अनुदिनी ७३ - अंडरस्टैंड सिबिल स्कोर एंड इकनोमिक ग्रोथ रिलेशन / Blog 73 – Understand the CIBIL score and economic growth relation.
लाउंज मधून बाहेर पडलो आणि गेटपाशी जायला निघालो. समोरच गेट नंबर ४५ कडे जाण्याचा बाण दाखवला होता. आम्ही गेटपाशी पोहोचलो तर समजलं फ्लाईट अर्धा तास उशिरा सुटणार आहे. " चला बरं झालं!" असे पुटपुटत पुरुषोत्तमभाईंनी आपली डफल बॅग वेटिंग लाउंजच्या एका मोकळ्या खुर्चीवर ठेवून दिली. आणि समोरच्या कॉफी स्टॉलकडे मोर्चा वळवला. " चला मिलनभाई कॉफी घेऊ!" कॉफी खरोखरच लाजवाब होती. पुरुषोत्तम भाईंनी १०० मिली च्या दोन कॉफी साठी साडेचारशे रुपये मोजले. मी संभ्रमात पडलो. अदानी लाउंज मध्ये दोन रुपयात जवळपास हजार रुपयांचा बफे ब्रेकफास्टचा आग्रह धरणारे , त्याकरिता आपली वेगवेगळी क्रेडिट कार्डस् पडताळून पाहणारे , आता पाचशे रुपये देऊन मोकळे. मला राहवले नाही. मी सरळ त्यांना विचारता झालो. " पुरुषोत्तमभाई एक विचारू का ? Please, don’t take it otherwise!" " अरे विचारा की , मिलनभाई काही वांदा नाही!" पुरुषोत्तमभाईंनी डोळ्यावरची सोनेरी बट बाजूला करीत माझ्या पाठीवर थाप मारली. " मघाशी तुम्ही दोन रुपयात बफे ब्रेकफास्ट मिळतोय म्हणून वेळ काढून तुमच्याकडची क्रे...