अनुदिनी ४६ –‘घालीन लोटांगण वंदीन चरण' / Blog 46 – ‘Ghalin Lotan Gan Vandin Charan’

"विसर्जनापूर्वी आरती म्हणून घ्या" इति नारायणराव.

"घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे"

"देवा प्रेमे .... "

"अच्युतम् केशवम् रामनारायणम् .... "

भक्तमंडळींचा आवेश एकदम जोरदार, त्यात नारायणरावांचा तर भलताच जोरकस.

स्वतःभोवती गिरक्या घेत असताना आजूबाजूचे, भवतालच्या विश्वाचे त्यांना अजिबात ध्यान नव्हते.

"हरे राम, हरे राम, रामराम हरे हरे' च्या शेवटच्या ध्रुवपदावर एकदम गपकन खाली बसून त्यांनी बाप्पाला साष्टांग नमस्कार घातला.

बाप्पाचे रीतसर विसर्जन झाले. मोठ्या भक्तीभावाने सर्वांनी बाप्पाला निरोप दिला.

खिरापतीचे वाटप झाले.

तेवढ्यात समोरून धोतर सोडून लेंगा-कुडता घालून नारायणराव हातात पिशवी घेऊन लगबगीने बाहेर निघाले.

"अहो कुठे?" असं विचारता, "आता मत्स्य अवतारातील भगवंताला आणावयास निघालो." असे सांगून स्कुटीवरून बाहेर पडले देखील.

हे नारायणराव, आता दोन वर्षांनी सत्तरी ओलांडतील.

तुकतुकीत कांती, सडपातळ बांधा आणि तैलबुद्धी याचे श्रेय ते त्यांच्या मत्स्यआहाराला देतात. बाप्पाच्या आगमनाची आणि मोदकाची त्यांना जेवढी आस तेवढीच मत्स्यआहाराची. बाप्पाच्या विसर्जनापाठोपाठ लगेचच त्यांना समस्त मत्स्य परिवार आपल्या उद्धाराची वाट पाहत आहे असा भास व्हावयास लागतो आणि परिणामी लगोलग ते 'बाजाराला' निघतात.

खाण्यात चोखंदळ असलेले नारायणराव गुंतवणुकीच्या बाबतीतही तितकेच चोखंदळ.

निवृत्ती नंतर त्यांनी 'सहकारी गृह संस्थांची' (Housing Societies) अकाऊंटची कामे करायला सुरवात केली त्याअगोदर त्यांनी रीतसर GDCA चा अभ्यासक्रमपण पूर्ण केला.

आपल्या निवृत्तीपश्चात उत्पन्नाकरिता, नोकरीत असताना ते 'NPS' मध्ये वर्षाला पन्नास ते साठ हजार भरायचे. निवृत्ती नंतर त्यांनी ते थांबवले. पण निवृत्ती नंतर त्वरित वयाच्या साठीला पेन्शन सुरु न करता त्यांनी ते सत्तरीत सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मंडळी, आपल्याकडे साधारणपणे असा समज आहे की निवृत्ती झाल्यावर लगोलग निवृत्तीवेतन सुरु व्हावे. मग, त्याकरिता बहुतांश लोक पोस्टाची 'मासिक मिळकत योजना' (Postal MIS) व 'वरिष्ठ बचत योजना' (SCSS) ह्यांचा आधार घेतात आणि सेकंड इनिंगला सुरवात करतात.

तर मंडळी, त्या सोबत 'NPS' ही योजनादेखील विचारात घ्यावी.

ही योजना केंद्र सरकारने PFRDA मार्फत 'NPS' ही ट्रस्ट स्थापून कार्यान्वित केली आहे.

वयवर्षे १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात.

ही योजना बाजाराशी संलन्ग असल्याने आपली गुंतवणूक दोन आकडी परतावा देऊ शकते.

आपले योगदान हे समभाग (Equity), निमसरकारी कर्ज (Corporate Debt) व सरकारी रोखे (Govt. Securities) अश्या तीन प्रकारच्या संपत्तीच्या प्रकारात वर्गीकृत करत असल्याने ह्यात जोखीम 'ना के बराबर.'

ह्यात आयकर कलम ८० सीसीडी (१बी) अंतर्गत पन्नास हजाराची गुंतवणूक कर वाचवण्यास पात्र आहे (कलम ८० सी व्यतिरिक्त).

मंडळी आपण काय कराल?

'साठी बुद्धी नाठी'चा प्रत्यय येण्याअगोदरच पुढील अर्थाजनाची रूपरेषा ठरवावी.

मंडळी, होत असं की, उभ्या आयुष्यात एकत्रित न बघितलेली रक्कम एकदम बँकेत दिसल्याने थोडं का होईना पण आपला हात खर्चात सढळ होतो.

तसेच वाढत्या महागाई समोर कापरासारखी आपली पुंजी उडून जाऊ द्यायची नसेल तर 'दुसऱ्या इंनिंग' मध्येही आपण अर्थार्जन करणे स्तुत्य. त्यामुळे आपली मानसिक व शाररिक तंदुरुस्ती सुद्धा उत्तम राहील.

आणि हो!

नारायणरावांनी निवडलेला 'प्रलंबित वर्षासन' (Deferred Annuity) हा पर्याय जरूर विचारात घ्या कारण सत्तरी नंतर आपण जेव्हा खऱ्या अर्थाने 'रिटायर्ड' होऊ त्यावेळेस ही प्रलंबित पेन्शन कामी येईल.

काय म्हणता?

“Please recite the Arti before immersion,” said Narayanrao.

"घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे"

"देवा प्रेमे .... "

"अच्युतम् केशवम् रामनारायणम् .... "

All the devotees were reciting the Arti with full Enthusiasm, And Narayanrao’s enthusiasm was more enhanced. Whirling around self, he was totally unaware of the existence of others and the surroundings.

At the end of the recitation “Hare Ram, Hare Ram, Ram Ram Hare Hare”, he impetuously sat down and prostrated for the namaskar.

The immersion of Bappa took place. Every devotee bade an emotional goodbye to Bappa.

Prasad was distributed.

And Narayan, attired, in Paijama, Kurta, with a bag in hand, started walking out in a hurry.

“Where to?” asked someone to him, “On the way to get the God in the Avatar of fish,” and sped off on his scooter.

Narayanrao! was going to cross 70 in the next 2 years.

Asper him his lustrous Skin, slim figure, and sharp mind were because of the fish in his regular diet. His anxiety towards the arrival of Bappa and the Modak was akin to a fish diet. Immediately after the immersion of Bappa, he heads to the 'Market' to buy fish as he feels that he is the one who would alleviate the entire species of fish.

Narayan was choosy in his food and equally in his investments.

After retirement, he started accounting work of the housing societies, and before that, he had completed the course of GDCA.

He invested about 50 to 60 thousand every year in NPS account during his service period for provisioning after retirement. He stopped this investment after retirement. But rather than starting the pension from the age of 60, he opted to start it from the age of 70.

Friends, we have a general understanding that pension should start immediately after retirement. So, for this, most people choose the Postal Monthly Income Scheme and Senior Citizen Saving Scheme.

Friends, however, you should also explore the NPS scheme for the pension.

This scheme was formulated by the Central Government through PFRDA by establishing the NPS trust.

People in the age group of 18 to 70 can participate in this scheme.

Because this scheme is unit-linked, this has the potential to fetch two-figure returns in terms of growth.

In this scheme our money is invested across three assets classes, Equity, Corporate Debt, and Government Securities, thus trying to make it a risk-free investment.

Under IT Section 80CCd (1b), the contribution made in this scheme is qualified for additional deduction up to ₹. 50,000, an over and above limit under section 80C.

Friends, what will you do?

Before you repent, please chalk out an income-generating plan before 60.

Actually, when see a lump sum amount in the account of the bank, which we have not seen in our life time, we tend to spend impulsively.

Further, to avoid the ever-increasing inflation vaporizing our savings, it is prudent to keep generating income even in our second inning.

And yes,

Please do ponder on the Deferred Annuity plan chosen by Narayanrao. Because after 70, when we retire in the physical sense, this deferred pension comes in very handy.

So!! What say?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !