अनुदिनी ६२ - Reverse Mortgage / Blog 62 – Reverse Mortgage

 

"दो दिवाने शहर में, रात में और दोपहर में

आब-औ-दाना ढूँढते है, इक आशियाना ढूँढते है"

हा मंडळी करा सर्च गुगलवर! 

बरोबर! 'घरोंदा' सिनेमातील हे गाणं आहे. 

घरासाठी एक प्रेमी युगुल काय करायचे ते ठरवतो आणि होते काय! 

एकदम भावस्पर्शी सिनेमा आहे राव! म्हणजे आताच्या भाषेत एकदम 'सेन्टी!

वेळ काढून जरूर बघा.

हा, तर, असो!

मंडळी घर हे जसे राहण्याचे ठिकाण आहे तसेच ते एक उत्पन्नाचे साधन ही आहे. पण बहुधा हे एक भांडवली नफा (Capital Gain) करून देणारे अथवा भाड्याच्या (Rent) रूपात  'Passive  Income'  देणारी एक मालमत्ता असेच तिच्याकडे पाहिले जाते.

या घराच्या,  'Reverse Mortgage'  च्या योजने विषयी काही ऐकलंय का?


ह्या योजने विषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत.

तर त्याविषयी थोडेसे.

मंडळी! असा विचार करा की आपल्या वयाच्या साठीला आपण कर्ज घेत आहात. 

ठीक आहे! 

आता हे कर्ज देण्याचा निकष हा तुमच्या स्वतःच्या राहत्या घराच्या विक्रीच्या किंमतीवर अवलंबून असेल. आता ह्या कर्जाचा हप्ता ठरवला जाईल पण तो तुम्ही बँकेला न देता बँकच तुम्हाला महिन्याचा हप्ता बांधून देईल आणि हा हप्ता तुम्हाला तुमच्या आयुष्यभर मिळेल.  

म्हणजे, राव! एकदम पठाणी हिशोब की!

काय, चक्रावलात ना!

हं, पुढे ऎका म्हणजे वाचा.   

मंडळी, एवढंच नाही तर ठरलेल्या हफ्त्या व्यतिरिक्त मध्येच आपल्याला गरज भासल्यास आपण एक रक्कमी रक्कम पण बँकेकडून घेऊ शकता.

एकदम मोगलाई थाट की राव!

तर, मंडळी आता या अभिनव योजनेविषयी सविस्तरपणे सांगतो.

ही 'रिव्हर्स मॉर्टगेज' योजना निवडक बँकांमार्फत राबविली जाते. त्यामागील उद्दिष्ट्ट ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हे आहे.

ह्यातील ठळक मुद्दे:

  1. सदर योजना ही वय-वर्षे ६० ते ८० वयोगटाकरता आहे.
  2. कर्जदाराच्या स्वतःच्या अथवा पत्नीबरोबर संयुक्तिक मालकी असलेल्या भारतातील घरावर हे कर्ज दिले जाते.
  3. हे राहते घर व त्याची स्थिती पुढील किमान २० ते  ३० वर्षे राहण्यायोग्य असावी.
  4. कर्जदार कर्जाची परतफेड कधीही करू शकतो. त्याला मुदतपूर्व शुल्क आकारले जात नाही. कर्जदाराच्या पश्चात त्याचे नातलग, वारसदार कर्जाची रक्कम परतफेड करू शकतात. किंवा बँक तारण असलेली मालमत्ता विकून आपली व्याजासकट, कर्जाची रक्कम वळती करून उर्वरित रक्कम वारसदाराला देते.  
  5. कर्जदाराला मिळणाऱ्या रक्कमेवर मालमत्ता वृध्दी कर(capital gain tax) लागत नाही.
  6. सदर योजनेत आकारला जाणारा व्याजदर हा गृहकर्ज योजनेपेक्षा अधिक असून तो बदलूही शकतो. ढोबळमानाने जर सदनिकेचे मूल्य रु.१ कोटी असेल तर त्याच्या ६० टक्के, म्हणजे रु. ६० लाखाच्या पात्र कर्जावर, १० टक्के व्याजदराने कर्जदाराला महिना रु. ४०,००० आजीवन तसेच रु. ५ लाख त्वरित मिळू शकतात. (नेमकी कर्जाची रक्कम आणि दर जाणून घेण्यासाठी सदर योजना विक्री करणाऱ्या बँकेशी संपर्क साधावा)
  7. कर्जदाराची सदनिका ह्या व्यवहारात बँकेत गहाण ठेवली जाते. कर्जदाराने ह्या सदनिकेचा देखभाल खर्च (Maintenance) मालमत्ता कर (Municipal Tax), पाणी व वीजेची देयके तसेच विम्याचा हप्ता वेळेत भरणे आवश्यक.             

तर मंडळी निवृत्ती नंतरच्या उत्पन्नासाठी 'रिव्हर्स मॉर्टगेज' हा हुकमी पत्ता आहे.

_________________________________________________________________


"दो दिवाने शहर में, रात में और दोपहर में, 

आब-औ-दाना ढूँढते है, इक आशियाना ढूँढते है"

 

Friends, Search this on Google!

 

Correct! This song is from the film ‘Gharonda.’

 

It showcases the struggle of a couple to attain their dream house and the dream getting shattered!

 

It is a very touching and sentimental movie. Do see this movie, please don’t miss it.

 

So, coming back,

 

Friends, as the house is a shelter, it also doubles as a source of income. But it is generally perceived as a capital gain property or a passive income-generating property through renting.

 

Friends! Have you heard anything about reverse mortgage for houses?


Many people are unaware of such a scheme.

 

I will dwell on this subject a little.

 

Friends, imagine that you are borrowing money from the Banker at the age of 60. Okay!

 

Now, the clause regarding borrowing money is based on the valuation of your house.

 

Now, the EMI of this loan will be decided, and surprisingly, the tenure will be for your lifetime.

 

Secondly, this EMI would be paid by the Banker to you.

 

That means the Banker will pay you the ‘Hapta’ till you are alive. 

 

Something like the loan repayment to a Pathan.

 

Confused!

 

Read on.


In addition to the lifetime ‘Hapta,’ you can also take a lumpsum amount from the Banker if you need money.

 

This is too profitable to be true, right?

 

Well, let me tell you in detail about this novel scheme.

 

A few selected banks implement this ‘Reverse Mortgage’ scheme, which is intended to provide a source of income to senior citizens.

 

Important highlights of this scheme:

 

  1. This scheme is for people between the ages of 60 and 80.
  2. The borrower should hold a property in his/her name or jointly with the spouse.
  3. This house should be habitable for the next 2o to 30 years.
  4. The borrower can repay the loan at any time. There will be no early repayment charges. 
  5. The borrower's relatives/kin/heir can also repay the loan. The bank can sell the property and pay the   balance to the heir after deducting the bank’s dues in case of the borrower's death.
  6. There is no capital gain tax applicable on the amount the borrower gets. 
  7. The interest rate applied on this loan is higher than the rate applied on the home loan and is subject   to change. To put it simply, if the apartment cost is ₹. 1 crore, then 60% i.e. on ₹. 60 Lacs loan eligibility, the borrower can get ₹. 40,000/- per month for lifetime and ₹. 5 lacs immediately. (to know details, please get in touch with the concerned bank)
  8. The property is mortgaged to the bank in this scheme. The borrower has to pay all the dues (maintenance, taxes, utility bills, etc.) and the property insurance premium on time. 

So, this is an ace-up of the sleeve for income after retirement.


Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !