अनुदिनी ६०- १ - SIP and SWP / Blog 60 – 1- SIP & SWP

धुरळा उडवत जीप एका कौलारु घरासमोर उभी राहिली. 

एकेक करून एक, दोन आणि तीन माणसं उतरली. डोक्यावर फेल्ट हॅट, डोळ्यावर गॉगल, हातात फिशिंग रॉड त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून गेटवर दोन कुत्रे भुंकत धावत आले.

आपण ओळखलं असेलच हे त्रिकूट पिकनिकला आलंय.

डोंगराच्या एका टोकाला शांत जलाशयाच्या बाजुलाच टुमदार कौलारु बंगली होती. बाहेर व्हरांड्याच्या समोर गवतावर केनच्या खुर्च्या होत्या, बंगल्याचा केअर टेकर झाडांना पाणी घालत होता.

शेरी-लुई! कम् हियर!”

त्या केअर टेकरने त्या दोन्ही जनावरांना आवरलं.

या!


असो. मंडळीव्हा की मोकळे आता!

अगदी एप्रिल पर्यंत इअरएंडचं काम जोरकसपणे केलंत. 

आता जरा निवांतपणा घ्या!

हं मंडळी, मला कल्पना आहे की आपण म्हणाल की “राव, असा निवांतपणा तर आम्ही दर महिना अखेरला घेतोच की!”

बरोब्बर!

पण मी सुचवतोय तो हा असा निवांतपणाआपल्या जिगरी दोस्तांबरोबर आणि तोही दर ३-४ महिन्यांनी! 

म्हणजे मंडळी, तेच तेच ऑफिसचे, व्यवसायाचे वगैरे विषय निघत नाहीत.

लहानपणीच्या  शाळा - कॉलेजमधील आठवणी, थट्टामस्करी एकदम खळखळून हसवतात आणि विशेष म्हणजे ह्या थट्टामस्करीत टार्गेट झालेलाही मनमोकळेपणाने हसण्यात मशगूल होतो; तसंच नाकाबरोबर तोंडानेही O2 फुफ्फुसांमध्ये  गेल्याने आपण एकदम ताजेतवाने होऊन जातो. परत आल्यावर कसा काम करायला एकदम उत्साह येतो.

हं तर मी काय सांगत होतो

की ह्या त्रिकूटाने त्यांच्या अशा ट्रीपकरता छोटंसं प्लॅनिंग केलं. त्यांना साधारण एका ट्रीपचा प्रत्येकी ३० ते ४० हजार खर्च येतो. तर प्रत्येकाने सुरवातीला सव्वालाख रुपये  एक रकमी म्युच्युअलफंडातील बॅलेन्स फंडात गुंतवले आणि त्याबरोबर ,००० चे SIP देखील त्याच फंडामध्ये सुरू केले.

आता तिसऱ्या वर्षापासून त्यांनी प्रत्येक ट्रिपकरिता रु ३०,०००, म्हणजे वर्षाचे चार ट्रिपचे, एक लाख वीस हजार काढायचे ठरवले.

मंडळी SIP चा वार्षिक सरासरी परतावा ९ टक्के विचारात घेतला (संभाव्य भाववाढ वजा करून) तर अवघे महिन्याला  रु ७००० म्हणजे वर्षाचे रु ८४,००० तेरा वर्षे भरून, तिसऱ्या वर्षापासून एका वर्षाला रु १,२०,००० ते पुढील अकरा वर्षे काढू शकतात.

थोडक्यात, तिसऱ्या वर्षापासून दरवर्षी सरळ सरळ रु ३६,००० हजाराची बचत आणि तीही सलग १३ वर्षे.  

काय, आहे ना Interesting ?

दुसरी महत्वाची बाब  म्हणजे एका वर्षानंतरचा म्युचलफंडातील रु १ लाखापर्यंतचा वार्षिक नफा हा करमुक्त असल्याने काढलेली रक्कम पूर्णपणे करमुक्त.  

दिलेल्या तक्त्यावरून आपल्या मित्रांचा प्लॅन तुम्हाला कळेल.

(Except column A and I, rest of the figures in the columns are in Rs.)


मग मंडळी तुम्ही केव्हा प्लॅन करताय?

-------------------------------------------------------------


The jeep, blowing all the dust, came to a halt in front of a tiled house.

One after the other, a total of 3 people alighted from the Jeep.
A felt hat on the head, goggles on the eyes, and a fishing rod in the hand.
Two dogs came running barking at the gate after hearing the noise of the Jeep.
So, Friends!
You must have already guessed that this trio had come for a picnic. At one end of the hill, near the serene lake was a small, beautiful bungalow. On the lawn in front of the Verandah were cane chairs.
The caretaker of the bungalow was watering the plants.
"Sheri – Louis come here!"
The caretaker reigned over the dogs.
Ya!!

So, Friends!

Come on, take some time out now!

Yes, friends, I am aware that you would say that we take such breaks at the end of each month.

Right!

Till April, you had been toiling to accomplish the year-end targets. Now is the right time for a break.

But the one I am recommending is with your best friends and that too after every 3 to 4 months.

Friends considering the average return of SIP at about 9% (excluding probable inflation), for the next 13 years, they can withdraw 1,20,000/- after the 3rd year by investing just ₹. 7,000/- (₹. 84,000/- annually) in SIP.

So, you can avoid those mundane office/profession-related subjects.

Instead, the childhood memories of school, college, the fun, the frolic that makes all laugh. And the ones who are targeted also laugh out heartedly. And due to this, you breathe in more oxygen not only by the nose but also by mouth, and this makes you fresh.

You are energized to work after your return.

So, what was I saying!

This trio, too, had done a small planning for this picnic. They normally incur about ₹. 30 to 40 thousand as expenses per trip per person. So, each one had invested a lump sum amount of ₹. 1,25,000/- and had started a SIP of ₹. 7000/- per month.

Interesting, isn’t it?

The second important thing is that after 1 year of investment in a Mutual fund, the profit up to ₹. 100,000/- is tax-free, and hence the withdrawal is totally tax-free.

How? Please refer to the attached chart.

(Except column A and I, rest of the figures in the columns are in Rs.)

So, friends! When will you plan?




Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !