अनुदिनी ५९ - तुम्ही जीवन विमा खरेदी करू शकत नाही. का? / Blog 59 - You can’t buy Life Insurance. Why?
एक, दोन , तीन…दहा..बारा! आऽऽआ! राहुलने दणकन दोन्ही डंबेल्स जमिनीवर सोडले. नमस्कार मंडळी! तुम्ही ओळखलं असेलंच आपल्या कथेचा नायक जीम मध्ये वर्क आऊट करतो आहे. राहुल, वय वर्ष ३०, उंची ५ फूट १० इंच आणि वजन ८२ किलो. असो, मंडळी! आज मला काय सांगयचंय तर, एखाद्याला वाटलं आयुष्यावर विमा घ्यायचा आहे म्हणून विमा पॅालीसी विकत घेता येत नाही. काय आहे मंडळी! बाकी सर्व ठिकाणी आपण, तुम्ही-आम्ही ग्राहक म्हणून मिरवू शकतो अपवाद ‘विमा व्यवहार!’ ग्राहक हा राजा असतो. कोणत्याही व्यवहारात ‘घेणारा’ हा ग्राहक असतो. पण, विम्याच्या बाबतीत म्हणाल तर तसे नसते. ह्या व्यवहारात या राजाला कधी नमते घ्यावे लागते. त्याच्या अटींवर विमा प्रस्ताव पूर्ण होऊ शकत नाही. मंडळी! उलटपक्षी विमा व्यवहारात विमा कंपनीच ग्राहकाच्या, राजाच्या भूमिकेत असते. काय चक्रावलात ना? सांगतो, कसे काय ते! मंडळी! मला सांगा आज तुम्ही ₹ १२०० ला दोन डझन आंबे घेतलेत आता ह्यातले समजा २ आंबे खराब निघाले तर? हं, तुम्हाला ते बदलून देण्याची हमी आंबेवाला देतो; पण समजा एखाद्या विमा इच्छुकास मधुमेहाचा त्रास आहे तर? राव! इथेच...