धूळफेक - Eyewash



नमस्कार मंडळी !

"तुमची खर्च करण्याची क्षमता ही तुम्ही किती चांगल्या प्रकारे गुंतवणूक केली आहे त्यावर अवलंबून असते."असे कुणीतरी म्हटलंय !

खरे सांगायचे तर, असे मीच म्हंटलय !

मंडळी, आज बऱ्याच जणांचा कल हा म्युचल फंडाकडे आहे. जेणे करून नेहमीच्या पारंपरिक योजना जसे, बँकेतील- फिक्स्ड डिपॉझिट, पोस्टातील- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate),किसान विकास पत्र (KVP),भविष्यनिर्वाह निधी (PPF) ह्यांपेक्षा जास्त परतावा (Returns) देणारे एक गुंतवणुकीचे साधन म्हणून त्याला झुकते माप दिले जाते.

आपण थोडं मागे वळून पाहिलंत तर आपल्याला कदाचित आठवत असेल, फंड हाऊसेस (AMC'S ) गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी २० ते २५ टक्के लाभांश देत असत. पण खरे पाहता, मित्रांनो तो "लाभांश" ही एक धूळफेकहोती, आता सेबीच्या नवीन नियमामुळे ह्या "लाभांशाचे" योग्य नामकरण झाले आहे.
तर, नक्की काय झालं?

मंडळी!

समजा रु १० दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या फंडाची आजची मार्केट मधील किंमत (NAV) रु. १०० आहे. आणि समजा त्या फंडाने २० टक्के लाभांश (Dividend) घोषित केला. आता, हा लाभांश दर्शनी मूल्यावर म्हणजे रु १० वर असतो, ना कि आजच्या मार्केट मूल्यावर (NAV) जी रु १०० आपण गृहीत धरली आहे. ह्या ठिकाणी गुंतवणुकदाराला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक युनिट मागे रु २ दिले जातील, जर त्याच्याकडे १००० युनिट्स असतील तर त्याला मिळालेला लाभांश रु २००० असेल.
ही झाली नाण्याची एक बाजू .

आता मंडळी दुसऱ्या दिवशी, या दिल्या गेलेल्या लाभांश ने (रु २) त्या फंडाचे मार्केट मूल्य (NAV) कमी केले जाते. ते रु १०० न राहता रु ९८ होते (१०० - २). थोडक्यात, लाभांश हा सध्या असलेल्या त्या फंडाच्या मार्केट मूल्याचाच (रु १००) एक भाग असतो ना कि त्या अतिरिक्त दिलेला लाभ असतो. सेबीने १ एप्रिल २०२१ पासनू "लाभांश" चे सध्या नामकरण “Income Distribution Cum Capital Withdrawn” असे केले. म्हणजे असलेल्या भांडवलातनू केलेले उत्पन्नाचे वाटप.

आपण काय केले पाहिजे ? मंडळी ! आपण जर "लाभांश” घेत असाल (Dividend Pay out) तर लक्षात घ्या, रु ५००० वरील लाभांश हा करपात्र (Taxable) आहे आणि जर आपला पर्याय हा लाभांश पुनर्गुंतवणुकीचा (Dividend Re-investment) असेल तर तो बदलून Growth पर्याय घ्यावा.

बरय तर ! “लाभांश” व्यतिरिक्त ठराविक रक्कम मिळण्याचे इतर पर्याय आपण पुढील सदरात जाणून घेऊ. आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.


धन्यवाद !

Hello !

Do you remember this quote?
“How well one can spend depends how well one has saved”.
This is an apt quote, isn’t it? Yes!! It is indeed.

And do you know who coined this quote? It’s none other but me !!

A sure-shot sign of a prudent investor. One who desires to spend the money also strives to save money.

Well, friends! Now a days, a majority of people prefer to opt for investing in the market-oriented saving instruments for their short-term financial goals with an aim to gain more than the conventional saving schemes like, Bank FD’s, National Saving Certificates (NSC) and Kisan Vikas Patra (KVP) and some of the postal schemes. Due to this newly acquired preference of the investors, Mutual Funds are gaining precedence. Further, due to various advertisements and awareness among the masses, Mutual Funds are becoming increasingly popular.

Past Story :

To garner more funds, attractive dividends (like 25%, 30% etc.) were declared and paid to the investors making it a lucrative proposition for the investors. But in real sense, it was an eyewash of the investor!! And what was glitch in this?

Please see below :

Suppose an XYZ fund with a face value of Rs. 10 per unit price has a NAV of Rs.100 and The XYZ mutual fund scheme has declared 20 per cent dividend, so the unit holder of this scheme will get dividend of Rs.2 per unit (20 percent of face value of a fund i.e., Rs.10 and not on Rs.100, which is the present NAV) Suppose an investor has 1000 units of that scheme, then the total dividend receivable would be Rs.2,000.

But, the other side of the story is, next day the NAV will get reduced by Rs.2 (the amount of dividend declared). As a result, the next day that scheme shall trade at a NAV of Rs.98 (i.e. Rs.100 - Rs.2).

So, the so called “DIVIDEND”, is the part of a shared profit from the available NAV, and not the SURPLUS income over and above the NAV, i.e.Rs.100.

Present Story : Therefore, from 1st April 2021 SEBI has and rightly termed the “Dividend Distribution” calculation as a “Income Distribution cum Capital Withdrawn”.

Call for action : Investors those looking for periodical income can stick to “Dividend Pay-out” option but keep in mind the dividend income beyond Rs.5000 in a year is taxable. But those who have selected “Dividend Re-investment” option, are suggested to switch to “Growth”.

Question : Do you know, apart from Dividend, how to generate regular fixed income? Your comments are welcome!
Thank you !

Comments

  1. Sebi change Dividend Distribution” calculation as a “Income Distribution cum Capital Withdrawn” But whether any change in taxing is affected by or not ?

    ReplyDelete

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'