Posts

अनुदिनी ४२ - 'सिग्नल' / Blog 42 - 'Signal'

Image
नमस्कार मंडळी! कसे आहात? आत्ता परवा शिळफाट्यावरून वाशीला चाललो होतो. शिळफाट्याच्या चौकाजवळ रहदारीमुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. थोडा वेळ वाट बघितली आणि नंतर गाडी बंद करून शांतपणे आजूबाजूला बघत बसलो. थोड्याच अंतरावर १२ ते १५ वर्षांची २-३ मुले चाफ्याच्या फुलांचा छोटासा हार ट्रॅफिक मध्ये थांबलेल्या गाड्यांसमोर नाचवून विकायचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात एक लहान मुलगा हातात लहान स्प्रेची बाटली घेऊन पळत येताना दिसला, त्याच्याकडे छोटासा वायपर देखील होता. समोरच्या कारच्या ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या दाराची काच त्याने पटापट हातातल्या स्प्रेने पाणी मारून, वायपरने स्वच्छ केली आणि काचेवर नॉक करून त्याने पैसे मागीतले. त्या ड्रायव्हरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण मग लगेच त्याने दुसऱ्या कारकडे धाव घेतली. काम करूनही मोबदला दिला जात नाही म्हणून कोणतेही आर्जव वा हुज्जत न घालता तो तडक नव्या उमेदीने दुसऱ्या गाडीकडे वळला होता. मंडळी बघायला गेले तर मुंबईतील कोणत्याही सिग्नलवर दिसणारे एक सर्वसामान्य दृश्य....

अनुदिनी ४१-'जिनी व राक्षस' / Blog 41- 'Genie & Demon'

Image
हॅलो, मिहीर! छान कॅफे शोधलायस. " हो आमचा वीकेंडचा अड्डा येथेच भरतो" इति मिहीर. कुमार सरांनी खुर्ची मागे सरकवून त्यावर आपली बॅग ठेवली आणि बाजूच्या खुर्चीवर बसले. " हाय मिहीर!" "हॅलो अंकल!" मुग्धा आणि राहुल दोघेही एकामागे एक दार ढकलून आत आले. "हॅलो डियर!” कुमार सरांनी दोघांना हॅंडशेक केला. “अरे, मिहीर अंकल साठी काहीच मागवले नाहीस?” मुग्धा टेबल वर पर्स ठेवत डाफरली . " अरे! आज सेकंड Saturday, आजची ऑर्डर आणि बील देण्याचा राहुलचा दिवस आहे." मिहीरने डोळे मिचकावत पाण्याचा ग्लास घेतला. “अरे, नाही! दोस्तलोग आजकी शाम अंकल के नाम" असे म्हणून कुमार सरांनी प्रत्येकाच्या हातात मेन्यू कार्ड ठेवले. “Oh no, uncle! You are our guest" तिघांनी मिळून एकाच सुरात कलकलाट करून सरांना खुर्चीत बसवले. “Rahul! you place the order.” इति मुग्धा. “मला कोल्ड कॉफी अँड नॅचोज विथ डीप” मिहीरने आपली फेवरेट ऑर्डर सोडली. “काका तुम्ही काय घेणार?” राहुलने विचारले. “मला पण कोल्ड क...

अनुदिनी ४० – ‘I -20’ / Blog 40 – ‘I – 20’

Image
"साहेब फक्त ५ वर्षे प्रीमियम भरायचा आहे” या बोलीवर आकाश ने प्रपोजल फॉर्म वर सही केली. पुढे त्याने विचार केला की सदर प्लॅन हा २० वर्षांचा आहे तर त्यातून मधेच बाहेर न पडणे हे उत्तम! त्यापेक्षा उरलेली वर्षे प्रीमियम भरणे अधिक उचित ठरेल. आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. " बाबा, युनिव्हर्सिटीचा ॲडमिटचा मेल आला!", निशिगंधा आकाशच्या गळ्यात पडत चित्कारली. "आता तुम्ही I -२० ची तयारी कराल ना?" मंडळी! ही, निशिगंधा! वय वर्षे २३, फॅशन डिझायनिंग मधे पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याच्या तयारीत. तीच्या स्वप्नांबरोबर उड्या मारणे आकाशला जड जाणार होते. पण अर्थातच मुलीचा बाप आणि तोही एकुलत्या एका, त्यामुळे त्यालाही उसने बळ आणून तिच्या उड्यांबरोबर स्पर्धा करावी लागत होती. तोंडाला फेस येणे, जीव गुदमरणे, धाप लागणे, पाय गळपटणे, या सर्व विशेषणांचा अनुभव आकाशला तीच्या MS च्या फीचा आकडा ऐकून आला. मागील १०० पिढ्यांच्या उत्पन्नाची गोळा बेरीज करूनही हा आकडा पार होऊ शकत नव्हता. सुदैवान...

अनुदिनी ३९ - 'BSc पास कि नापास' / Blog 39 - 'BSc Passed or Failed'

Image
नमस्कार मंडळी! नुकताच आम्ही आमच्या मित्रांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. त्या दिवशी कविता वाचनाचा कार्यक्रम झाला, ती कविता आपल्या सोबत शेअर करतो. तर, मंडळी! थोडं कवीते विषयी. मित्रांनो, कवीला ह्या सतत बदलणाऱ्या जगात, निसर्गचक्रात काही न बदलणारे आकडे दिसत आहेत आणि ह्या आकड्यांचा तो काही संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि काय आश्चर्य कवीला हे शब्द स्फुरले. कवितेचं नाव आहे ‘बरं झालं,आर्यभट्टाचा जन्म झाला’ सहा ऋतूंचे सहा सोहळे, सप्त सुरांनी-इंन्द्रधनुंनी जग हे सजले, आठ दिशांनी दिशा ह्या उजळे, आणि ऐकंलत का, ऐकंलत का हो, ९ व्या महिन्यात ‘हे’ बाळ जन्मले. बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला! मंडळी, बरं झालं आर्यभट्टाचा जन्म झाला! नाहीतर ९ नंतर च्या आकड्यांची अडली असती गाडी, नाहीतर टीनएज ची वळली असती बोबडी, नाहीतर नसते आले की हो धोक्याचे १६ वं वरीस, नाहीतर नसती आली गद्धेपंच्चवीशी, आणि मंडळी, बरं झालं आर...

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'

Image
‘EPS-NPS’ "यावे यावे!" अप्पासाहेबांनी दार उघडून महेशच व त्याच्या सौ चं स्वागत केलं. "अगदी वेळेवर आलास!" इती अप्पासाहेब. "हं... जेवणाची वेळ आणि आमंत्रण आम्ही टाळत नसतो." महेश ने लगोलग चौकार मारला. " तू लेका सुधारायचा नाहीस" अप्पासाहेबनी हसत हसत महेशच्या पाठीवर थाप मारली आणि सोफ्यावर बसवले. "अरे सकाळच्या न्याहारीलाच (breakfast) आलो असतो पण 'EPS' चा फॉर्म भरण्याच्या विषयी माहिती बघत बसलो आणि उशीर झाला. "तुला काय वाटते वाढीव पेन्शन चा पर्याय निवडावा की नको?" "तू आता भरला आहेस ना, मग काय काळजी करतोस." "अरे, नाही! मी फक्त माहिती गोळा करत होतो." "तुझे मत काय?" "बरं, ऐका! हे वेलकम ड्रिंक, 'पन्ह' घ्या!" इति सौ. बळवंत वहिनी. "आता तुझ्या बाबतीत म्हणशील तर पहिली बाब अशी की, तुला साधारण मागील १...

अनुदिनी ३६ -'लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज' / Blog no. 36 - 'Lifebuoy, Hawkins, and Bajaj'

Image
‘लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज’ नमस्कार मंडळी! काय, कसे आहात? तुम्ही ही जाहिरात बघितली किंवा ऐकलीत का? "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय लाईफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ" बरं, ही जाहिरात? "ये जमीन ये आसमान, ये जमीन ये आसमान, हमारा कल, हमारा आज, बुलंद भारत की, बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज" अरे, काय चाललंय? सांगतो, सांगतो! आणि ही एक शेवटची, "हॅाकिन्स की सिटी बजे खुशबू ही खुशबू उडी मजेदार लज्जतदार खाना है तैय्यार हर खाना स्वादिष्ट बनाये, मिनीटोमें झटपट पकाये हॉकिन्स प्रेशर कुकर" ह्यांचा इथे काय संबंध? सांगतो, सांगतो! बरं, मंडळी आपल्याला लाईफ ईन्शुरन्स काय असतो हे माहित आहे. टर्म प्लॅनचा तर राव, मोठाच गवगवा आहे. आयुर्विम्यात परतावा हा कमी असतो ही माहिती बहुतेकांना आहे. तर, विम्याची मिळणारी रक्कम मग ती मुदत संपल्यावर असू दे किंवा मृत्यूच्या पश्चात, ती करमुक्त असते हे...

अनुदिनी ३५ – ‘निवांत’ / Blog 35 – ‘Relaxed’

Image
‘निवांत’ नमस्कार मंडळी! काय कसे आहात? असे विचारल्यावर, "मजेत, छान, मस्त, ठीक," यांपैकी कोणतेही उत्तर न येता "एकदम निवांत" असे चारही मुंड्या चीत करणारे उत्तर कसे वाटते? मागील आठवड्यात आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला भेटण्याचा, दर्शनाचा योग आला. तिथे ह्या 'एकदम निवांतची' गाठ-भेट झाली. म्हणजे तिथे कोणी कोणाची ख्याली-खुशाली विचारली की त्याला एकच उत्तर, 'एकदम निवांत'! मंडळी, निवांत म्हटलं की कसं एकदम 'शांत, शांत' वाटतं ना? म्हणजे आपल्याकडील, मजेत, मस्त, छान, यांच्यापेक्षा अधिक उजवा 'निवांतपणा' वाटतो ना? ह्या, 'निवांतपणात' असं वाटतं जणू काही एकदम समाधीच लागली आहे, आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून एकदम अलिप्त! असा हा 'निवांतपणा' आपल्याला साठी नंतरच जवळचा वाटतो; आपल्या पेन्शनच्या कारकीर्दीत. बरोबर ना! आता, पेन्शन म्हंटलं की Employees’ Pension Scheme (EPS), Superannuation Scheme, National Pension Scheme (NPS), हे परि...

अनुदिनी ३४ – ‘सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार’ / Blog 34- 'Sasta roye barbar, Mhenga roye ek bar'

Image
'सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार' नमस्कार मंडळी! काय, ह्या सुट्ट्यांच्या मोसमात लॉन्ग ड्राईव्ह चा प्लॅन आहे का नाही? नाही? बरोबर आहे! ह्या उन्हाच्या तडाख्यात बाहेर पडायला नकोसं होत. पण, मंडळी गरमीतच थंडीची मजा अनुभवता येणार ना! बरोबर ना? चला, अगदीच कुठे नाहीतर, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हापूर काय हरकत आहे? चला, गाडी काढा आणि निघा की राव! कार, वरून आठवलं राव आता आपल्या कारमध्ये एअरबॅग असाव्यात असा मानदंड (quality assurance) बंधनकारक करण्यात आला आहे. या आधी एअरबॅग असलेली कार घेणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. कारमध्ये एअरबॅग असाव्यात हे कायद्याने बंधनकारक केल्याने एअरबॅग असलेली कार हे गुणविशेष न ठरता आता किमान निकष ठरला आहे. आपल्याकडे बघाल ना, तर प्रत्येक वस्तूत 'दर्जाच्या' बाबतीत असा दुजाभाव केलेला आढळेल. म्हणजे हलक्या प्रतीची वस्तू (sub-standard) पर्याय म्हणून दिली जाते हे कितपत योग्य? खरे म्हणजे एअरबॅगला अधिक सक्षम पर्याय असू शकेल, जो सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून ...

अनुदिनी -३३ -'दुसरं अपत्य' / Blog -33 ‘Second Child’

Image
दुसरं अपत्य नमस्कार मंडळी! कसा काय वाटला मार्च महिन्यातील अचानक गारवा? सदा-सर्वकाळ असेच काहीसे तापमान असावे असे वाटले असेल ना! मंडळी ! हा मार्च महिना संपला की 'बॅग भरो निकल पडो' हे शब्द माझ्या कानात घुमायला लागतात. अहो सध्या फिरण्याचे वेड हे लहानांपासून थोरांपर्यंत पसरले आहे. अगदी सेवानिवृत्तीनंतर पण, युरोप नाहीतर दुबई ची ट्रीप ही होतेच. काय बरोबर ना! आणि आजकाल बघाल तर 'साठी' नंतर ही रिटायर्ड मंडळी चांगली हिंडती फिरती उत्साही असतात. का नाही? एकतर निवृत्ती नंतर बऱ्यापैकी एकत्रित रक्कम हातात आलेली असते त्यामुळे खिसा नेहमीपेक्षा जास्तच गरम असतो. तब्येतीचे म्हणाल तर नव-नवीन औषधांमुळे आजाराचं काही विशेष वाटत नाही. मंडळी! असा हा उत्साह पुढेही कायम टिकवायचा प्रयत्न करायचा असेल तर दोन गोष्टी जमेच्या असणे आवश्यक आहे- 'शारीरिक-मानासिक' व 'आर्थिक' तंदुरुस्ती! शरीराच्या व मनाच्या तंदुरुस्ती विषयी नंतर बोलू, सध्या आर्थिक तंदुरुस्ती तीही वयाच्या सत्तरीच्या पुढ...