अनुदिनी ६४ -Assured and Insured / Blog 64 – Assured and Insured

 

अरे आहेस कुठे?” चिटणीस साहेब फोनवर बोलत होते. 

आता छान थंडीची सुरवात झाली आहे चला आपल्या नाशिकच्या बंगल्यावर जाऊ. येताना किरण,भाई आणि हेमंतलासुद्धा घेऊन ये.”

हे आमचे चिटणीस साहेब, वय-वर्ष ६२. एका नामांकित विमा कंपनीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. कारण त्यांना बऱ्याच वर्षांपासून नाशिकला घेतलेल्या जागेवर मनासारखं घर बांधायचं होतं. एकदम हौशी माणूस! बंगल्याच्या बाजूला कलमी आंबा,फणस, जांभूळ यांची झाडं लावून त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी माळी पण ठेवला होता. 

सर्व मंडळी गाडीमध्ये बसून नाशिककडे जाण्यास निघाली. एका झोकदार वळणावर बाईकवाल्याला चुकवताना किरणने गाडी बैलाला धडकवली. सुदैवाने बैल घाबरून शेतात पळाला आणि गाडीचे फक्त बोनेट एका बाजूने चेपले. 

साहेब, मागे एकदा माझी गाडी पण झाडावर धडकली. एका बाजूचा हेडलाईट फुटला. बोनेट चांगले चेपले गेले. दहा-बारा हजाराचा फटका पण बसला (बिल झाले). पण कंपनीने हेडलाईटचे पैसे द्यायचे नाकारले. एवढा हप्ता दरवर्षी न चुकता भरूनही विमा कंपनीची ही अरेरावी!  इती हेमंत. 

अरे किरण, पुढच्या डाव्या गल्लीत घे" पहिलाच बंगला. चिटणीस साहेबांनी गाडी नेहमीच्या ठिकाणी पार्क करून सर्वांना उतरायची खूण केली.

हेमंता, आपण नंतर थोड्या वेळाने बोलू!” असे म्हणून चिटणीस साहेब केअरटेकरच्या खोलीकडे गेले. 

हा हेमंत, ये बैस!"  चिटणीस साहेबांनी समोरची खुर्ची बाजूला सरकवून दिली. 

अरे, मघाशी आपलं गाडीतलं बोलणं अर्धवट राहीलं.

हा, तर काय असतं सर्वसाधारण विम्यात (General Insurance) दावा पूर्तता करताना ‘To indemnify a  loss  and  not to make a profit’ या तत्त्वाचे पालन केले जाते. त्यामुळे तू जे मगाशी म्हणालास की हेडलाईट चे पैसे कमी केले, तर ते तसं नसून तुझ्या गाडीच्या प्रकारानुसार एक ठराविक रक्कम नियमानुसार विमा कंपनी दाव्यातून वजा करते. त्याला ‘प्रमाणीत वजावट’ (Standard Deduction) म्हणतात आणि त्यामुळेच तुला दाव्याची पूर्ण रक्कम मिळाली नाही. 

ऐक, सर्वसाधारण विमा व्यवसायात (General Insurance) ज्यात व्यक्तीच्या आयुष्यावरील विम्याव्यतिरिक्त इतर विमा प्रकार येतात. म्हणजे वाहने, प्राणी, एखादी स्थावर मालमत्ता, सेवा वगैरे.  त्यात जो काही करार विमा कंपनी व ग्राहकासोबत होतो तो ‘Insurance Contract’  असतो. त्यात एखादी 'सेवा' म्हण किंवा एखादी 'वस्तूएका ठरावीक रकमेकरिता ‘Insured’  केली जाते. 

पण मित्रा, जर तू आयुष्यावरील विम्याच्या (Life Insurance)  बाबतीत विचारशील तर तो असतो  'Assurance contract.’ 

आयुष्यावरील विमा करारात 'Sum Assured' अशी शब्दरचना असते. त्याचा अर्थ विम्याची पूर्ण रक्कम मुदती नंतर किंवा त्या व्यक्तीच्या पश्चात दिली जाते.

पण, ‘सर्वसाधारण विमा व्यवसायात’ (General Insurance) झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात, विमा रकमेच्या काही टक्के दावा (claim) दिला जातो, ना की पूर्ण विमा रक्कम! 

अरे बापरे! केवढ्या सहजपणे आम्ही बोलण्यात ‘Insurance’ आणि ‘Assurance’  शब्द वापरतो. पण त्याचा एवढा खोलवर विचार कधीच केला नाही आणि हेमंतने हातातला ग्लास टिपॉय वर ठेवला. तेवढ्यात आतून खानसाम्याचा आवाज आला, "पाहुणेमंडळी या स्वयंपाक तयार आहे!”

_______________________________________________


“Hey, where are you?” Mr. Chitnis was talking on the phone.


“The winter has just begun, so let’s go to our Bungalow at Nashik. And bring along Kiran, Bhai, and Hemant when you come.”

 

This is our Mr. Chitnis, age 62, who voluntarily retired from a renowned insurance company because he had a long-standing desire to build a house to his liking in Nashik. He is a very enthusiastic person. He had plants of jackfruit, hybrid mango, jambul, etc., and had appointed a gardener to tend to these plantations.

 

All these people were on their way to Nashik when Kiran maneuvered the car to avert a collision with a biker. Instead, he collided with a bull. Luckily, the bull got scared and ran into the field, and fortunately, only the bonnet was dented on one side.

 

“Sir, some time ago, my car, too, had collided with a tree. One of the headlights got smashed, and the bonnet had a big dent. I had to spend 10 to 12 thousand Rupees to repair the car. But the insurance company was adamant and did not pay for the headlights, in spite of me paying the premium promptly every year” – complained Hemant.

 

“Kiran, next left lane, first bungalow.” Mr. Chitnis parked the vehicle at his usual spot and signaled everyone to get down.

 

“Hemant, we will talk about this in some time,” said Mr. Chitnis, walking towards the caretaker's room.

 


“Yes, Hemant, sit.”


 Mr. Chitnis offered a chair to Hemant to sit on. 


“Our discussion was halfway through in the vehicle then.”

 

“So, usually, the general insurance follows the principle of indemnification of the loss and not profiteering. Therefore, as you said then, the insurance company did not pay the cost of the headlight, which is not true. Instead, as per the rules and vehicle type, the insurance company deducts a certain amount from the claim. This is called a standard deduction, which is why you did not get the entire claim amount.”

 

“See, in general,​insurance businesses that cover other types of insurance other than life, such as vehicles, animals, immovable property, services, etc., are governed by the ‘Insurance contract’ between the insurance company and the customer.”

 

“As per the contract, the ‘Service’ or the ‘item/entity’ is ​'Insured​' for a certain amount.”

 

“Whereas in the case of life insurance, it is an

‘​Assured ​Contract.’

 

The life insurance contract mentions​'Sum Assured,​' ​which means the entire insured amount is paid after the term or after the insured's death.

 

However, in ​'General ​Insurance,​' a certain proportional amount of the loss is paid, not the entire insured amount.

 

“Oh, Ho! We use these words ‘Insurance’ and ‘Assurance’ so casually, but we never thought so deeply about this,” said Hemant, placing his glass on the tepoy. 


Just then, the cook called out from the kitchen, “Common guests, food is ready.”


Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !