अनुदिनी ६३ -वार्षिकी / Blog 63- Annuity

 


नमस्कार मंडळी!


मंडळी, बघता बघता नवरात्र संपून दसरा आला आणि गेला की. 


आता वेध लागले दिवाळीचे. 


काय बरोबर ना!


मंडळी, आपल्या  पूर्वजांना मानले पाहिजे ना! . 


का?


अहो विचार करा, श्रावण महिन्यापासून सणांची जी काही त्यांनी आखणी केली आहे ती, 'बरसात' अगदी दिवाळी पर्यंत असते. आणि मंडळी श्रावणात भलेही आजूबाजूला सगळा किचकीचाट जरी असला तरीदहीहंडी म्हणा रक्षाबंधन, गौरी गणपती, नवरात्र सगळे सण आपण एकदम जल्लोषात  साजरे करतो. 


राव, चैत्रात भलेही झाडांना पालवी फुटते पण खरा निसर्ग सजतो तो याच दिवसांत. 

असो, तर आता आजच्या अनुदिनीचे (Blog) आणि या सर्व गोष्टींचं काय नातं असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल! 


तर मंडळी या सर्व घडामोडींमध्ये सुसूत्रता आहे, एक ताल आहे, शाश्वती आहे. या चक्राच्या भरवशावर,सुसूत्रतेवर, आपणच काय तर  शेअर बाजार देखील ताल धरून असतो. 


थोडक्यात काय तर, 'जिंदगीमे भरोसा चाहिये!'. 



तर, झालं असं! आत्ताच श्रीयुत अप्पासाहेबांचा मृत्यू दावा, (Death claim ) दिला. 


मंडळी, त्यांनी घेतलेल्या योजनेविषयी मी आपल्याला काही सांगू इच्छितो.


तर, आज वयाच्या सत्तरीला अप्पासाहेब गेले. त्यांनी एक  रकमी रुपये १६,८२५ भरून भारतीय  आयुर्विमा महामंडळाची (LIC)  'जीवन धारा' ही योजना घेतली होती. त्यात त्यांना २१ वर्षानंतर पेन्शन सुरु होणार होती जी त्यांच्या वयाच्या अठ्ठावन्न पासून रु १,३२१ महिना त्यांना मिळतही होती. 


आणि आज त्या योजनेंतर्गत त्यांच्या वारसाला रु १,४५,३२७ खात्रीपूर्वक मिळाले. 


आता आपण आकडेमोड करूया!


रुपये १६,८२५ एक रकमी २१ वर्षांकरिता गुंतवले आणि मिळणारा खात्रीपूर्वक परतावा जर रुपये १,४५,३२७  असेल तर अप्पासाहेबांना परताव्याचा दर काय पडला?


मंडळी मी सांगू की तुम्ही उत्तर काढता?


किती आला?  


वर्षाला १०.८१% बरोबर ना


आणि आता दुसरी आकडेमोड.


त्या परताव्याच्या व्यतिरिक्त अप्पासाहेबांना अठ्ठावन्न वयापासून दरमहा रुपये १३२१ आज पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या एकोणसत्तर वयापर्यंत म्हणजे गेली अकरा वर्षे वार्षिकी रूपाने (Annuity/Pension)  मिळत होते.  


आता हे महिना रू १३२१ म्हणजे वर्षाला झाले १५,८५२. 


आता ही वार्षिकी (Annuity/Pension) ज्या रकमेवर मिळत होती (Give  Amount) ती रक्कम होती रू १,४५,३२७. 


आता, ह्या १,४५,३२७ रकमेच्या समोर रु १५,८५२ वर्षाला दिले जात होते तर मंडळी परताव्याचा दर काय होता?


आता परत आकडेमोड! 


वर्षाला १०.९१ टक्के राव! आणि तोही आजीवन! 


काय! तोंडाचा '' वासलात ना मंडळी!


ही वार्षिकी त्यांना २०१३ पासून सुरू झाली, ज्यावेळेस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF ) ( त्या काळातले  सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे माध्यम) चा व्याजाचा दर होता ८.७% आणि तोही फक्त त्या वर्षाकरिता, म्हणजे पुढल्या वर्षी तोच असेल असेही नाही.  


थोडक्यात काय मंडळी वार्षिकी (Annuity/Pension) योजनांना आपण 'आर्थिक गुंतवणुकीतयोग्य स्थान द्या. थोड्याफार फरकाने आजही ह्या योजना उपलब्ध आहेत.


ही योजना तुम्हाला शाश्वत उत्पन्नाची आजीवन हमी देते आणि मित्रांनो तुम्हालाच नाही तर तुमच्या पश्चात जोडीदारालाही! 


तर, जेवढा विश्वास निसर्गचक्रावर आहे, त्यापेक्षा काकणभर जास्त विश्वास आपण आजीवन मिळणाऱ्या वार्षिकीवर ठेवू शकता.


बाकी भेटीअंती बोलूच.


धन्यवाद!

__________________________________________________



Hello Friends!


Friends, Time flies; the Navaratri culminated into Dusherra before we could realize it.


Now we are looking forward to Diwali,


Isn’t it?


Friends, shouldn’t we appreciate our ancestors?


Why?


Just look at it—the festivals are lined up from the month of Shravan to Diwali—about three wholesome months of festivities!

 

Though there is a lot of murk and sogginess due to the rains in Shravan, we celebrate all the festivals (Dahihandi, Rakhabandhan, Ganpati, etc.). 


With all the fervor and enthusiasm.

 

Friends, though the spring brings trees to life with new blooms in Chaitra, nature is actually ornate during these festive days.

 

So, let's return to our blog. You may be wondering what all the above has to do with today's blog.

 

Friends, all these events have proper coordination, pace, and, above all, assurance. 


Not only are we attuned to this coordination, but even the share market is largely influenced by it.

 

In short, you need assurance in life!


 

Recently, the death claim of Appasaheb was paid. 

 

Friends, I would like to tell you about the scheme he opted for.

 

Appasaheb died at the age of 70. 


He paid a lump sum of ₹16,825/—and purchased the LIC’s 'Jeevan Dhara' policy. 


As per the policy, he was to start getting a pension after 21 years. Accordingly, he used to get ₹1,321 per month from age 58. Apart from these, his nominee got ₹1,45,327 as committed.

 

Now, let us do some calculations.

 

What would be the rate of return where ₹16,825 would fetch ₹1,45,327 when invested once as a lump sum?

 

Should I tell, or will you calculate?

 

How much?

 

10.81 % per annum, right?

 

And now the second calculation.

 

Over and above the above returns, Appasaheb got ₹1321 per month as a pension till the age of 69 years from his age of 58. That means for 11 years, he got this amount as an annuity.


So this, per month ₹1321 for 11 years calculates to ₹15,852 per annum. The amount on which this annuity was paid ₹1,45,327.

 

So, when ₹15,852 annuity was paid yearly on ₹1,45,327, what shall the rate of return?

 

It is 10.91% folks and too lifelong.

 

Aren’t you awe-struck?

 

He started getting this annuity in 2013 when PPF was the most popular investment option.


Its interest rate was 8.7% annually, but only for that year. The same rate was not guaranteed to prevail for the next year.

 

In short, annuity/pension schemes deserve a meritorious place in financial investment. These kinds of schemes are still available today, though with few changes. This scheme provides you with a guaranteed income for a lifetime and also for your spouse.

 

You can rely a bit more on the annuity than nature’s cycle.

 

Rest all discussions in person.

 

See you soon!









Comments

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !