Posts

नुकसान भरपाई - Indemnify

Image
/> नुकसान भरपाई नमस्कार मंडळी! आपल्याला, “To indemnify the loss and not to make a profit” हे विधान माहित आहे का? मंडळी! हे विधान सर्वसाधारण विमा व्यवसायास (General Life Insurance) लागू होते, ज्यात, मेडिक्लेम, बिल्डिंग, मशीनरी, गाडी-घोडा इ. चा विमा अंतर्भूत होतो. आता म्हणाल, आज एकदम गाडी-घोडयावर? हा! तर, झालं असं! रोहन, म्हणजे माझ्या मित्राच्या मुलाला कार घ्यायची होती. पठ्याने अगोदरच ऑनलाईन टेस्ट-ड्राईव्ह बुक केली होती. मस्त पैकी अर्धातास रपेट मारली. मलापण गाडी आवडली, मस्त १८ इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि एकदम हटके डिझाईन, SUV च्या वरच व्हेरिएंट होतं. काका! आवडली का? रोहनने विचारलं. येस! एकदम मस्त! आणि पठ्याने, थोड्याच वेळात गाडी बुक केली पण. ...

अक्षय पात्र -Akshay Patra

Image
अक्षय पात्र मंडळी ! मागचा "फुलपुडीचा" ब्लॉग वाचून एक जेष्ठ आप्त म्हणाले "मिलिंद, अरे! जुन्या गोष्टींची आठवण झाली रे!. त्या वेळेस १२ टक्के व्याज घ्यायचो,आता सगळंच कठीण आहे! या ६ - ७ टक्क्यात कसं काय होणार?". मी म्हणालो, "अहो काका! त्यावेळेस आपण व्याजावर लक्ष दिलेत, पण जर आपण तेव्हा वर्षासन (Annuity) च्या योजना निवडल्या असत्या तर आजही तुम्हाला ११ टक्के परतावा मिळाला असता". मित्रांनो! गुंतवलेल्या रक्कमेवरील परताव्याचे (Returns) चार प्रकार असतात, व्याज,कुपन रेट,लाभांश (Dividend), भाडे (Rent) आणि वर्षासन (Annuity). व्याज म्हणाल तर ते ठराविक कालावधीसाठी ठराविक दराने मिळते. कुपन रेट हा रोख्यावरील (Bond) परताव...

बदल - Change

Image
बदल नमस्कार मंडळी ! तुम्हाला आपल्या पु.लं. चा नारायण माहित असेलच! लग्नकार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी धडपडणारा अगदी मुहूर्त बघण्यापासुन ते खरेदीपर्यंत सर्वत्र वावर असणारा, इव्हेंट मॅनेजर! आता हा अचानक नारायण आठवण्याचं कारण म्हणजे, मागे एका लग्नाला गेलो होतो.छान पैकी हॉलच्या मध्ये छोटा मंडप उभारला होता,तिथे लग्न विधी चालू होते आणि दोन्ही बाजूला स्क्रिन लावले होते. मला वाटलं लग्नविधी चे शूटिंग तिथे दाखवणार असतील जेणेकरून सर्वांना दिसावं. पण नाही! थोड्याच वेळात त्यावर दोघांचे छानश्या लोकेशनवरील फोटो झळकायला लागले. ओ! मग म...

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

Image
हापूस आंबा आणि लोणचे सकाळीच परागच्या वडिलांचा फोन, "परागला चांगला जॉब लागला आहे तर त्याचे लगोलग "SIP" सुरु करा". ठीक आहे, मी म्हणालो. आपण भेटू मग बोलू! मंडळी ! मला आठवते राष्ट्रीय बचत पत्र (National Savings Certificates) जी पाच वर्षाची असतात ती दरवर्षी घेतली जायची आणि पहिल्याची पाच वर्षाची मुदत संपल्यावर ती परत घेतली जायची अशी पुनर्गुंतवणूक करण्याची सर्वसामान्य गुंतवणूकदाराची पद्धत होती. गरजा कमी असल्याने साहजिकच खर्चही कमी आणि त्यामुळे ही "NSC" ची चेन मधेच बंद करण्याची सहसा गरज पडत नसे आणि परिणामी एका खात्रीपूर्वक रक्कमेची पुढील सुनिश्चित कालावधीसाठी तरतूद होत असे. आज, असंख्य प्रलोभने, सेवा दारासमोर हात जोडून उभी आहेत. खिशात हात घालून पाकिटातून पैसे आहेत का हे तपासण्याचीही गरज नाही. फक्त कार्ड स्वाईप क...

रिटर्न फ्रॉम मेक्सिको - Return from Mexico

Image
नमस्कार मंडळी ! नुकतेच आम्ही निमिषला भेटायला अमेरिकेत, कनेक्टटिकटला जाऊन आलॊ.कोव्हिडमुळे थोडी वाकडी वाट करून म्हणजे, मेक्सिकोतून जावं लागलं . मेक्सिको नॉर्थ-अमेरिकेत येत असल्याने, संवादाकरिता इंग्रजी व व्यवहाराकरिता डॉलर हे भांडवल पुरेसे असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर अनुभवलं की, त्यांच्या "पिसो" शिवाय इथे व्यवहार होत नाही. त्यामुळे “पिसो” विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. बँकेत गेलो तर १ डॉलरच्या समोर १८ पिसो मिळत होते. मनात विचार आला, अरे! इथे १८ पिसोच्या समोर १ डॉलर मिळतो आणि आपल्याला त्याकरता ७२ रुपये मोजावे लागले. घटकाभर आपण “पिसो” व “रुपया” ही चलनांची नावं बाजूला ठेवली तर काय दिसून येते? एक देश जास्त चलन मोजत आहे तर दुसरा कमी, असे का ? मंडळी! सरळ आहे, ज्या आवश्यक वस्तूची कमतरता आहे त्याच्या करता ...

धूळफेक - Eyewash

Image
नमस्कार मंडळी ! "तुमची खर्च करण्याची क्षमता ही तुम्ही किती चांगल्या प्रकारे गुंतवणूक केली आहे त्यावर अवलंबून असते."असे कुणीतरी म्हटलंय ! खरे सांगायचे तर, असे मीच म्हंटलय ! मंडळी, आज बऱ्याच जणांचा कल हा म्युचल फंडाकडे आहे. जेणे करून नेहमीच्या पारंपरिक योजना जसे, बँकेतील- फिक्स्ड डिपॉझिट, पोस्टातील- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate),किसान विकास पत्र (KVP),भविष्यनिर्वाह निधी (PPF) ह्यांपेक्षा जास्त परतावा (Returns) देणारे एक गुंतवणुकीचे साधन म्हणून त्याला झुकते माप दिले जाते. आपण थोडं मागे वळून पाहिलंत तर आपल्याला कदाचित आठवत असेल, फंड हाऊसेस (AMC'S ) गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी २० ते २५ टक्के लाभांश देत असत. पण खरे पाहता, मित्रांनो तो "लाभांश" ही एक धूळफेक होती, आता सेबीच्या नवीन नियमामु...

फुलपुडी - PhulPudi

Image
फुलपुडी नमस्कार मंडळी ! आपल्याला “फुलपुडी” माहित आहे का हो ? म्हणजे पुजेकरीता लागणारी फुले ज्या पानांमध्ये वा कागदात बांधून दिली जातात ती फुलांची पुडी , “ फुलपुडी”. आता ह्यात काय विशेष ? विशेष असे की , ह्या फुलपुडीला बांधलेला दोरा , धागा हा जपून ठेवला जायचा. काय , आश्चर्य वाटलं ना ? अहो , खरंच! त्याचे कारण असं की पुढेमागे गरज पडली की तोच दोरा परत वापरायला होईल. अहो , एवढेच कशाला , कधी एखादं गिफ्ट मिळालं तरी त्याचा रॅपर पण काळजीपूर्वक काढला जायचा व छानशी घडी घालून पलंगावरील गादीखाली ठेवून दिला जायचा. कारण , तेच परत वापरता येईल म्हणून. त्यावेळी म्हणजे साधारण १९८०-८५ च्या दरम्यान ह्या मी अनुभवलेल्या गोष्टी. पण मग हा दोरा , रॅपर या वस्तू बाजारात मिळत नव्हत्या का ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मिळत होत्या , पण लोकांकडे खर्च करायला जास्त पैसेच नसत त्यामुळे वापरातील प्रत्येक वस्तू पुरवून वापरण्याकडे कल असायचा. ही झाली त्यावेळची आपल्या चार भिंतीतली अर्थव्यवस्था , म्हणजे आपल्या घरातली.  आणि देशातली अर्थव्यवस्था ? व्याजदर ११% , बॅंक लोन १६.५०% , सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( PPF) ९...