अनुदिनी ४३ - वडापाव, दुबई, ओला आणि पर्याय 'D'

नमस्कार मंडळी!

काय म्हणतोय पावसाळा?

आता थोडा निवांतपणा आलाय म्हणजे त्याने विश्रांती घेतलीय त्यामुळे आपल्याकडे निवांतपणा आलाय.

मग कुठे पिकनिक चॉकआऊट केलीत कि नाही?

अरे, राव! काढा गाडी आणि मस्त ‘भुशी डॅमच्या’ थंडगार फेसाळणाऱ्या पाण्यात बसून गरमागरम, लज्जतदार 'वडापाव' सोबत मस्त हिरवीगार लवंगी मिरची हाणा की!

मंडळी, कसं मस्त आयुष्य झालंय ना!

मनात आलं काढली गाडी, निघालो.

आता, हे झालं तुमच्या आमच्या बाबतीत.

अहो, आजचे आजी-आजोबा देखील काही कमी नाहीत.

स्वतःच्या मोबाईलवरून 'ओला' नाहीतर 'उबर' ची टॅक्सी बुक करून फिरतात.

कधी कंटाळा आला तर 'स्वीगी', 'झोमॅटो' वरून झक्कास पैकी आवडते पदार्थ मागवतात.

स्काईपवरुन छानपैकी नातवंडांशी गप्पा मारतात.

एवढेच कशाला! एखादी दुबईची नाहीतर सिंगापूरची ट्रिपपण दोघे करून येतात.

अहो, साठीनंतर बिनधास्तपणे 'Knee replacement' चे ऑपरेशन करायला ही मंडळी तयार असतात; अगदी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्याही!

काल अँजिओप्लास्टी करून आलो हे 'morning walk' करून आलो ह्या थाटात सांगतात.

म्हणूनच सुरवातीला म्हणालो काय झक्कास आयुष्य झालंय!

आता अश्या झक्कास आयुष्याची चव चाखायची, अनुभवायची म्हणजे आपलं आर्थिक नियोजनही जरा हटके हवं ना!

जरा हटके पर्याय सुचवतोय, बघा पटतोय का?

मंडळी! आपल्याला जर एकरकमी पैसे भरून लगोलग वर्षासन (Annuity) हवं असेल तर त्या मध्ये एक पर्याय आहे,

'Annuity guaranteed for 15 years and life thereafter.'

ह्या पर्यायातील पहिल्या 'Annuity guaranteed for 15 years' ह्या ओळीचा विचार केला तर, वर्षासन (Annuity) घेणारी व्यक्ती समजा वर्षासन सुरु झाल्यानंतर ५ वर्षांनी मृत्यू पावली तर उरलेली १० वर्ष (१५-५) त्याच्या वारसाला तेवढेच वर्षासन दिले जाईल. थोडक्यात १५ वर्षाच्या आत मृत्यू आल्यास उरलेली वर्षे वारसाला वर्षासन दिले जाईल.

आता पुढची ओळ विचारात घेऊ. 'and life thereafter' म्हणजे ती व्यक्ती १५ वर्षाच्या पुढे जेवढी वर्षे हयात असेल तेवढी वर्षे तिला वार्षिकी (annuity) दिली जाईल.

ह्या पर्यायात गुंतवलेली रक्कम परत मिळत नाही.

आता हटके बाब इथे आहे. जर त्या व्यक्तीचे वय ५६ असेल आणि तिने रु १० लाख एकरक्कमी भा.आ.म.मं (LIC) च्या 'जीवन अक्षय-७' ह्या योजनेत गुंतवले, तर वर्षासन (Annuity) ८.१६% ह्या खात्रीपूर्वक (guaranteed) दराने मिळेल.

मंडळी आपण विचार कराल की मुद्दल तर परत मिळत नाही मग काय उपयोग?

अहो, पण तुम्हाला ८.१६% ह्या दराने जे निश्चित १५ वर्षासाठी उत्पन्न मिळणार आहे त्याची एकूण रक्कम रु १२ लाख २४ हजार असेल (वार्षिक रु ८१,६०० * १५ वर्षे). आणि जर ती व्यक्ती १५ वर्षांपुढे ही असेल तर रु ८१,६०० चे वर्षासन चालूच राहणार आहे की.

आणि गुंतवलेले १० लाख परत मिळण्याचा पर्याय घेतला असता ज्यात वार्षिक वर्षासन रु ६५,६०० असेल. आणि जर १५ वर्षांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता तर जे १० लाख वारसाला दिले जाणार होते त्याचे अवमूल्यांकन (Devaluation) रु ३ लाख ८८ हजार झालेले असेल (६.५% दराने ).

आता विचार करा, १५ वर्षानंतर ह्या रु ३.८८ हजाराचे आपले वारसदार काय करू शकतील?

त्यापेक्षा रु १६,००० वर्षासन (८१,६००-६५,६००) स्वतःकरता ह्या घटकेला जास्त घेतले तर?

स्वीगी-झोमॅटो, ओला-उबर, खंडाळा-लोणावळा, दुबई सबकुछ पॉसिबल!

मंडळी,कसा काय वाटला हटके विचार?

जरूर कळवा!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'