बदल - Change
बदल नमस्कार मंडळी ! तुम्हाला आपल्या पु.लं. चा नारायण माहित असेलच! लग्नकार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी धडपडणारा अगदी मुहूर्त बघण्यापासुन ते खरेदीपर्यंत सर्वत्र वावर असणारा, इव्हेंट मॅनेजर! आता हा अचानक नारायण आठवण्याचं कारण म्हणजे, मागे एका लग्नाला गेलो होतो.छान पैकी हॉलच्या मध्ये छोटा मंडप उभारला होता,तिथे लग्न विधी चालू होते आणि दोन्ही बाजूला स्क्रिन लावले होते. मला वाटलं लग्नविधी चे शूटिंग तिथे दाखवणार असतील जेणेकरून सर्वांना दिसावं. पण नाही! थोड्याच वेळात त्यावर दोघांचे छानश्या लोकेशनवरील फोटो झळकायला लागले. ओ! मग म...