अनुदिनी ४० – ‘I -20’ / Blog 40 – ‘I – 20’
"साहेब फक्त ५ वर्षे प्रीमियम भरायचा आहे” या बोलीवर आकाश ने प्रपोजल फॉर्म वर सही केली. पुढे त्याने विचार केला की सदर प्लॅन हा २० वर्षांचा आहे तर त्यातून मधेच बाहेर न पडणे हे उत्तम! त्यापेक्षा उरलेली वर्षे प्रीमियम भरणे अधिक उचित ठरेल. आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. " बाबा, युनिव्हर्सिटीचा ॲडमिटचा मेल आला!", निशिगंधा आकाशच्या गळ्यात पडत चित्कारली. "आता तुम्ही I -२० ची तयारी कराल ना?" मंडळी! ही, निशिगंधा! वय वर्षे २३, फॅशन डिझायनिंग मधे पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याच्या तयारीत. तीच्या स्वप्नांबरोबर उड्या मारणे आकाशला जड जाणार होते. पण अर्थातच मुलीचा बाप आणि तोही एकुलत्या एका, त्यामुळे त्यालाही उसने बळ आणून तिच्या उड्यांबरोबर स्पर्धा करावी लागत होती. तोंडाला फेस येणे, जीव गुदमरणे, धाप लागणे, पाय गळपटणे, या सर्व विशेषणांचा अनुभव आकाशला तीच्या MS च्या फीचा आकडा ऐकून आला. मागील १०० पिढ्यांच्या उत्पन्नाची गोळा बेरीज करूनही हा आकडा पार होऊ शकत नव्हता. सुदैवान...