सुकेष्णा - Sukeshna
सुकेष्णा ताई, पासबुकं ठेवली हाय. जरा बँकेत जाल का? नाव, सुकेष्णा! वय अंदाजे ३० च्या आसपास. सदा हसमुख! लोकांची घरकामे करून संसाराला हातभार लावणारी. नवरा प्लम्बिंगची कामे करतो. पदरी दोन मुली. शिक्षण न झाल्यातच जमा पण व्यवहार जाणणारी. कामाला चुणचुणीत! लॉकडाऊन च्या दिवसात त्यांच्या भागात बरेच धान्य वाटप होत होते. बाई एकदम हुशार आणि मेहनती. त्या सामानातून वडे,भजी बनवून विकून बाईने १०-१५ हजार कमावले. मंडळी! आत्ता हा अचानक बायोडेटा कशाला? असा प्रश्न आपल्याला पडला असणार! बरोबर ना! सांगतो! अगं SS सुकेष्णा! तुझं पासबुक आणलय S गं भरून! आणि हो! सोबत एक फॉर्म आणलाय त्यावर सही करून दे! स्वयंपाकघरातून (Kitchen) पदराला हातपुसत सुकेष्णा बाहेर आली आणि फॉर्मवर बिनबोभाट (without hesitation) सही करून...