अनुदिनी -३३ -'दुसरं अपत्य' / Blog -33 ‘Second Child’

दुसरं अपत्य

नमस्कार मंडळी!

कसा काय वाटला मार्च महिन्यातील अचानक गारवा?

सदा-सर्वकाळ असेच काहीसे तापमान असावे असे वाटले असेल ना!

मंडळी ! हा मार्च महिना संपला की 'बॅग भरो निकल पडो' हे शब्द माझ्या कानात घुमायला लागतात.

अहो सध्या फिरण्याचे वेड हे लहानांपासून थोरांपर्यंत पसरले आहे.

अगदी सेवानिवृत्तीनंतर पण, युरोप नाहीतर दुबई ची ट्रीप ही होतेच.

काय बरोबर ना!

आणि आजकाल बघाल तर 'साठी' नंतर ही रिटायर्ड मंडळी चांगली हिंडती फिरती उत्साही असतात.

का नाही?

एकतर निवृत्ती नंतर बऱ्यापैकी एकत्रित रक्कम हातात आलेली असते त्यामुळे खिसा नेहमीपेक्षा जास्तच गरम असतो.

तब्येतीचे म्हणाल तर नव-नवीन औषधांमुळे आजाराचं काही विशेष वाटत नाही.

मंडळी! असा हा उत्साह पुढेही कायम टिकवायचा प्रयत्न करायचा असेल तर दोन गोष्टी जमेच्या असणे आवश्यक आहे-

'शारीरिक-मानासिक' व 'आर्थिक' तंदुरुस्ती!

शरीराच्या व मनाच्या तंदुरुस्ती विषयी नंतर बोलू, सध्या आर्थिक तंदुरुस्ती तीही वयाच्या सत्तरीच्या पुढे कशी काय राखता येईल ते बघू.

मंडळी काय करायचं, पन्नाशी च्या थोडे २-३ वर्षे अलीकडे 'बीमा ज्योती' योजना घेतली तर सत्तरीच्या उंबरठ्यावर पुढील १५ वर्षे खात्रीपूर्वक वार्षिक उत्पन्न चालू होईल.

काय म्हणता ७०+१५ एवढे आयुष्य कोण जगेल? अहो, तुम्हाला मान्य आहे ना की, इथे कोणी अश्वत्थामा नाही, आणि आपल्याकडे इच्छा मरणाची सोय पण नाही.

त्यामुळे ह्या कात्रीत आपण जास्त वर्ष जगलोच तर काय करायचं?

तुम्हाला त्या रेमंड कंपनी च्या 'गौतम सिंघानिया' यांची गोष्ट माहिती असेलच.

"पुढच्यास ठेच मागचा शहाणा”!

काय बरोबर ना?

आपण काय कराल?

जर आपण ४७ ते ५० च्या वयोगटात असाल तर उत्तम!

महिना १२ ते १५ हजार 'बीमा ज्योती' योजनेत फक्त १५ वर्षे भरा आणि ५ वर्ष्यानंतर, वार्षिक रु ३ लाख ५० हजार खात्रीपूर्वक पुढील १५ वर्षे घ्या!

आता प्रश्न ६० च्या पुढे प्रीमियम कसा भरू?

राव! ३/४ वर्षांचा तर प्रश्न आहे आणि मनावर घ्याल तर सगळं काही शक्य आहे.

असे समजा उशिरा झालेल्या अपत्याला तुम्ही पोसत आहात.

पण खात्री बाळगा हे अपत्य ७० च्या पुढच्या आयुष्यात तुमच्या सोबत नक्की असेल.

मग, करताय ना?

Second Child

Greetings to you friends!

Did you enjoy the pleasant and unexpectedly cool climate in March?

Everyone must have felt that such a climate prevails eternally, right?

Friends, As the March month ends, the words “Bag Bharo Nikal Pado” start echoing in my ears.

Nowadays, all people, young and old alike, are craving to go on outings.  And after retirement, at least a trip to Europe or Dubai is a must. Right?

Retired people, above 60, are also seen traveling with all the zest and enthusiasm.

As such, people receive a handsome amount after retirement and therefore affordability and health do not remain an issue as there are medicines available to take care of.

Friends, if you have this enthusiasm to sustain further, then two things should be in your favor.

Good Physical-Mental and financial health.

We will discuss the wellness of physical and mental health later. First, let us see how to maintain financial wellness beyond 70 years of age.

If you take the 'Bima Jyoti' Scheme just a couple of years before you attain the age of 50, you shall get an assured annual income for 15 years when you are at the threshold of 70.

What? 70 + 15 years! Who would live that long? You will agree no one is 'Ashwatthama' here nor does anyone have the boon to summon death at will.

Therefore, if we live long in this dilemma, how do we manage?

Do you remember the saga of Mr. Gautam Singhania – the owner of Raymond Company? Well, you should learn from his experience.

What shall you need to do?

If you are in the age group of 45 to 50, it is ideal.

Pay Rs. 12000 to 15000 in the 'Bima Jyoti' scheme every month for 15 years and earn Rs. 3.5 Lakhs per annum, after 5 years for the next 15 years.

Now you may think of how to pay the premium after 60. Well, it is a matter of 3 / 4 years and if you decide, you can make it possible. Just think that you are rearing up a child you had late.

But rest assured that this child shall be with you after 70.

So! ready to go for this?

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'