अनुदिनी ३४ – ‘सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार’ / Blog 34- 'Sasta roye barbar, Mhenga roye ek bar'

'सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार'

नमस्कार मंडळी!

काय, ह्या सुट्ट्यांच्या मोसमात लॉन्ग ड्राईव्ह चा प्लॅन आहे का नाही?

नाही?

बरोबर आहे! ह्या उन्हाच्या तडाख्यात बाहेर पडायला नकोसं होत.

पण, मंडळी गरमीतच थंडीची मजा अनुभवता येणार ना!

बरोबर ना?

चला, अगदीच कुठे नाहीतर, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हापूर काय हरकत आहे?

चला, गाडी काढा आणि निघा की राव!

कार, वरून आठवलं राव आता आपल्या कारमध्ये एअरबॅग असाव्यात असा मानदंड (quality assurance) बंधनकारक करण्यात आला आहे. या आधी एअरबॅग असलेली कार घेणे हे श्रीमंतीचे लक्षण होते.

कारमध्ये एअरबॅग असाव्यात हे कायद्याने बंधनकारक केल्याने एअरबॅग असलेली कार हे गुणविशेष न ठरता आता किमान निकष ठरला आहे.

आपल्याकडे बघाल ना, तर प्रत्येक वस्तूत 'दर्जाच्या' बाबतीत असा दुजाभाव केलेला आढळेल. म्हणजे हलक्या प्रतीची वस्तू (sub-standard) पर्याय म्हणून दिली जाते हे कितपत योग्य?

खरे म्हणजे एअरबॅगला अधिक सक्षम पर्याय असू शकेल, जो सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून उजवा असेल, पण एअरबॅग नसाव्यात हा पर्याय असूच शकत नाही.

मग, काम होतंय ना? असा वरवरचा विचार करून दर्जाच्या बाबतीत तडजोड स्वीकारली जाते.

पण, आजची तरुण पिढी दर्ज्याच्या बाबतीत सजग आहे; कारण आताच्या Open market policy मुळे त्यांना उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

मग आपल्या ‘आर्थिक आयोजन-नियोजनात’ आपण, 'LAW OF AVERAGE' चा विचार करू शकतो का?

काय मंडळी चक्रावलात ना?

म्हणजे काय?

सांगतो...... सांगतो!

पण ह्या अगोदर तुम्ही ब्रँड चे दिवाने आहात, तुम्हाला नवनवीन उंची वस्तूंची आवड आहे, Tom Ford Ambre चा leather परफ्यूम, Zara चे कपडे, Tissot ची घड्याळे, Lecopper ची पादत्राणे, Gucci, Prada च्या बॅग्स, तुम्हाला वापरायला आवडतं आणि काही प्रमाणात परवडतं सुद्धा.

तर मी काय म्हणत होतो, हा,

L O A (law of average)!

मंडळी!

TOM FORD चा परफ्यूम जर ८-१० हजारांचा असेल आणि त्याच्या उच्च गुणवत्तेमुळे साहजिकच तो कमी प्रमाणात वापरून जास्त दिवस वापरता येईल. ह्याउलट इतर परफ्यूमकरिता त्यांच्या दर्ज्याच्या बाबतीत तडजोड केल्याने, कमी किंमतीत उपलब्ध होतील पण त्यांचा जास्त प्रमाणात वापर करावा लागत असल्याने लवकर संपतील.

थोडक्यात काय तर TOM FORD वर्षात एकदा घ्यावा लागेल तर इतर परफ्यूम वर्षात दोन वेळा घ्यावे लागतील.

काय मंडळी वाचून डोक्याला मुंग्या आल्या का?

तुम्हाला असंच वाटतंय ना की ह्या विवेचनाचा आर्थिक नियोजनाशी काय संबंध?

So come to the main point!

मंडळी, आपण पैसे मिळवतो ते कशासाठी ? आपल्या इच्छा जबाबदाऱ्या, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी.

त्या पूर्ण करताना, ब्रँड निवडताना, भावनेच्या आहारी न जाता एक जबाबदार, थोडासा वरवरचा पण समंजस निर्णय काय घेतो, काम तर होतंय ना? ठराविक ब्रँड न घेता काही अडत तर नाहीये ना? असा हिशोबी विचार करून आपल्या भावनेला, आवडीला मुरड घालतो.

बरोबर ना?

पण अडत जरी नसलं तरी, मंडळी आपल्याला मनोमन खात्री असते की गुणवत्ता हवी असेल तर त्या तोलामोलाची किंमत ही मोजवीच लागते. पण, त्या वस्तू करता 'एवढी जास्त' किंमत मोजायची आपली मानसिकता होत नसते.

मंडळी, गुणवत्ता उजवी असणारी वस्तू ही जास्त दिवस उत्तम साथ देईल, त्यामुळे, 'Law of Average' च्या नियमाने तिची किंमत कमी प्रतीच्या, तडजोड केलेल्या वस्तू एवढीच येईल कारण कमी प्रतीची वस्तू लवकर निकालात निघालेली असेल.

सत्तर - ऐंशी हजाराचा ‘iphone’ सहा-सात वर्षे सहज 'टकाटक' राहील तर इतर फोन चार -पाच वर्षात मान टाकतील.

साधारण फोनची किंमत जर १८-२० हजार असेल तर इथे ‘iphone’ ची average cost येईल १२-१५ हजार.

‘सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार’ असा विचार केलात तर आपल्याला हवी असलेली वस्तूही मिळेल आणि आर्थिक नियोजनाचे समाधानही मिळेल.

काय, पटतंय का?

Sasta roye barbar, Mhenga roye ek bar

Hello Friends!

Have you planned to go on a long drive during this vacation?

No?

Quite Obvious! No one feels to go out and bear the brunt of the summer heat.

But, Friends, one can enjoy the chill in summer only, right?

So, let’s, at least, plan to go to Pachgani, Mahabaleshwar, and Kolhapur okay?

Come on get going, start the car.

We spoke of car and I remembered that now it is regulatory to have airbags fitted in the car. Earlier, buying a car with airbags was a status symbol.Because airbags are made mandatory in the car now, it does not remain a special feature but a basic requirement.

Friends! You will find that many times, quality is compromised to sell a substandard product as a discounted alternative.

How can this be justified?

Actually, there could be a better alternative to airbags in terms of safety, but having no airbags at all can never be an option as such.

People compromise on quality and safety just because they are able to manage for the time being.

But the new generation of today has more awareness of quality and because of the Open Market Policy, many better options are available.

Can we think of the 'Law of Average' in our financial arrangement and planning?

Confused?

What do you mean?

Well, I shall explain.

Before that, if you are fond of branded products and like the latest expensive merchandise. And you love using 'Tom Ford'Ombre Leather like perfume, clothes from 'Zara', Watches from 'Tissot', Footwear from 'Lee Cooper', 'Gucci' / 'Prada' bags, and so on. And for you, these products are affordable too, to a certain extent.

So, what was I telling you about? Ha yes, L O A!

Friends, the expensive Tom Ford perfume lasts much longer as you need to use it less. Whereas other subs standard perfumes, costing considerably less, exhaust early as users need to use much more for the same effect.

In short, you may require one Tom Ford perfume in a year against twice as much of the other cheaper ones.

So, perplexed, aren’t you? You might as well be thinking, what is the link between this analogy with financial planning?

So coming to the main point – L.O.A!

Friends, we earn money to accomplish our dreams, aims, and responsibilities. While we do it, we compromise by buying an optional product in place of the coveted branded product just because the other product also fulfills the requirement, if not fully. Not buying the specific brand does not really hamper the purpose or utility.

Right?

But though, the other product would fulfill the requirement to a large extent, at the back of our mind, we are fully sure that the quality comes at a cost, and it needs to be paid if one wants quality. However, we hesitate to pay the additional cost.

Friends, a quality product shall last longer, always. Thus, as per the 'Law of Average', the cost of a quality product will become equivalent to the cost of a cheap product over time, as the cheap product will be rendered useless early.

An 'iPhone' costing ₹. 60/70 thousand shall last for 6 to 7 years where as other phones shall become outdated or useless within 4 to 5 years.

If the cost of another phone evaluates to about 18 to 20 thousand, then the average cost of an 'iPhone' would be 12 to 15 thousand.

If you follow the principle of 'Short-term benefits cost less and long-term benefits cost more', then you will also be able to use the coveted product as well as you will get the satisfaction of fruitful financial planning.

Do you Agree?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !