अनुदिनी ६१ - आजीवन विमा (Whole Life plan) / Blog 60 – Lifelong plan


मृत्यू कोणालाच चुकलेला नाही!


‘सगळे काही माझ्या स्वतःच्याच इच्छापूर्तीसाठी’, असा विचार करणे हे एखादा माणूस कितीही जरी आत्मकेंद्री असला तरी शक्य नाही. 


कारण माणूस म्हणून त्याचा स्वतःचा असा गोतावळा हा असतोच. स्वतःच्या पलीकडे ह्या गोतावळ्यातील व्यक्तींसाठी त्याचे मानसिक गुंतणे हे मनुष्य स्वभावाला अनुसरून असल्याने ह्यात जगावेगळे असे काही नाही.


उलट तो जर याचा विचारच करत नसेल तर ते वेगळे ठरू शकेल. पण ते शक्य नाही ही काळ्या दगडावरची रेघ! 

फरक इतकाच असेल की ह्या गोतावळ्यातील व्यक्तींची संख्या अथवा परीघ कमी अधिक असेल.


नमस्कार मंडळी!!!! 


काय,  पकलात का?

I mean, हे सगळे वाचून बोअर झालात का?


अहो,  काय आहे ना आजचा विषयच असा आहे!  अशा प्रस्तावनेशिवाय आजच्या विषयापर्यंत पोहचू शकत नव्हतो म्हणून!


असो!

तर, आजचा विषय आहे, 'मी आजीवन विमा (Whole life plan) घेऊ की मुदतीचा (Limited term)?'

" डॅड! मी आलेच!" इती श्रीधर ह्यांची मोठी मुलगी वृषाली.

फार्मा कंपनीत R&D सेक्शनला गेल्या दोन वर्षांपासून लागली. आवडीचा जॉब आणि पॅकेजही उत्तम.

आज शनिवार असल्याने मॅडम गाडी घेऊन मित्रांबरोबर फिरायला निघाल्या.

धाकट्या अस्मिताचं  नुकतंच कॅम्पस मध्ये सिलेक्शन झाले होते.तीला बँकेत नोकरी मिळाली होती.

श्रीधर, हे दोन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. पत्नी शलाका यांची नोकरी अजून ३-४ वर्षे बाकी  होती.


एकंदरीत श्रीधर यांच्या कुटुंबात सारे काही  आलबेल  होते.



आता आयुष्याच्या ह्या वळणावर एखाद्याची काय अपेक्षा असणार, तशीच अपेक्षा श्रीधररावांची होती.
ह्या वळणावर  त्यांनाही जीवाभावाचे सोबती लाभले होते,  आपले ‘ शुगर (Blood sugar) आणि रक्तदाब (Blood pressure) हो! आणि ह्या साथीदारांचा खर्चिक सखा-सोबती, 'मेडिक्लेम'  ही त्यांच्या सोबतीला होता. 

पण मंडळी श्रीधरराव केवळ मेडिक्लेमवरच विसंबून नव्हते. तर, त्यांचा 'आजीवन विमा' (whole life plan) पण होता. त्यांच्या चाळीशीत त्यांनी हा विमा प्रस्ताव घेतला होता.  आता आपण म्हणाल  हा तर ‘आयुष्याचा विमा’ आहे, त्याचा आणि 'मेडिक्लेम'  योजनेचा काय संबंध?

हं! एकदम बरोबर!
मंडळी, ह्या योजनेतील 'बोनस', जो विमा रकमेवर दिला जातो तो इतर योजनांच्या तुलनेत  जास्त असतो. दरवर्षी तो विमा रकमेत जमा केला जातो त्यामुळे टप्या-टप्याने तो विम्याची रक्कम वाढवत जातो. म्हणजे आपल्या श्रीधररावांनी जेव्हा हा प्रस्ताव घेतला तेव्हा तो तीस लाखासाठी होता. तो आत्ता निवृत्ती नंतर रु ७० लाखापर्यंत पोहचला होता आणि त्यांच्या सत्तरीच्या दरम्यान तर तो एक करोड रुपयाच्याही पुढे गेलेला असेल. 

मग, त्याचं काय?

सांगतो!   

आता, सत्तरीत जर श्रीधररावांना काही रकमेची गरज पडलीच तर मंडळी ह्या एक करोड रुपयाच्या विमा रकमेसमोर,   जास्तीत जास्त ९५ टक्क्यांपर्यंत  रक्कम ते लोन अथवा पॉलिसी सरेंडर करून काढू शकतात.

मंडळी, याचा आपण दोन प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो.  
पहिली बाब अशी, तुम्ही जाणता की , 'मेडिक्लेम'  योजनेचा हप्ता हा खऱ्या अर्थाने माणसाची पाठ मरेपर्यंत सोडत नाही. आता आपल्या सत्तर-पंचाहत्तरीच्या वयात आपल्या वाढलेल्या 'मेडिक्लेम'चा हप्ता आपल्या प्रियजनांवर लादण्याऐवजी 'आजीवन विमा' योजनेतून तो भरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

दुसरी गोष्ट अशी की सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे आपल्या गोतावळ्यातील प्रिय व्यक्तीला ही विमा रक्कम आपण आपल्या पश्चात भेट म्हणून देऊ शकतो. महत्वाची बाब म्हणजे ह्या मिळालेल्या रकमेवर वारसदार व्यक्तीला कर भरावा लागत नाही. विशेष म्हणजे ही रक्कम वारसाला अगदी विनासायास आणि कमी कालावधीतच उपलब्ध होते.


वारसाकरता संपत्ती निर्माण करण्याचा हा खात्रीशीर व कायदेशीर मार्ग आहे.


म्हणूनच म्हणालो ना मी, की श्रीधररावांकडे सारेच अलबेल होते.स्वतःचा भार आपल्या मुलींवर टाकण्याऐवजी त्यांनी 'आजीवन विमा' (Whole life policy) या आपल्या तिसऱ्या अपत्यालाच जवळ केले होते.


तेव्हा मंडळी आर्थिक गुंतवणुकीतील कुटुंबात 'आजीवन विमा' (Whole life policy) हे अपत्य असणे अगत्याचे!

मग काय? ह्या अपत्याला जवळ करताय ना?


-------------------------------------------------------------------------------------------------






No one is immortal!


“It all for fulfilling my own wishes” Such thoughts, even if the person is selfish, can never come to one’s mind. Because humans are social animals, he has his friends and relatives. 

And beyond self, the person is inevitably attached to some people in the social group, which is quite natural. Contrary to this, it would be unnatural if the person does not think so. But that’s impossible.


The difference would be that either the people would be less, or the circle would be smaller.

Hello friends!!

Got bored? I mean, after reading all the above?

But today’s topic calls for this kind of prologue, without which this subject cannot be discussed.

Today’s topic is “Should I buy a lifelong insurance plan or a term plan?”

“Dad, I will be there soon,” shouted Shreedhar’s elder daughter.


She was working in the R&D section of a pharmaceutical company.

 

A job to her liking with a good compensation package. Today being Saturday, she was going out with her friends for an outing.The younger daughter Asmita got selected at the campus and had a job in a bank

Shreedhar had retired about 2 years ago, and his wife had another 3 to 4 years to retire.



All said, the family of Shreedhar was a well to do family.

Now, at this juncture of life Shreedhar had the same expectation that normally such people have at this age.


He had the company of diabetes and blood pressure! And the expensive Mediclaim plan too was his companion.


But Shreedhar was not dependent on Mediclaim alone, he had a lifelong plan also. He had purchased this plan in his forties.

Now you would ask, what is the relation between Mediclaim and a lifelong plan? 


You are right!

Friends, the bonus offered in this plan is higher as compared to other plans. This bonus gets added to the plan every year, and thus, the policy amount consequently gets increased.


That is when Shreedhar purchased this plan, it was Rs. 30 Lakhs, and at the time of retirement, its value increased to Rs. 70 Lacs. By the time he is in his seventies, the plan’s value would cross Rs. 1 crore.


So?

OK, let me tell you.

Now suppose if Shreedhar needs money, he will be able to borrow money on loan or surrender up to 95% against the policy amount.


Now we can use this in two different ways.


First, we all know that the premium of Mediclaim stops only after death. And in the seventies, instead of asking your loved ones to pay the increased premium, you get the option of paying the premium through the lifelong policy.

Second, as said earlier, you can nominate the policy to your loved one. 
The most important fact is that the heir of this amount does not have to pay any tax and he gets this amount easily and effortlessly.


That’s why I said that Shreedhar’s family is a well-to-do family.


Rather than depending on his daughters to pay the premium of Mediclaim, he had opted to depend on the 'Whole life insurance policy'.

So, friends, I solicit you to have this lifelong policy as a part of your financial investment.


So, are you going to have this policy?


Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !