रिटर्न फ्रॉम मेक्सिको - Return from Mexico



नमस्कार मंडळी !

नुकतेच आम्ही निमिषला भेटायला अमेरिकेत, कनेक्टटिकटला जाऊन आलॊ.कोव्हिडमुळे थोडी वाकडी वाट करून म्हणजे, मेक्सिकोतून जावं लागलं .

मेक्सिको नॉर्थ-अमेरिकेत येत असल्याने, संवादाकरिता इंग्रजी व व्यवहाराकरिता डॉलर हे भांडवल पुरेसे असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर अनुभवलं की, त्यांच्या "पिसो" शिवाय इथे व्यवहार होत नाही. त्यामुळे “पिसो” विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

बँकेत गेलो तर १ डॉलरच्या समोर १८ पिसो मिळत होते.

मनात विचार आला, अरे! इथे १८ पिसोच्या समोर १ डॉलर मिळतो आणि आपल्याला त्याकरता ७२ रुपये मोजावे लागले. घटकाभर आपण “पिसो” व “रुपया” ही चलनांची नावं बाजूला ठेवली तर काय दिसून येते? एक देश जास्त चलन मोजत आहे तर दुसरा कमी, असे का ?

मंडळी! सरळ आहे, ज्या आवश्यक वस्तूची कमतरता आहे त्याच्या करता जास्तच किंमत मोजावी लागते. "डॉलर" ह्या वस्तूची कमतरता असल्याने ती मिळवण्यासाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते.

बर! हा (डॉलर) आपल्याला का बरे गरजेचा आहे? तर ,ज्या वस्तू आपल्याला आयात (इम्पोर्ट ) कराव्या लागतात त्या वस्तूंची किमंत ही डॉलर मधेच द्यावी लागते.

आता ह्या डॉलरचा साठा का कमी आहे? असे विचाराल, तर तो मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची असलेली कमतरता,
कुठली? तर, "निर्यात" (एक्स्पोर्ट)!

आपली निर्यात (एक्स्पोर्ट) कमी आणि आयात जास्त (इम्पोर्ट ) आणि त्यामुळे साहजिकच "डॉलरची" शिल्लक कमी राहते आणि मग वस्तूची शिल्लक कमी पण मागणी जास्त की सहाजिकच त्या वस्तूचा भाव, किंमत, वधारते!

मंडळी! मागणीच्या तीव्रतेनुसार डॉलरच्या किंमतीचा आलेख बदलत असतो.

आता तुम्हाला कळलं असेलच की, १ डॉलरच्या समोर “७२ रुपये” दिसायला धष्टपुष्ट वाटत असले तरी ते खऱ्या अर्थाने निरोगी अर्थव्यवस्थेचे लक्षण नव्हे.

आपल्या रुपयाला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्व प्राप्त होण्यासाठी वजन कमीच करावे लागेल. थोडक्यात, वजन कमी करून वजन वाढवणे, बरोबर ना !

आता थोडंसं आपल्या घरात डोकावून बघू !

आपले वजन न वाढता आर्थिक व्यवहारात आपले वजन कसे वाढेल, म्हणजे आपली पत कशी वाढेल?

तर, उत्पन्न (Income) वजा बचत (Savings) = खर्च (Expenses)
हे धोरण ठेवा ना कि उत्पन्न
(Income) वजा खर्च (Expenses) =बचत (Savings).

खर्च करतांना आवश्यक व चैनीच्या असे वर्गीकरण करा. आवश्यक गोष्टींसाठीच कर्ज घ्या.

आपले क्रेडिट कार्डचे बिल मुदतीच्या आत आणि पूर्ण रक्कमेचे भरा.

सर्वात महत्वाचे, स्वतःला फिट ठेवा !

कारण, सीर सलामत तो पगडी पचास !

मग, कराल ना?

Namaskar !

Just about recently, we had been to see our son, Nimish, at Connecticut in the US of America. Due to Covid restrictions, traveling directly to the USA was not possible and so we had to take a detour through Mexico.

Mexico lies in the North of the USA in the American Continent. Hence, we were under the impression that we would be able to manage with Dollars and English while in Mexico. However, surprisingly, all the commercial transactions in Mexico had to be done with the Mexican currency “Peso”. And thus, we had no options left but to exchange our Dollars for Pesos.

The exchange rate for 1 Dollar was 18 Pesos. I started wondering that in India, we have to pay 72 Rupees for 1 Dollar. Whereas in Mexico, 1 Dollar costs 18 Pesos. That means the exchange rate for the global currency (Dollar) is different in different countries!! And why is this so?

It’s obvious friends. The commodity that is short in supply always costs more. We, in India, have a shortage of Dollars and hence we have to pay more for it.

Now, why do we find the dollar short in our country? That is because; we have to pay the cost of all imports in Dollars as it is a globally accepted currency. Therefore, for paying the import costs, the reserve of Dollars gets depleted. To keep the reserve levels at par, we have to replenish them.

To replenish the reserve of Dollars, we have to export goods from India in proportionate volumes and equal value or more value. As we do not have proportionate export to the import, the reserve of Dollars gets depleted. And therefore, we have to pay more for Dollars.

Friends, based on the demand, the rate of the Dollar keeps on fluctuating.

Now, I guess, you would have understood this equation of the currency exchange rate. And this is a clear indicator of a comparatively weaker economy.

When we can buy the Dollar at a lesser INR (i.e. say ₹. 50/- instead of ₹. 72/-), we can say that our economy is getting stronger.

So, friends! To increase the weightage of currency, the currency’s weight (number) has to be reduced.
Now, let’s just look at our home economy.

Our aim should be
“INCOME–SAVINGS=EXPENSES
and not “INCOME – EXPENSES = SAVINGS”.

It is important to classify the expenses in “NEEDS” & “WANTS” and spend judiciously. Borrow money only for fulfilling the “NEEDS” and not the “WANTS”. Ensure that you pay the credit card dues in full and before the due date.

And last but not the least, keep yourself fit because “Sir Salamat to Pagdi Pachas!”

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !