अनुदिनी ७५ -हरवलेला माणूस आणि विमादावा / Blog 75- Missing person and insurance
दारावरची बेल वाजली आणि पेपरचं भेंडोळं आत पडलं. मिहीरने हातातला चहाचा कप बाजूला ठेवून पेपर उचलला. आतून दोन-तीन हॅन्डबीलं खाली पडली. ‘Golden Voyage’, नवविवाहितांसाठी एक अनोखी योजना! मिहीर हातातलं पॅम्पलेट वाचू लागला आणि ते वाचत असतानाच त्याला आपल्या विमा पॅालीसीचा हप्ता भरायची आठवण झाली. त्याने लगेचच login केले पण त्याच्या डोळ्यांसमोरुन प्राजक्ताचा चेहरा काही हलेना. समोर बॅन्डवर हलक्या सुरात पाश्चात्य संगीताची धून वाजत होती. आज लेफ्टनंट कर्नल वैद्य ह्यांचा वाढदिवस होता. कॅप्टन राऊत ह्यांनी त्यांच्या बंगलीच्या हिरवळीवर त्या निमित्ताने पार्टी दिली होती. पार्टीत मिलिटरीतील काही अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे आप्तस्वकीयही होते. मिहीरला नुकतेच कमिशन मिळाले होते आणि तोही आमंत्रितांपैकी एक होता. मिलिटरी पोशाखात तो भलताच रुबाबदार दिसत होता. त्याची रक्तवर्णी गुलाबी बोटं हातातील रमच्या ग्लासाभोवती फिरत होती. आणि निळेशार डोळे आजूबाजूचा आसमंत न्याहाळत होते . Welcome Mihir! असा खणखणीत आवाज आणि पाठीवर थाप , दोन्ही एकदमच मिहीरवर आदळले. “ ओ , कॅप्टन राऊत!” मिहीर मागे वळून बोलता झाला. “I don’t bel...