अनुदिनी ६७ - निलेकणी / Blog 67 – Nilekani
नमस्कार मंडळी!
काय मंडळी, कसाकाय वाटतोय अवकाळी पाऊस?
ऐन मे महिन्यात नद्या, नाले, दुथडी भरून वाहत आहेत.
पण राव, अश्या कुंद वातावरणात खासकरून शनिवारच्या दुपारी मस्त ताणून दिल्यानंतर, गरमगरम चहाच्या घुटक्या सोबत एखाद पुस्तक वाचायला एकदम भारी वाटते.
मागच्या शनिवारी नंदन निलेकणी ह्यांचं पुस्तक वाचनात आलं.
तर मंडळी एखाद्या शनिवारी, मस्त दुपारच्या चहाच्या नाहीतर कॉफीच्या घोटासोबत तुम्ही आणि ‘ती’ (जर कॉफी असली तर) आणि.....?
हा! तर ही जी तिसरी गोष्ट आहे ना, तर खरं बघता या तिसऱ्याची निवांतक्षणी गरजच नसावी तरच खऱ्या अर्थाने छान कीक लागते म्हणा किंवा अगदीच त्याला सोज्वळ शब्दात सांगायचं म्हटलं तर तंद्री लागते. आता ही तंद्री, कीक मन निवांत करण्यासाठी असते, खरंतर असायला हवी.
पण होतं काय तर ती तिसरी गोष्ट ही योग क्रिया साधू देत नाही. म्हणजे होतं असं की, मस्तपणे त्या पेयाच्या घोटासोबत त्याचा तो मंद सुगंध आणि जिभेवर रेंगाळणारी चव चाखत कंठामधून तिचा होत असलेला प्रवास हे सगळं अनुभवलं गेलं तर ते पेय पिण्याची लज्जत काही औरच. पण मघापासून सारखा त्या तिसऱ्याचा उल्लेख जो मी करतोय ना तो हे शक्य होऊ देत नाही.
“कौंन है वो?”
सांगतो मंडळी सांगतो, वैतागू नका!
अहो, तो म्हणजे मोबाईल, नाहीतर लॅपटॉप, नोटपॅड आणि त्यावरील असंख्य वेगवेगळी ॲप्लिकेशन्स!
हा! तर हे सगळं आपल्या जीवनातील साध्या साध्या आनंदाचा, आनंदी क्षणांचा अक्षरशः भुगा करतात.
हा, तर मी तुम्हाला सांगत होतो ते निलेकणी यांच्या पुस्तकाबाबत.
‘द आर्ट ऑफ बिटफुलनेस’ हे त्या पुस्तकाचं नाव. आजच्या डिजिटल युगात शांत कसं राहायचं याबाबत त्यांनी अनेक उपाय सुचवलेत. त्यातील मला आवडलेल्या प्रकरणाविषयी म्हटलं आपल्याला सांगावं.
मंडळी! आज ही जी शापित उपकरणं आहेत ना, त्यांना जणू नीलेकणींनी या पुस्तकाच्या माध्यमातून जणू उःशाप दिला आहे. डिजिटल उपकरणं म्हणजे जिथे आपण डिजिटल काम करायला किंवा मनोरंजनासाठी जातो ती जागा, अशी आपली बहुतांश कल्पना असते.
त्या ऐवजी ही उपकरणं म्हणजे आपलं विस्तारित मन, असा विचार केला तर आपण प्रत्यक्ष जगात कसा विचार करतो, आणि कसे वागतो यात बदल करण्यासाठी त्यांचा वापर करता येईल. तर ह्या विस्तारित मनाचा उपयोग भविष्यात गरज पडू शकणाऱ्या माहितीची साठवण करण्यासाठी करणं हे निलेकणी सुचवतात.
कुठलीही चांगली सवय जोपासण्यासाठी किंवा एखाद्या वाईट सवयीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कार्य स्मृतीचा वापर करता आला पाहिजे. या संदर्भात ते प्रेमजींचे उदाहरण देतात. दिलेलं वचन, शब्दाला जागणारी व्यक्ती असा त्यांचा लौकिक आहे. त्याकरता ते इंडेक्स कार्डचा वापर करतात त्या दिवशीच्या दिलेल्या वचनांचा त्यामध्ये उल्लेख करतात आणि योग्य प्रकारे फाईल करतात. जेणेकरून ते आवश्यकतेनुसार पटकन शोधता येते.
मंडळी यातील एक प्रकरण आहे ‘सुस्पष्ट विचार कसा करावा?’
मुळात मला सुस्पष्ट विचार करण्याची गरज आहे का? किंवा, का आहे? याविषयी ते सांगतात की, केवळ स्पष्ट विचार करणे हे महत्त्वाचे नसून ते तसे ठळकपणे कागदावर उतरवल्या शिवाय त्यांना मूळ स्वरूप येणार नाही. विचार करणं हे इतर अनेक कौशल्यांसारखेच कौशल्य आहे. जाणीवपूर्वक सराव करून ते आत्मसात करणे शक्य आहे. स्वतःचे विचार समजून घेऊन ते विकसित करण्यासाठी लिखाण हा उपयुक्त मार्ग आहे, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालं आहे. हा जाणीवपूर्वक सराव सहजगत्या सवयीत बदलण्यासाठी तुमचं विस्तारित मन तुम्हाला मदत करू शकतं.
हे विस्तारित मन म्हणजेच आधी उल्लेख केल्याप्रमाणे आपली सर्व उपकरणं आणि त्यावर चालणारी असंख्य ॲप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स. मंडळी, ते सांगतात की, सर्वप्रथम तुमचे विचार लिहून काढण्यासाठी आवडीच्या उपकरणावर जागा तयार करा. तुम्हाला कशाविषयी लिहायचे आहे ते ठरवा. त्याने तुमचे मन मोकळे होईल तुम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे त्याबद्दल लिहा. थोडं थांबून तुम्ही काय लिहिलं आहे त्याबद्दल मनन करा.
तर मंडळी निलेकणी आपल्या हाती असणाऱ्या या उपकरणांच्या आधारे जर्नल लिहिण्याचे सुचवतात. त्यासाठी त्यांनी काही टप्पे सुचवले आहेत.
तर मंडळी, ह्या पुस्तकातील तेरा प्रकरणातील आवडलेल्या एका प्रकरणाची ही थोडक्यात ओळख. पुस्तक खरोखरच हटके आहे याबद्दल शंकाच नाही.
भेटूया पुढल्या महिन्यात नवीन विषयांसोबत.
--------------------------------------------------------------------
Hello Friends!
So, how are you coping with these non-seasonal rains?
Right in the summer of May, the rivers and canals are overflowing.
But Friends, in such a damp atmosphere, particularly after the siesta on a Saturday, it does feel euphoric to read a book while sipping on the piping hot tea, doesn’t it!
Last Saturday, I had the opportunity to read a book authored by Nandan Nilekani.
So, friends! On a Saturday, relishing the afternoon, it’s you, the drink (tea or coffee), and ….?
Yes! The third thing I mentioned above is unnecessary during serene moments; only then can you truly enjoy the drink, which can put you in a trance.
This trance is essentially required to calm your mind, but the third thing prevents this from happening.
It happens so that while you sip the drink and assimilate its mild scent, the lingering taste on the tongue and its journey down the throat enhance the savouring multifold.
But the third thing that I have been mentioning won’t let this happen.
“Who is this third entity?”
I shall tell you, be patient.
It is the ubiquitous mobile, laptop, or notepad, along with the numerous apps on it. These culprits literally pulverise those small, happy moments in our lives.
So, I was telling you about the book authored by Nilekani.
'The art of bitfulness' is the name of that book.
Friends! He has recommended many remedies and solutions to maintain calm in this digital age.
I thought I'd share a case that I like from the book.
Friends, to circumvent the bane of these gadgets, Nilekani’s remedies are a boon, literally. The general notion is that digital gadgets are those that help us perform digital tasks or engage in entertainment.
Instead, Nilekani suggests, if we think that these gadgets are extensions of our minds, then we can use them to change or improve the way we think and behave. Furthermore, this extended mind can be utilized to store critical information that may be needed in the future.
To inculcate a good habit or to rid ourselves of a bad one, we must be able to use task memory effectively. In this context, he cites the example of Premji. He is renowned for keeping his word and fulfilling his commitments. For this, he used an index card and made a note of his commitment, filing it properly. This serves as a ready reckoner.
Friends, there is one chapter in the book called 'How to Think Clearly?'
Fundamentally, it is essential to understand whether it is necessary to think clearly.
Or why should one think clearly?
He says that it is not sufficient to think clearly, but to jot it down in bold on paper until it can manifest.
Thinking is a skill like other skills. It can be inculcated by practicing it consciously. To understand one's thoughts and then to develop them into manifestation is accomplished through writing. This has been proved time and again.
Your extension of mind helps you to convert this conscious practice into a habit.
This extended mind is nothing but the aforesaid gadgets and the numerous software running on them.
Friends, he says that to jot down your thoughts, make a special space on these gadgets. Clarify which subject you wish to explore and write about. Your mind shall declutter, and you shall focus on the subject and write about it. Reflect on it.
In short, Nilekani suggests us write our journal. And he has suggested a few steps for this.
So, friends, these are excerpts of what I liked among the 13 chapters of the book.
The book is, without doubt, distinctively good.
See you next month with a new topic.
Comments
Post a Comment