अनुदिनी ५३ - 'इन्शुरन्स, ऑनलाईन की ऑफलाईन' / Blog 53 - 'Buying Insurance Online or Offline'
"अरे सॅम, त्या एजन्टने ईमेल केलेले इन्शुरन्सचे प्रपोजल तू ऑनलाईन तपासणार होतास ना?" उश्यांचे अभ्रे घालता, घालता उत्तराने समीर उर्फ सॅमला ढोसले. "हो हो बघीतले गं! ऑनलाईन प्रीमियम वर्षाला जवळपास ३०,००० रुपयांनी कमी आहे." परवाच सॅमचे बाबा त्यांच्या ओळखीच्या वित्तीय सल्लागाराला (Wealth Advisor) घेऊन आले होते. सॅम - उत्तराला गुंतवणुकीविषयी काही अडचणी व शंका होत्या आणि त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवे होते. विषयाच्या ओघात सध्या असलेल्या विमापॉलिसींविषयी बोलणे झाले. सॅमने त्यांच्या आग्रहाखातर त्या कपाटातून शोधून आणल्या. तेवढ्यात सिद्धू तेथे आला. त्याची लुडबुड सुरू झाली. खरेतर नवीन व्यक्तीला पाहून तो रडायचा, आरडाओरडा करायचा. पण कसा कोण जाणे तो त्या अनोळखी व्यक्तीच्या मांडीवरच जाऊन बसला. सिद्धूच्या एकंदरीत वागण्यामुळे सॅम - उत्तरा पाहुण्यांसमोर त्याला नेत नसत, चारचौघात त्याला नेणे ते टाळत असत. हो मंडळी,कारणच तसं होतं! सिद्धूला डाऊन सिंड्रोम होता! पण आज त्या अनोळखी व्यक्ती सोबत ...