अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५ ‘ / Blog 25 - '5, 10 or 15'
'अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५' अरे वा वा!! अलभ्यलाभ! सुमित च्या आई ने पूजा व तिच्या यजमानांचे स्वागत केले. पूजा सुमितच्या आईची म्हणजे अश्विनीची बालपणीची मैत्रीण. दोघीही अगदी बालवाडी पासूनच्या मैत्रिणी; मधल्या काळात काही वर्षांकरिता पूजाच्या यजमानांची दुबईला बदली झाल्याने २/३ वर्षे काही भेट नव्हती आणि आज अचानक कही न कळवता पूजा दरात उभी! “ अगं काय गं सुमितचं लग्न ठरवलंस आणि काही कळवलंच नाहीस! लटक्या रागात पूजाने विचारले. तेवढ्यात सुमित आला, हॅलो मावशी केव्हा अलीस? अरे ही बघ आत्ताच आले! आणि हे काय! लग्नाची तयारी एकदम जोरदार चाललेली दिसते!! अग हो मावशी मला आवडलेला ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’ बुक केलाय ते ही तीन दिवसांसाठी. संगीत, हळद, पण एकदम दणक्यात करणार. मेन्यू म्हणशील तर एकदम different, संगीत ला ‘चाट काउंटर’ सोबत ‘इटालियन काउंटर’ पण ठेवलंय. हळदीला मस्त हुरडा, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, चवीला झणझणीत मिरचीचा ठेचा आणि इंडो वेस्टर्न फ्युजनही आहे. ...