Posts

Showing posts from 2024

अनुदिनी ६४ -Assured and Insured / Blog 64 – Assured and Insured

Image
  “ अरे आहेस कुठे ?” चिटणीस साहेब फोनवर बोलत होते.  “ आता छान थंडीची सुरवात झाली आहे चला आपल्या नाशिकच्या बंगल्यावर जाऊ. येताना किरण , भाई आणि हेमंतलासुद्धा घेऊन ये.” हे आमचे चिटणीस साहेब , वय-वर्ष ६२. एका नामांकित विमा कंपनीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. कारण त्यांना बऱ्याच वर्षांपासून नाशिकला घेतलेल्या जागेवर मनासारखं घर बांधायचं होतं. एकदम हौशी माणूस! बंगल्याच्या बाजूला कलमी आंबा , फणस , जांभूळ यांची झाडं लावून त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी माळी पण ठेवला होता.  सर्व मंडळी गाडीमध्ये बसून नाशिककडे जाण्यास निघाली. एका झोकदार वळणावर बाईकवाल्याला चुकवताना किरणने गाडी बैलाला धडकवली. सुदैवाने बैल घाबरून शेतात पळाला आणि गाडीचे फक्त बोनेट एका बाजूने चेपले.  “ साहेब , मागे एकदा माझी गाडी पण झाडावर धडकली. एका बाजूचा हेडलाईट फुटला. बोनेट चांगले चेपले गेले. दहा-बारा हजाराचा फटका पण बसला (बिल झाले). पण कंपनीने हेडलाईटचे पैसे द्यायचे नाकारले. एवढा हप्ता दरवर्षी न चुकता भरूनही विमा कंपनीची ही अरेरावी! ”   इती हेमंत.  “ अरे किरण , पुढच्या डाव्या गल्लीत घ...

अनुदिनी ६३ -वार्षिकी / Blog 63- Annuity

Image
  नमस्कार मंडळी! मंडळी , बघता बघता नवरात्र संपून दसरा आला आणि गेला की .   आता वेध लागले दिवाळीचे.  काय बरोबर ना! मंडळी , आपल्या  पूर्वजांना मानले पाहिजे ना! .  का ? अहो विचार करा , श्रावण महिन्यापासून सणांची जी काही त्यांनी आखणी केली आहे ती , ' बरसात ' अगदी दिवाळी पर्यंत असते. आणि मंडळी श्रावणात भलेही आजूबाजूला सगळा किचकीचाट जरी असला तरी ,  दहीहंडी म्हणा रक्षाबंधन , गौरी गणपती , नवरात्र सगळे सण आपण एकदम जल्लोषात  साजरे करतो.  राव , चैत्रात भलेही झाडांना पालवी फुटते पण खरा निसर्ग सजतो तो याच दिवसांत.  असो , तर आता आजच्या अनुदिनीचे ( Blog) आणि या सर्व गोष्टींचं काय नातं असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल!  तर मंडळी या सर्व घडामोडींमध्ये सुसूत्रता आहे , एक ताल आहे , शाश्वती आहे. या चक्राच्या भरवशावर , सुसूत्रतेवर , आपणच काय तर  शेअर बाजार देखील ताल धरून असतो.  थोडक्यात काय तर , ' जिंदगीमे भरोसा चाहिये! '.  तर , झालं असं! आत्ताच श्रीयुत अप्पासाहेबांचा मृत्यू दावा , (Death claim ) दिला.  मंडळी , त्यांनी घेतलेल्या योजनेव...