Posts

अनुदिनी ६१ - आजीवन विमा (Whole Life plan) / Blog 60 – Lifelong plan

Image
मृत्यू कोणालाच चुकलेला नाही! ‘सगळे काही माझ्या स्वतःच्याच इच्छापूर्तीसाठी’, असा विचार करणे हे एखादा माणूस कितीही जरी आत्मकेंद्री असला तरी शक्य नाही.  कारण माणूस म्हणून त्याचा स्वतःचा असा गोतावळा हा असतोच. स्वतःच्या पलीकडे ह्या गोतावळ्यातील व्यक्तींसाठी त्याचे मानसिक गुंतणे हे मनुष्य स्वभावाला अनुसरून असल्याने ह्यात जगावेगळे असे काही नाही. उलट तो जर याचा विचारच करत नसेल तर ते वेगळे ठरू शकेल. पण ते शक्य नाही ही काळ्या दगडावरची रेघ!  फरक इतकाच असेल की ह्या गोतावळ्यातील व्यक्तींची संख्या अथवा परीघ कमी अधिक असेल. नमस्कार मंडळी!!!!  काय,  पकलात का? I mean, हे सगळे वाचून बोअर झालात का? अहो,  काय आहे ना आजचा विषयच असा आहे!  अशा प्रस्तावनेशिवाय आजच्या विषयापर्यंत पोहचू शकत नव्हतो म्हणून! असो! तर, आजचा विषय आहे, 'मी आजीवन विमा (Whole life plan) घेऊ की मुदतीचा (Limited term)?' " डॅड! मी आलेच!" इती श्रीधर ह्यांची मोठी मुलगी वृषाली. फार्मा कंपनीत R&D सेक्शनला गेल्या दोन वर्षांपासून लागली. आवडीचा जॉब आणि पॅकेजही उत्तम. आज शनिवार असल्याने मॅडम गाडी घेऊन मित्रांबरोबर फ...

अनुदिनी ६०- १ - SIP and SWP / Blog 60 – 1- SIP & SWP

Image
धुरळा उडवत जीप एका कौलारु घरासमोर उभी राहिली .   एकेक करून एक , दोन आणि तीन माणसं उतरली. डोक्यावर फेल्ट हॅट , डोळ्यावर गॉगल , हातात फिशिंग रॉड  त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून गेटवर दोन कुत्रे भुंकत धावत आले. आपण ओळखलं असेलच हे त्रिकूट पिकनिकला आलंय. डोंगराच्या एका टोकाला शांत जलाशयाच्या बाजुलाच टुमदार कौलारु बंगली होती. बाहेर व्हरांड्याच्या समोर गवतावर केनच्या खुर्च्या होत्या , बंगल्याचा केअर टेकर झाडांना पाणी घालत होता. “ शेरी-लुई! कम् हियर!” त्या केअर टेकरने त्या दोन्ही जनावरांना आवरलं. या! असो. मंडळी ,  व्हा की मोकळे आता! अगदी एप्रिल पर्यंत इअरएंडचं काम जोरकसपणे केलंत.   आता जरा निवांतपणा घ्या! हं मंडळी , मला कल्पना आहे की आपण म्हणाल की “राव , असा निवांतपणा तर आम्ही दर महिना अखेरला घेतोच की!” बरोब्बर! पण मी सुचवतोय तो हा असा निवांतपणा ,  आपल्या जिगरी दोस्तांबरोबर आणि तोही दर ३-४ महिन्यांनी!  म्हणजे मंडळी , तेच तेच ऑफिसचे , व्यवसायाचे वगैरे विषय निघत नाहीत. लहानपणीच्या  शाळा - कॉलेजमधील आठवणी , थट्टामस्करी एकदम खळखळून हसवतात आणि विशेष म्हणजे ह्या थट्टाम...

अनुदिनी ५९ - तुम्ही जीवन विमा खरेदी करू शकत नाही. का? / Blog 59 - You can’t buy Life Insurance. Why?

Image
एक, दोन , तीन…दहा..बारा! आऽऽआ!  राहुलने दणकन दोन्ही डंबेल्स जमिनीवर सोडले. नमस्कार मंडळी! तुम्ही ओळखलं असेलंच आपल्या कथेचा नायक जीम मध्ये वर्क आऊट करतो आहे. राहुल, वय वर्ष ३०, उंची ५ फूट १० इंच आणि वजन ८२ किलो. असो, मंडळी! आज मला काय सांगयचंय तर, एखाद्याला वाटलं आयुष्यावर विमा घ्यायचा आहे म्हणून विमा पॅालीसी विकत घेता येत नाही.  काय आहे मंडळी! बाकी सर्व ठिकाणी आपण, तुम्ही-आम्ही ग्राहक म्हणून मिरवू शकतो अपवाद ‘विमा व्यवहार!’ ग्राहक हा राजा असतो.  कोणत्याही व्यवहारात ‘घेणारा’ हा ग्राहक असतो. पण, विम्याच्या बाबतीत म्हणाल तर तसे नसते. ह्या  व्यवहारात या राजाला कधी नमते घ्यावे लागते. त्याच्या अटींवर विमा प्रस्ताव पूर्ण होऊ शकत नाही.  मंडळी! उलटपक्षी विमा व्यवहारात विमा कंपनीच ग्राहकाच्या, राजाच्या भूमिकेत असते.  काय चक्रावलात ना? सांगतो, कसे काय ते! मंडळी! मला सांगा आज तुम्ही ₹ १२०० ला दोन  डझन आंबे घेतलेत आता ह्यातले समजा २ आंबे खराब निघाले तर? हं, तुम्हाला ते बदलून देण्याची हमी आंबेवाला देतो; पण समजा एखाद्या विमा इच्छुकास मधुमेहाचा त्रास आहे तर? राव! इथेच...