unfortunately, suddenly died during the tenure of the policy. The reason for death is a severe heart attack. If the age of the policy is just 4 years, which one of the following options would be applicable to his death claim? 1. Policy will terminate without settling the claim. 2. His kin would get the claim amount immediately, but not after maturity. 3. His kin would get the claim amount along with the bonus after maturity. Do you want the facility to use the lifeline to answer this? Please go ahead, as such you not be paid crores of rupees anyways. Now tell me, which option had you chosen? If you had chosen option 3, then you are right. Friends, please note this, Lifebuoy soap will provide fragrance along with cleanliness. And, Hawkins pressure cooker shall not only cook the food but shall even enhance the taste. The Bajaj Scooter shall make your travel comfortable with time-saving. Similarly, friends, insurance policy should not just be a term insurance policy in which the amount is dispersed only after death, or also not just due to tax-free returns or for savings on income tax. Instead, it should be such that after the death of the payer, there shall be a waiver of the balance premiums (PWB) that will help the daughter of Chintamanrao to complete her higher studies. Because our duties should not become incomplete dreams for our family. Friends, what will you do? Please take a policy with the PWB feature also. Because, the grief of death of our loved one would get eventually healed up, but the paucity of funds becomes more serious and intense with time. |
Comments
Post a Comment